maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

टर्टलमिंटने फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणसोबत केला ‘ग्रीन राईड २.०’ चा शुभारंभ

टर्टलमिंटने ‘ग्रीन राईड २.० – एक पहल स्वच्छ हवा की ओर’ या उपक्रमासाठी अभिनेता, मॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणसोबत हातमिळवणी केली आहे. या उपक्रमांतर्गत मिलिंद सोमण यांनी मुंबई ते बंगलोर अशी १००० किमीपेक्षा जास्त अंतराचा सायकलप्रवास सुरु केला आहे. वायुप्रदूषणाबाबत तसेच दळणवळणाच्या पर्यावरणस्नेही साधनांविषयी लोकांना माहिती देणे, जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हवा शुद्ध व स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे, याविषयीची जागरूकता पसरवण्यासाठी, लोकांनी वाहतुकीच्या पर्यावरणस्नेही साधनांचा वापर करावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन राईडचे आयोजन करण्यात आले आहे. टर्टलमिंट हे ग्रीन राईड २.० चे एक प्रायोजक आहेत. मिलिंद सोमण यांनी मुंबईमध्ये १९ डिसेंबर रोजी राईडला सुरुवात केली, टर्टलमिंटच्या कार्यालयात ते थोडावेळ थांबले. पुणे, बंगलोर, म्हैसूर असा प्रवास करत ते २६ डिसेंबर रोजी मंगलोरला याची सांगता करणार आहेत.

टर्टलमिंटचे सह-संस्थापक श्री. आनंद प्रभुदेसाई यांनी सांगितले, लोकांनी फिट राहावे, आपल्या रोजच्या आयुष्यात पर्यावरणस्नेही साधनांचा वापर करावा यासाठी त्यांना जागरूक करणे हा आमचा उद्देश आहे.

अभिनेते, सुपरमॉडेल श्री. मिलिंद सोमण यांनी सांगितले, “ग्रीन राईड २.० हा पर्यावरण सुरक्षा आणि संवर्धन असेच शुद्ध, हरित हवेचे महत्त्व यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी ग्रीन राईडला चांगले यश मिळाले, यंदाच्या वर्षी युवकांना त्यामध्ये सहभागी करवून घेऊन ग्रीन राईड २.० ला अजून जास्त यशस्वी करावे, अधिक जास्त सामाजिक प्रभाव निर्माण केला जावा हा आमचा उद्देश आहे..”

Related posts

पीआय ग्रीन इनोव्हेशन्सला त्यांच्या कार्बन- कटरसाठी – डिझेल जनरेटर्ससाठीचे रेट्रोफिट टाइप अप्रुव्हल सर्टिफिकेशन प्राप्त

Shivani Shetty

क्विक हीलची पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आरोग्यसेवेची भेट

Shivani Shetty

इझमायट्रिपद्वारे इझमायट्रिप फ्रँचायझीची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment