मुंबई, १६ जानेवारी २०२३: भारतातील एक सर्वात मोठी आणि सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली ईव्ही चार्जिंग सेवासुविधा प्रदान करणारी कंपनी टाटा पॉवरने ग्रेटर नोएडामध्ये सुरु असलेल्या ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये हाय-टेक चार्जिंग सेवासुविधांची विशाल श्रेणी प्रदर्शित केली आहे. देशभरात ई-मोबिलिटीचा वापर जास्तीत जास्त केला जावा यासाठी पुढील पाच वर्षात संपूर्ण देशभरात जवळपास २५,००० ईव्ही चार्जिंग पॉईंट्स सेट अप करण्याच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय योजनेची घोषणा देखील टाटा पॉवरने केली आहे. टाटा पॉवरने संपूर्ण देशभरात विस्तारलेल्या ईव्ही चार्जिंग नेटवर्क ईझी (EZ) चार्जचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी ऑटो एक्स्पो २०२३ ला भेट देण्यासाठी येणाऱ्यांनी उपलब्ध करवून दिली आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित आणि सर्वात जास्त डाउनलोड केले जाणारे एक ईव्ही चार्जिंगचे मोबाईल ऍप – टाटा पॉवर ईझी चार्ज देखील यामध्ये आहे. टाटा पॉवर ईझी चार्ज युजर्सना त्यांच्या सर्वात जवळचे चार्जिंग स्टेशन शोधण्यात, चार्जिंग पॉईंट्सच्या प्रत्यक्ष उपलब्धतेची माहिती घेण्यात, चार्जिंग स्टेटसबाबत अपडेट्स मिळवण्यात मदत करते, यामध्ये इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत जी ईव्ही चार्जिंगला खूपच सोपे आणि सुविधाजनक बनवतात.
ईव्ही चार्जिंगच्या सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र उपलब्ध करवून देण्यात टाटा पॉवर नेहमीच सर्वात पुढे असते. घर, ऑफिस, फ्लीट स्टेशन्स, सार्वजनिक ठिकाणे आणि ई-बस चार्जिंग डेपो यासारख्या कमर्शियल जंक्शन्सवर टाटा पॉवरने आपल्या चार्जिंग सुविधा उपलब्ध करवून दिल्या आहेत. ईव्ही चार्जिंग क्षेत्रात देशभर विस्तार करत असलेल्या या कंपनीने ३६०० पेक्षा जास्त सार्वजनिक आणि अर्ध-सार्वजनिक चार्जर्स व २३५०० पेक्षा जास्त घरगुती चार्जर्स सेट अप केले आहेत. यापैकी अनेक चार्जिंग स्टेशन्सवर फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देखील उपलब्ध करवून दिले आहे. टाटा पॉवरची चार्जिंग स्टेशन्स सर्व प्रमुख आणि सहजपणे पोहोचता येईल अशा ठिकाणी आहेत, जसे की, मॉल्स, हॉटेल्स, विमानतळे आणि ऑफिस कॉम्प्लेक्सेस.
श्री.वीरेंद्र गोयल, बिझनेस डेव्हलपमेंट हेड, टाटा पॉवर, ईव्ही चार्जिंग यांनी सांगितले, “भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात खूप मोठे आणि मजबूत चार्जिंग नेटवर्क असणे खूप आवश्यक आहे. टाटा पॉवरला भारतातातील आघाडीची ईव्ही चार्जिंग सेवासुविधा कंपनी बनवणारी आमची उत्पादने आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रत्येक भारतीय ग्राहकाला पर्यावरणपूरक गाड्यांचा वापर करण्यात मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि नेहमीच राहू.”
टाटा पॉवरने ईव्ही चार्जिंगसाठी सुरु केलेले सर्व उपक्रम भारत सरकारच्या राष्ट्रीय विद्युत गतिशीलता मिशन योजनेला (एनईएमएमपी) अनुसरून आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मचा वापर करताना इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधा विकसित करणे आणि इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग पॉईंट्स सहजपणे उपलब्ध करवणे या योजनेचे उद्दिष्ट आहे.