मुंबई, ८ नोव्हेंबर २०२२: संजय घोडावत ग्रुप (SGG) ची कॉर्पोरेट सोसिअल रेस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर – CSR) शाखा, संजय घोडावत फाऊंडेशनचे (एसजीएफ – SGF) अध्यक्ष श्री. संजय घोडावत यांना अलीकडेच कॉर्पोरेट सोसिअल रेस्पॉन्सिबिलिटी, शाश्वतता आणि सामाजिक प्रभाव यातील प्रभावी योगदानाबद्दल अहिंसा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
राजभवन, मुंबई येथे आयोजित अहिंसा विश्व भारती आणि जागतिक शांतता केंद्राच्या स्थापना दिन सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार समारंभास प.पू. आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, संस्थापक अध्यक्ष ‘अहिंसा विश्व भारती’ आणि श्री. पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री वाणिज्य आणि उद्योग; केंद्रीय मंत्री ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि केंद्रीय मंत्री वस्त्रोद्योग, भारत सरकार हे मान्यवर उपस्थित होते.
एसजीएफ ने श्री. संजय आणि श्री. साजन शाह, मेमरी मॅन ऑफ इंडिया सारख्या परोपकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विविध कार्यक्रमांमध्ये लक्षणीय सेवाकार्य केले आहे. कोव्हीड साथीच्या दरम्यान, लॉकडाऊनमुळे विस्थापित झालेल्यांना ५ लाखांहून अधिक अन्न पाकिटांचा वाटप केला आहे. अनेक दिवस एकत्र अडकलेल्या अनेक स्थलांतरितांना अन्नाची पाकिटे, पिण्याचे पाणी आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात देण्यात आलेल्या मदतीमुळे दिलासा मिळाला.
एसजीएफ ने अतिग्रे (कोल्हापूर) येथे तज्ञ डॉक्टर, जीवरक्षक उपकरणे आणि व्यावसायिक आरोग्य सेवा सुविधांसह एक पूर्ण विकसित कोविड केअर सेंटर चालवले. या केंद्रात ३०,००० हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. संजय घोडावत विद्यापीठाच्या सहकार्याने त्यांच्या वसतिगृहांच्या सुविधांचा वापर या उदात्त कार्यात करण्यात आला.
एसजीएफने माऊली वृद्धाश्रमाचा कार्यभार देखील आपल्या हाती घेतला आहे. आपल्या घरातून विस्थापित झालेल्या अनेक वृद्धांना माऊलीचा आरामाचा आश्रय वाटतो. एसजीएफ गेले वर्षभर वृद्धाश्रममध्ये सर्व आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असण्याचे सुनिश्चित करत आणि अधिक वृद्धांना आश्रय देण्यासाठी ते विस्तारित करण्याचा विचार करत आहे.
एसजीएफ ने वेळोवेळी समाजाच्या भल्यासाठी अनेक कारणांसाठी मदत केली आहे. ३ लाखांहून अधिक झाडे लावणे असो किंवा विविध उपक्रमांद्वारे कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्त भागांना मदत करण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्याच्या योजनांचे नियंत्रण करण्यात अग्रगण्य राहिले आहे.
तरुणांसाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व, श्री. संजय, समाजाकडून योग्यरित्या कमावले जाते ते समाजाला परत देण्यावर विश्वास ठेवतात. ते म्हणतात, “प्रतिष्ठित अहिंसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि मला अतिशय नम्र वाटत आहे आणि हे एसजीएफ टीमने लोकांसाठी केलेले कठीण परिश्रमाचा आणि प्रयत्नांचा एक पुरावा आहे. धर्मादाय, परोपकार, इतरांचे उत्थान, इत्यादी हे खरे दागिने आहेत जे प्रत्येक यशस्वी व्यक्तीने परिधान केले पाहिजेत. ते ज्या प्रकारचे सकारात्मक तेज निर्माण करते ते केवळ इतरांच्या जीवनात परिवर्तनात्मक बदल घडवून आणत नाही तर तुम्हाला सर्वोच्च पातळीचे समाधान देखील देते जे जगातील इतर कोणतीही भौतिकवादी गोष्ट देऊ शकत नाही. लक्षात ठेवा, परोपकाराची शक्ती अफाट आहे आणि त्याचे परिणाम नेहमी संख्येच्या पलीकडे असतात.
एसजीएफ ने हाती घेतलेल्या इतर काही उपक्रम:
सर्वात जास्त गरज असल्यानं सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत देणे
एसजीएफ व्यवस्थापनांतर्गत ‘आचार्य श्री तुलसी रक्तपेढी’ ही उपकरणे, पायाभूत सुविधा आणि काळजी या गुणवत्तेमुळे भारतातील शीर्ष तीन रक्तपेढ्यांमध्ये गणली गेली आहे.
एसजीएफ कोल्हापुरात स्वयं-अर्थसहाय्यित ‘कन्या महाविद्यालय’ चालवते आणि १९९५ पासून ५२ गावांतील ६००० हून अधिक मुलींना शिक्षण दिले आहे.
कोल्हापूर (महाराष्ट्र) च्या आजूबाजूच्या गावांमध्ये ५० हून अधिक जैव-शौचालये उभारणे.
संजय घोडावत ग्रुप बद्दल
संजय घोडावत ग्रुप (एसजीजी-SGG) हा एक प्रमुख भारतीय व्यावसायिक समूह आहे ज्याची विविध उच्च-मूल्याच्या व्यवसायात उपस्थिती आहे. विमानचालन, ग्राहक उत्पादने, शिक्षण, ऊर्जा, खाणकाम, रियल्टी, रिटेल आणि टेक्सटाइल ही त्याची काही प्रमुख व्यवसाय डोमेन आहेत. एसजीजी ची स्थापना १९९३ मध्ये झाली आणि तेव्हापासून संस्थापक आणि अध्यक्ष, श्री संजय घोडावत यांच्या उत्कृष्ट कारभारीखाली त्याची प्रभावी वाढ झाली आहे. त्याचा जागतिक स्तरावर लाखो ग्राहकांचा मजबूत आधार आहे, १०,०० पेक्षा जास्त कर्मचारी संख्या आहे आणि १६,००० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे. एसजीजी मोठ्या जोमाने पुढे जात आहे आणि उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीसह लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहे.