maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्ससोबत सहयोग

मुंबई, ६ मे २०२४: इझमायट्रिप या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल प्लॅटफॉर्मने प्रतिष्ठित वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्स (डब्‍ल्‍यूसीएल)ची प्रेझेन्टिंग पार्टनर म्‍हणून सहयोगाची घोषणा केली आहे. हा सहयोग क्रीडा व मनोरंजन विश्‍वातील महत्त्वाचा टप्‍पा आहे, जेथे जगभरातील चाहत्‍यांना क्रिकेटचा अद्वितीय अनुभव देण्‍यासाठी दोन प्रभावी कंपन्‍या एकत्र आल्‍या आहेत. वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्स क्रिकेटप्रती उल्‍लेखनीय योगदानांसाठी ओळखली जाते आणि प्रेझेन्टिंग पार्टनर म्‍हणून इझमायट्रिपसह लीग अधिक जागतिक मान्यता व सहभाग मिळवण्‍यास सज्‍ज आहे.

इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक निशांत पिट्टी म्‍हणाले, “आम्‍हाला वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्सची प्रेझेन्टिंग पार्टनर म्‍हणून सेवा देण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगामधून क्रीडा सर्वोत्तमतेला अधिक निपुण करण्‍याप्रती, तसेच जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी संस्‍मरणीय अनुभवांची निर्मिती करण्‍याप्रती आमची अविरत समर्पितता दिसून येते.”

वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्समध्‍ये गुंतवणूक केलेले बॉलिवुड अभिनेते अजय देवगण आपला पाठिंबा व्‍यक्‍त करत म्‍हणाले, “मी वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्सचे प्रमुख प्रेझेन्‍टर म्‍हणून इझमायट्रिपचे स्‍वागत करतो आणि मला आनंद होत आहे की, आम्‍ही आपल्‍या दिग्‍गज क्रिकेटिंग हिरोंसोबत नवीन मनोरंजनपूर्ण क्षणांची निर्मिती करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत.”

वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्सचे दूरदर्शी संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी हर्षित तोमर या सहयोगाच्‍या महत्त्वाबाबत सांगताना म्‍हणाले, “इझमायट्रिप भारतातील दुसरी सर्वात मोठी ट्रॅव्‍हल कंपनी आहे आणि क्रिकेटपासून टेनिस ते कबड्डीपर्यंत इझमायट्रिप अनेक स्‍पोर्ट्स लीगशी संलग्‍न राहिली आहे. मला विश्‍वास आहे की, इझमायट्रिपला ऑनबोर्ड करण्‍यासह डब्‍ल्‍यूसीएल अधिक प्रबळ होईल.”

क्रिकेटिंग आयकॉन आणि वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्सचे बहुमूल्‍य सदस्‍य सुरेश रैना आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, “मला डब्‍ल्‍यूसीएलमध्‍ये इंडिया चॅम्पियन्‍ससोबत सामील होण्‍याचा आनंद होत आहे. स्‍पॉन्‍सर्स म्‍हणून इझमायट्रिपसोबत डब्‍ल्‍यूसीएलचा पाया अधिक प्रबळ झाला आहे. एजबस्‍टन येथे इतर क्रिकेटिंग लीजेण्‍ड्ससोबत मैदानावर उतरून तगडी स्‍पर्धा देण्यासाठी आणि तुम्‍हा सर्वांना तेथे पाहण्‍यास अत्यंत उत्सुक आहोत.”

क्रिकेटमधील आणखी एक दिग्‍गज खेळाडू हरभजन सिंग रैना यांच्‍या मताला दुजोरा देत म्‍हणाले, “मला डब्‍ल्‍यूसीएलमध्‍ये इंडिया चॅम्पियन्‍ससोबत सामील होण्‍याचा आनंद होत आहे. सर्वकाही सुरळीत होत आहे, ईसीबीची मान्‍यता मिळाली आहे, तिकिटांच्‍या विक्रीसह उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आता स्‍पॉन्‍सर्स म्‍हणून आदरणीय ब्रँड्सचा पाठिंबा मिळत आहे. यामुळे डब्‍ल्‍यूसीएलचा दर्जा अधिक प्रबळ होत आहे.”

