जागतिक युनिट केस व्हॉल्यूममध्ये १ टक्क्याची वाढ
निव्वळ महसूलामध्ये ३ टक्क्यांची वाढ;
ऑर्गनिक रेव्हेन्यूज (नॉन-जीएएपी) मध्ये ११ टक्क्यांची वाढ
जागतिक रीलीजमधून भारतासंबंधित वैशिष्ट्ये (India Highlights from the global release):
भारतात, कोका-कोलाने २०२४ च्या पहिल्या तिमाहीमधील त्यांच्या निकालांमधील काही उल्लेखनीय मुद्दयांना सादर केले:
कोका-कोलाने ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी डिजिटल साधनांचा फायदा घेणे सुरू ठेवले. भारतात, रिटेलर्स अॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऑर्डर देण्यासाठी ग्राहक सहभाग प्लॅटफॉर्म कोक बडीवर एआय-समर्थित सुचवलेल्या ऑर्डर शिफारशींचा लाभ घेत आहेत.
जागतिक आव्हाने असताना देखील कोका-कोलाने भारतात वाढ केली. फिलिपाइन्स, भारत, व्हिएतनाम आणि इंडोनेशियामधील वाढ चीनमध्ये झालेल्या कपातीपेक्षा अधिक होती.
जानेवारी व फेब्रुवारी २०२४ मध्ये कंपनीने भारतातील काही प्रदेशांमध्ये पुन्हा बॉटलिंग कार्यसंचालनांच्या फ्रँचायझी तयार केल्या. कंपनीने भारतातील काही प्रदेशांमधील बॉटलिंग कार्यसंचालनांच्या रिफ्रँचायझीशी संबंधित २९३ दशलक्ष डॉलर्सच्या निव्वळ नफ्याची नोंद केली.