maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा कव्‍हर जिनियससोबत सहयोग

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल व्‍यासपीठाने आज एम्‍बेडेड संरक्षणासाठी इन्‍शुअरटेक कव्‍हर जिनियससोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली. कव्‍हर जिनियसचे पुरस्‍कार-प्राप्‍त जागतिक वितरण व्‍यासपीठ एक्‍सकव्‍हरला समाविष्‍ट करत इझमायट्रिपचे ग्राहक त्‍यांची तिकिटे बुक करताना कॅन्‍सल फॉर एनी रिजन (सीएफएआर) ट्रॅव्‍हल प्रोटेक्‍शनसह एम्‍बेडेड सर्वसमावेशक ट्रॅव्‍हल प्रोटेक्‍शनचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना एक्‍सकव्‍हरच्‍या एण्‍ड-टू-एण्‍ड ग्राहक अनुभवामधून फायदा मिळेल, जे सुरूवातीच्‍या सेलपासून व्‍यवस्‍थापन व क्‍लेम्‍सपर्यंत ग्राहकांच्‍या सर्व गरजांची हाताळणी करते. त्‍यांच्‍या पुरस्‍कार-प्राप्‍त सर्विस डिझाइनने सपोर्ट तिकिटे ७ पटीने कमी केल्‍याचे दाखवले आहे.

सीएफएआर‍ ग्राहकांमध्‍ये आणि ऑनलाइन ट्रॅव्‍हल एजन्‍सींमध्‍ये (ओटीए) मोठ्या प्रमाणात लोकप्रिय बनत आहे. यामागील कारण म्‍हणजे ते एकसंधी अनुभव देते, ज्‍यामध्‍ये कोणतीही रिफंड विनंती केल्‍यास पेपरवर्क प्रक्रियेचा त्रास दूर करते. तसेच ओटीएसाठी विमा परवान्‍याची गरज दूर करते.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी म्‍हणाले, “देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी मागणीमध्‍ये वाढ होत असताना कव्‍हर जिनियसकडे जागतिक कौशल्‍य आहे, जे आम्‍हाला एआयद्वारे समर्थित सर्वोत्तम प्रोटेक्‍शन प्रदान करण्‍यासाठी आवश्‍यक होते, ज्‍यामधून ग्राहकांना एकसंधी अनुभव व स्थिरता मिळते. सीएफएआर हे अद्वितीय सोल्‍यूशन आहे, जे ग्राहकांना अनपेक्षित स्थितींमध्‍ये हमी देईल.”

कव्‍हर जिनियससाठी एपीएसी येथील धोरणात्‍मक सहयोगांचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष बार्ने पिअर्स म्‍हणाले, “ट्रॅव्‍हल प्रोटेक्‍शन लोकप्रिय असण्‍यासह अत्‍यावश्‍यक गरज बनले आहे. ते सर्वोत्तम सुविधा देण्‍यासाठी सुसज्‍ज असण्‍यासह प्रवाशांना सर्व प्रकारच्‍या अनिश्चिततांसाठी प्रोटेक्‍शन घेण्‍यास प्रेरित देखील करते. आम्‍हाला इझमायट्रिपसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना नाविन्‍यपूर्ण व बीस्‍पोक उत्‍पादने प्रदान  करण्‍यात येतात, जे किफायतशीर असण्‍यासोबत सुलभपणे उपलब्‍ध होतात.”

Related posts

यंदा सायबरसुरक्षा जागरूकता महिन्‍यामध्‍ये #SatarkNagrik बना आणि एआय-समर्थित धूर्त घोटाळ्यांपासून स्‍वत:चे संरक्षण करा

Shivani Shetty

आशा स्‍कूल्‍सच्‍या विकासाकरिता रेलिगेअर एंटरप्राइजेसचा पुढाकार

Shivani Shetty

नेस्‍ले इंडियाच्‍या ‘बायोडायजेस्‍टर प्रोजेक्‍ट’ने दुग्‍ध उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या शाश्‍वत भविष्‍याचा मार्ग सुकर केला

Shivani Shetty

Leave a Comment