मुंबई, २० डिसेंबर २०२३: फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या कॉम्पीटिटिव्ह टेस्ट प्रीपरेशन ब्रॅण्डने युजीसी नेट (युनिव्हर्सिटी ग्रॅण्ट्स कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट) जून २०२४ परीक्षेसाठी त्यांच्या ‘मिशन जेआरएफ’ (ज्युनिअर रिसर्च फेलोशिप)च्या लाँचची घोषणा केली. बॅचेसना १६ डिसेंबर २०२३ पासून सुरूवात झाली. फिजिक्सवालाचे सर्वसमावेशक युजीसी नेट ऑनलाइन कोचिंग उमेदवारांना २०२४ परीक्षेत यशस्वी होण्यास मदत करण्यासाठी उच्च-स्तरीय व्हिडिओ लेक्चर्स, इंटरअॅक्टिव्ह क्लासेस, मॉक टेस्ट्स आणि तज्ञ मार्गदर्शनासह हिंदी व इंग्रजीमध्ये २४×७ तास समस्या निवारण देते.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी भारतातील युनिव्हर्सिटीज व महाविद्यालयांमधील असिस्टण्ट प्रोफेसर आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी पात्रता निर्धारित करण्यासाठी वर्षातून दोनदा युनिव्हर्सिटी ग्रॅण्ट्स कमिशनर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टचे आयोजन करते.
फिजिक्सवालाच्या ऑनलाइन विभागाचे सीईओ अतुल कुमार म्हणाले, “युजीसी नेट परीक्षा भारतातील अध्यापन किंवा संशोधन क्षेत्रात काम करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या व्यक्तींसाठी संधीचे दरवाजे खुलण्यास मदत करते. ही परीक्षा ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या माध्यमातून संशोधन करण्यासाठी आर्थिक साह्य मिळण्याची संधी देखील देते. फिजिक्सवालाच्या युजीसी नेट यूट्यूब चॅनेलने फक्त महिनाभरात २०,००० सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करत उल्लेखनीय यश संपादित केले आहे. युजीसी नेट चॅनेलच्या सबस्क्रायबरवर्गामध्ये वाढ होत आहे. चॅनेलच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीचे श्रेय त्यांचे उच्च दर्जाचे कन्टेन्ट, तज्ञ मार्गदर्शन आणि शैक्षणिक समुदायामध्ये निर्माण केलेल्या विश्वासाला जाऊ शकते.”
‘मिशन जेआरएफ’ सिरीजमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:
पेपर १: हा पेपर सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे आणि त्यामध्ये शिक्षणातील टीचिंग अॅप्टिट्यूड, रिसर्च अॅप्टिट्यूड, रिडिंग कॉम्प्रीहेन्शन, कम्युनिकेशन स्किल्स, मॅथेमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या विषयांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी फिजिक्सवाला विद्यार्थ्यांना तयार करते.
पेपर २: हा पेपर प्रत्येक विषयासाठी विशिष्ट आहे आणि त्यामध्ये एनटीएने विहित केलेला अभ्यासक्रम समाविष्ट आहे. फिजिक्सवालाद्वारे ऑफर केलेल्या काही लोकप्रिय विषयांमध्ये कॉमर्स, इकोनॉमिक्स, एज्युकेशन आणि हिस्ट्री यांचा समावेश आहे.