maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कॅडीसच्या महसूलात वार्षिक २५ टक्‍क्‍यांची वाढ

मुंबई, ७ मे २०२४: कॅडीस या व्‍यक्‍ती व व्‍यवसायांसाठी एण्‍ड-टू-एण्‍ड नेटवर्किंग आणि कनेक्‍टीव्‍हीटी सोल्‍यूशन्‍स प्रदान करणाऱ्या आघाडीच्‍या जागतिक ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने आर्थिक वर्ष २३-२४ मध्‍ये महसूलात वार्षिक २५ टक्‍क्‍यांच्‍या वाढीची नोंद केली, ज्‍याचे श्रेय त्‍यांच्‍या यूएसबी-सी उत्‍पादन लाइनच्‍या वाढत्‍या लोकप्रियतेला जाते. कंपनीला संपूर्ण भारतात, विशेषत: प्रमुख महानगर क्षेत्रांमध्‍ये त्‍यांच्या यूएसबी-सी सोल्‍यूशन्‍ससाठी मागणीमध्‍ये मोठी वाढ दिसण्‍यात आली.

ब्रँडने आर्थिक वर्ष २३-२४ मध्‍ये आपल्‍या मार्की यूएसबी-सी उत्‍पादन श्रेणीत सरासरी मासिक २५ टक्‍के वाढीची नोंद केली. संपूर्ण भारतात १ दशलक्षहून अधिक कॅडीस उत्‍पादनांची विक्री करण्‍यात आली, ज्‍यापैकी ७० टक्‍के विक्री प्रथम श्रेणीच्‍या शहरांमधून झाली, ज्‍यामध्‍ये मुंबई, दिल्‍ली, बेंगळुरू, चेन्‍नई, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. द्वितीय श्रेणीच्‍या शहरांनी २० टक्‍क्‍यांचे योगदान दिले, तर तृतीय श्रेणीच्‍या शहरांनी ५ टक्‍के विक्रीचे योगदान दिले. देशभरातील इतर भागांमधून उर्वरित ५ टक्‍के योगदान मिळाले.

कंपनीने आपल्‍या तिमाही उत्‍पादन शिपमेंट्समध्ये ३० ते ४० टक्‍के वाढीची नोंद केली आहे. ग्राहकांची मागणी अधिक प्रमाणात कंपनीच्‍या नाविन्‍यपूर्ण व मूल्‍य-संचालित यूएसबी-सी उत्‍पादन श्रेणीला होती, जे या अपवादात्‍मक विक्री कामगिरीचे प्रमुख स्रोत ठरले. या सर्वसमावेशक लाइनअपमध्‍ये अत्‍याधुनिक, पण किफायतशीर यूएसबी-सी केबल्‍स, हब्‍स, डॉक्‍स, अॅडप्‍टर्स यांचा समावेश आहे, ज्‍यामधून एण्‍ड-टू-एण्‍ड कनेक्‍टीव्‍हीटी सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍यात येतात. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे कॅडीसची जवळपास ३० ते ४० टक्‍के विक्री रिपीट ग्राहकांकडून होती, ज्‍यामधून ब्रँडच्‍या उत्‍पादनांमधून प्रेरित त्‍यांची प्रबळ लॉयल्‍टी दिसून येते.  

कॅडीसच्‍या सह-संस्‍थापक स्‍वाती शाह म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला आमच्‍या अत्‍याधुनिक यूएसबी-सी उत्‍पादन लाइनअपप्रती ग्राहकांकडून मिळालेल्‍या सकारात्‍मक प्रतिसादाचा आनंद होत आहे. अधिकाधिक डिवाईसेस यूएसबी-सीकडे संक्रमित होत असताना आम्‍ही आमच्‍या नाविन्‍यपूर्ण, पण किफायतशीर एण्‍ड-टू-एण्‍ड नेटवर्किंग आणि कनेक्‍टीव्‍हीटी सोल्‍यूशन्‍ससह या वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी धोरणात्‍मकरित्‍या स्थित आहोत. तसेच, आम्‍ही आमच्‍या सर्व प्रमुख कनेक्‍टीव्‍हीटी सोल्‍यूशन्‍स श्रेणींमधील आमचा उत्‍पादन पोर्टफोलिओ विस्‍तारित करण्‍यास सज्‍ज आहोत.”

कॅडीसने जागतिक स्‍तरावर आपली उपस्थिती वाढवण्‍यासोबत लक्षवेधक भारतीय बाजारपेठेतील आपले स्‍थान अधिक दृढ करण्‍यावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केले आहे. कंपनी भारतभरातील फिजिकल रिटेल आऊटलेट्समध्‍ये आपले वितरण नेटवर्क झपाट्याने वाढवत आहे आणि आपले ई-कॉमर्स चॅनेल्‍स जसे वेबसाइट, कॅडीस डॉटकॉम आणि इतर प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना प्रबळ करत आहे.   

Related posts

हाऊसिंगडॉटकॉम इझीलोनमध्‍ये गुंतवणूक करणार

Shivani Shetty

सॅमसंग तंत्रज्ञान-प्रेमी भारतीय ग्राहकांसाठी एआय व हायपर कनेक्‍टीव्‍हीटी लाँच करणार: सॅमसंगचे उपाध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेएच हॅन

Shivani Shetty

भारतातील द्राक्ष व अन्य फळांच्या निर्यात वाढीसाठी ‘देहात’चा पुढाकार

Shivani Shetty

Leave a Comment