लखनौ, ७ मे २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आपल्या अत्याधुनिक लखनौ प्लांटमधून ९,००,००० व्या वेईकल लाँचच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची घोषणा केली. उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य सचिव श्री. दुर्गा शंकर मिश्रा आणि टाटा मोटर्सचे वरिष्ठ मान्यवर यांच्या उपस्थितीत प्लांटमध्ये झेंडा दाखवण्याच्या समारोहासह साजरीकरण करण्यात आले.
६०० एकर जागेवर पसरलेल्या लखनौ प्लांटमधून शाश्वत उत्पादन पद्धतींप्रती टाटा मोटर्सची कटिबद्धता दिसून येते, तसेच कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) वॉटर-पॉझिटिव्ह प्लांट म्हणून मान्यताकृत केले आहे. या प्लांटमध्ये ६ मेगावॅट सोलार पॉवर प्लांट आहे, ज्यामुळे कार्बन फूटप्रिंट मोठ्या प्रमाणात कमी होते. या प्लांटमध्ये अल्ट्रा-मॉडर्न वाहन उत्पादन स्टेशन्स देखील आहेत, जसे रोबोटिक पेंट बूथ आणि बॉडी-इन-व्हाइट शॉप, ज्यामध्ये रोबोटिक स्पॉट वेल्डिंग केली जाते. १९९२ मध्ये स्थापना केल्यापासून प्लांटने कार्गो व प्रवासी व्यावसायिक वाहनांसह लाइट, इंटरमीजीएट, मेडियम व हेवी कमर्शियल वेईकल्स, तसेच इलेक्ट्रिक आणि फ्यूएल सेल इलेक्ट्रिक बसेस देखील लाँच केल्या आहेत.
टाटा मोटर्सच्या लखनौ प्लांटमधून ९,००,०००व्या वेईकल लाँचबाबत मत व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य सचिव श्री. दुर्गा शंकर मिश्रा म्हणाले, ”मी हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी टाटा मोटर्सचे कौतुक करतो. या उपलब्धीमधून विद्यमान व भावी आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी प्रगत, सुरक्षित व हरित गतीशीलता सोल्यूशन्स प्रदान करण्यामध्ये टाटा मोटर्सची महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येते. तसेच, कंपनी महिला सक्षमीकरणाप्रती कटिबद्ध आहे, जे यंदा नवीन नियुक्तींमध्ये २२ टक्क्यांहून अधिक महिला प्रतिनिधींच्या निवडीसह अधिक दृढ झाले आहे. हे उत्पादन क्षेत्रामध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे.”
या उपलब्धीबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सचे उपाध्यक्ष व कार्यसंचालन प्रमुख श्री. विशाल बादशाह म्हणाले, ”लखनौ प्लांटमधून आमच्या ९,००,०००व्या वेईकलचे लाँच टाटा मोटर्ससाठी महत्त्वाचा क्षण आहे. हा प्लांट आमच्या प्रगत इलेक्ट्रिक बसेसच्या उत्पादनामध्ये महत्त्वाचा राहिला आहे आणि १२०० हून अधिक युनिट्स यशस्वीरित्या वितरित केले आहेत, ज्यांनी देशभरात एकूण लाखो किलोमीटर अंतर पार केले आहे. उत्तर प्रदेश आमच्यासाठी प्रमुख बाजारपेठ आहे आणि उत्तर प्रदेश सरकारने पायाभूत सुविधेच्या विकासावर दिलेला भर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीला गती देण्यामध्ये प्रमुख सक्षमकर्ता ठरला आहे. इंडस्ट्री ४.० एकीकरणावरील आमच्या फोकससह हा प्लांट ग्राहकांसाठी सुरक्षित, स्मार्ट व हरित गतीशीलता सोल्यूशन्स वितरित करत आहे. आम्ही हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करत असताना आमचे ग्राहक, सहयोगी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो.”
याप्रसंगी आपले मत व्यक्त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सचे लखनौमधील प्लांट प्रमुख श्री. महेश सुगुरू म्हणाले, ”लखनौ प्लांटमधून आमच्या ९,००,०००व्या वेईकल लाँचच्या उपलब्धीमधून सर्वोत्तमता व नाविन्यतेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. अत्याधुनिक तंत्रज्ञानांच्या एकीकरणाच्या माध्यमातून आम्ही आमच्या कार्यसंचालनांना ऑप्टिमाइज केले आहे, कार्यप्रवाह सुव्यवस्थित केले आहे आणि ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारी उच्च दर्जाची वाहने वितरित करण्यासाठी आमच्या उत्पादनाचे मानक उंचावले आहे.”
टाटा मोटर्स आपल्या लखनौ प्लांटमध्ये लैंगिक सर्वसमावेशकता आणि महिला सक्षमीकरणामध्ये बेंचमार्क स्थापित करत आहे. सध्या, टेक्निकल कर्मचारीवर्गामध्ये एक-तृतीयांश महिला कर्मचारी आहेत, ज्या सर्व ऑपरेशनल शिफ्ट्समध्ये सक्रियपणे सहभाग घेतात आणि ट्रक्स व बसेस् अशा विविध उत्पादनांच्या निर्मितीमध्ये व्यापक कौशल्ये दाखवतात. कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांच्या सर्वसमावेशक विकासामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, त्यांना त्यांची कौशल्ये अधिक निपुण करण्यासाठी डिझाइन केलेल्या विशेषीकृत प्रशिक्षण आणि वर्कशॉप्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष उद्योग अनुभव देत आहे. यंदा नवीन रिक्रूट्समध्ये २२ टक्क्यांहून अधिक महिला प्रतिनिधीत्व असण्यासह टाटा मोटर्स उत्पादन उद्योगामध्ये महिलांच्या प्रगतीची अभिमानी समर्थक ठरली आहे.
previous post