maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

गोविंदा नाम मेरा मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी भूमी पेडणेकरला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ती म्हणाली, ‘मी प्रेक्षकांच्या प्रेमासाठी जगते!’:

बॉलिवूडची तरुण स्टार भूमी पेडणेकरला गोविंदा नाम मेरा मध्ये विकी कौशलच्या विरूद्ध तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी जोरदार प्रतिसाद मिळत आहे. भूमीने ज्वलंत आणि भडक गौरी वाघमारे, विकीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे आणि यात तिच्या दिलखुलास मोठ्याने हसण्याला आणि बोलण्याला उदंड प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे!

भूमी म्हणते, “मी प्रेक्षकांच्या प्रेमासाठी जगते आणि हे इतके आनंददायक आहे की लोक नेहमीच माझ्या अभिनयाची भरभरून स्तुति करतात आणि माझ्यावर प्रेम करतात. माझ्या पदार्पणापासून, मी अशा भूमिका निवडण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांचा पडद्यावर आणि प्रेक्षकांच्या मनावर खोलवर प्रभाव पडतो आणि गोविंदा नाम मेरा मधील माझ्या अभिनयाचे कौतुक करताना पाहताना माझे उर भरून आले आहे.”

ती पुढे म्हणते, “प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारणे आणि बऱ्याच पात्रांमधून जगणे आणि स्वत: ला सतत आव्हान देणे नेहमीच मनोरंजक असते. गौरी वाघमारे ही माझ्यासाठी ती व्यक्तिरेखा आहे. ती एकदम बिनधास्त आहे. मी आयुष्यात अशी व्यक्तिरेखा कधीच अनुभवली नाही, पण अशा व्यक्तिमत्वाला अजून शक्ती लाभो.”

टॉयलेट: एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान, लस्ट स्टोरीज आणि सोन चिरिया, बाला, सांड की आँख यासारख्या चित्रपटांमध्ये तिच्या अविश्वसनीय अभिनयाबद्दल पुरस्कार आणि प्रेम जिंकणारी भूमी पुढे म्हणते, “मला वाटते की मी तिच्याशी चांगली मैत्री करू शकते कारण ती विनोदी, स्वावलंबी आणि अत्यंत स्वतंत्र आहे. मला अशा स्त्रिया आवडतात, ज्या स्वत:ला पुरुषांपेक्षा कमी लेखत नाहीत आणि मी आजवर पडद्यावर साकारलेल्या सर्वात मजेदार व्यक्तिरेखांपैकी ती एक असेल.”

येत्या 12 महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या गोविंदा नाम मेरासह 7 चित्रपटांची दमदार यादी भूमीकडे आहे. तिच्या लाइन-अपमध्ये अनुभव सिन्हाचा भीड, अजय बहलचा द लेडीकिलर, सुधीर मिश्राचा अफवा, गौरी खान निर्मित भक्षक, मुदस्सर अझीझचा मेरे हजबंड की बिवी आणि आणखी काही अघोषित प्रकल्पांचा समावेश आहे जे सिनेमाचे मापदंड पुढे ढकलतील.

Related posts

पीआय ग्रीन इनोव्हेशन्सला त्यांच्या कार्बन- कटरसाठी – डिझेल जनरेटर्ससाठीचे रेट्रोफिट टाइप अप्रुव्हल सर्टिफिकेशन प्राप्त

Shivani Shetty

कोलोरेक्टल कर्करोगाच्या रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास मोफत हेल्पलाइन

Shivani Shetty

दृश्यम 2 ने दुस-या दिवशी एकूण 36.97crs कमावत प्रचंड वाढ दाखवली!

Shivani Shetty

Leave a Comment