Related posts

पोकोने ‘एम७ प्रो ५जी’ आणि ‘सी७५ ५जी’ स्‍मार्टफोन लाँच केले

Shivani Shetty

गणेश भक्तांना करता येणार डिजिटल दान

Shivani Shetty

*एनओव्‍हीएसी ३.०: क्‍लीअरट्रिपच्‍या फ्लॅगशिप ट्रॅव्‍हल सेलचे आकर्षक डिल्‍ससह पुनरागमन* सर्वात मोठा समर ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् व हॉलिडे पॅकेजेसवरील अद्वितीय डिल्‍ससह परतला आहे! राष्‍ट्रीय, २० मार्च २०२५: समर ट्रॅव्‍हल सीझन जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आपल्‍या बहुप्रतिक्षित #NationOnVacation (एनओव्‍हीएसी) सेलच्‍या तिसऱ्या एडिशनसह परतली आहे. २० मार्चपासून सुरू होत असलेला हा ९-दिवसीय ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स आणि इतर पॅकेजेसवर सर्वात मोठ्या सूट देतो, ज्‍यामुळे ग्राहक अद्वितीय दरांमध्‍ये त्‍यांचे स्‍वप्‍नवत व्‍हेकेशन्‍स बुक करू शकतात. वर्दळीच्‍या प्रवास महिन्‍यांदरम्‍यान विमानभाडे दर किमान १५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा असताना क्‍लीअरट्रिप ग्राहक बुकिंग वर्तणूकीमधील परिवर्तनाचे नेतृत्‍व करत आहे, तसेच प्रवाशांना आधीच प्रवास योजना आखण्‍यास आणि दरांमध्‍ये वाढ होण्‍यापूर्वी सर्वोत्तम भाडेदरांचा आनंद घेण्‍यास प्रेरित करत आहे. एनओव्‍हीएसी ३.० सह क्‍लीअरट्रिप उद्योग नवप्रवर्तक म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ करत आहे, तसेच किंमतीमधील पारदर्शकता, किफायतशीरपणा आणि स्थिर प्रवास पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहक-केंद्रित नाविन्‍यतेप्रती कटिबद्ध क्‍लीअरट्रिपने ‘क्‍लीअरचॉईस’ उपक्रमांतर्गत आपल्‍या ऑफरिंग्‍ज वाढवत आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना उत्तम बुकिंग स्थिरतेचा लाभ घेता येईल. क्‍लीअरचॉईस प्‍लस व क्‍लीअरचॉईस मॅक्‍ससह ग्राहक त्‍यांच्‍या बुकिंग्‍जमध्‍ये बदल करू शकतात किंवा संपूर्ण रिफंडसह रद्द करू शकतात, ज्‍यामुळे एअरलाइन बुकिंग रद्दीकरणासाठी कोणतेही शुल्‍क आकारले जाणार नाहीत. मिंत्रा आणि फ्लिपकार्ट लॉयल्‍टी सदस्‍यांना देखील क्‍लीअरिट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्म्‍सवर विशेष सूट व ऑफर्सचा आनंद घेता येईल. या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, “क्‍ली‍अरट्रिप ट्रॅव्‍हल किंमत मॉडेल्‍समध्‍ये नाविन्‍यतेला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आगामी महिन्‍यांमध्‍ये विमानभाडे दर मोठ्या प्रमाणात वाढण्‍याची अपेक्षा असताना एनओव्‍हीएसीचे हे एडिशन प्रवाशांना सर्व स्‍तरावर पुढे राहण्‍यास मदत करण्‍याची आमची पद्धत आहे. आधीच नियोजन करत ग्राहक किंमत वाढीच्‍या अनिश्चिततेला टाळू शकतात आणि विनासायासपणे, किफायतशीर व उत्‍साहाने प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.” प्रमुख ऑफर्स: ● ९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत फ्लाइट्स ● ५९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्स ● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे लक्‍झरी हॉटेल्‍स (४- व ५-स्‍टार) ● बस बुकिंग्‍जवर जवळपास ४० टक्‍के सूट ● हॉटेल बुकिंग्‍जवर ३० टक्‍के ते ८० टक्‍के सूट ● मिंत्रा इनसाइडर आयकॉनसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस प्‍लस ● फ्लिपकार्ट व्‍हीआयपीसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स सर्व ऑफर्स उपलब्धतेच्या अधीन आहेत आणि मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत. मूल्य पारदर्शकतेला प्राधान्‍य देत एनओव्‍हीएसी ३.० चा भारतातील प्रवाशांच्‍या ट्रिप प्‍लॅनिंग करण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. लवकर बुकिंग करून प्रवासी किंमत वाढ टाळू शकतात, अधिक स्थिरता मिळवू शकतात आणि त्यांच्या पैशाचे अधिक मूल्य मिळवू शकतात. गेल्‍या वर्षी बुकिंग्‍जमध्‍ये ८० टक्‍के वाढीसह मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर क्‍लीअरट्रिप ग्राहक-केंद्रित ट्रॅव्‍हल सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याप्रती समर्पित आहे. एनओव्‍हीएसीचे तिसरे एडिशन विविध प्रवाशांसाठी उपलब्‍धता आणि किफायतशीरपणामध्‍ये अधिक वाढ करण्‍यास सज्‍ज आहे.

Shivani Shetty

Leave a Comment