maharashtraprimenews
ठळक बातम्या
ठळक बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईसंपादकीयसांस्कृतिक

कच्छची गानकोकिळा, गुजरातची सर्वोत्तम आणि अव्वल लोकगायिका ‘गीता रबारी’ नवरात्रोत्सवामध्ये पहिल्यांदाच मुंबईत…

मुंबई ०३ सप्टेंबर २०२३

भाजप नेते मूरजीभाई पटेल यांच्या द्वारेआयोजित अंधेरी परिसरातील ‘छोगाळा रे नवरात्रोत्सवा’मध्ये दिसणार हिंदू संस्कृतीची एकजुटता

अंधेरी परिसरात होणारा नवरात्रोत्सव हा मुंबई शहरातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव ठरणार आहे. कारण कच्छची अव्वल लोकगायिका गीता रबारी आणि मराठी मातीचा गंध असलेला दमदार गायक सनी जाधव आपल्या सादरीकरणाद्वारे लोकांचे मन जिंकणार आहे. गीता रबारी यांना कच्छची गानकोकिळा म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दरवर्षी नवरात्रोत्सवात गीता रबारी कुठे सादरीकरण करणार आहे, याची उत्सुकता लोकांमध्ये असते त्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोक आसुसलेले असतात. आता ही संधी मुंबईकरांना मिळणार आहे. त्यांना ऐकण्याची आणि त्यांच्यासोबत थिरकण्याची संधी रसिकांना आणि भाविकांना प्राप्त होणार आहे. म्हणूनच मुंबईतील अंधेरी येथे होणारा यंदाचा ‘छोगाळा रे नवरात्रोत्सव’ अभूतपूर्व आणि अनोखा ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते श्री. मूरजीभाई पटेल यांनी या अद्वितीय नवरात्रीचे आयोजन केले आहे.

या नवरात्रीच्या नियोजनाबाबत अधिक माहिती देताना भाजप नेते श्री. मूरजीभाई पटेल म्हणाले की, “मुंबई शहरात अनेक नवरात्रीचे कार्यक्रम होत असतात, पण आम्ही मुंबईकरांना आणि विशेषत: अंधेरीत राहणाऱ्या लोकांना पारंपरिक नवरात्रीची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये सूर, ताल आणि लय हे पारंपारिक धाटणीचेच असतील. तसेच हा सांस्कृतिक मिलाफ देखील ठरणार आहे. आम्ही अंधेरीतील होली फॅमिली हायस्कूलच्या मैदानात ‘छोगाळा रे नवरात्री’चे आयोजन केले आहे. आमचे प्रेरणास्रोत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष श्री. आशिष शेलारजी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढाजी आणि ईशान्य मुंबईचे खासदार श्री. मनोज कोटकजी यांचे देखील मी विशेष आभार मानतो.”

अंधेरीत पहिल्यांदाच एवढ्या भव्य नवरात्रीचे आयोजन करण्यात येत आहे, हे विशेष. या नवरात्रोत्सवात दररोज हजारो लोक सहभागी होणार आहेत. नेते, अभिनेते, रंगकर्मी आणि मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. लोकांच्या सोयीसाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे खाण्यापिण्याची व्यवस्था, कार पार्किंग, गरबा खेळण्यासाठी विस्तृत जागा, सुरक्षेच्या बाबतीत कडक बंदोबस्त करण्यात आला आहे तसेच सर्व प्रकारची सुविधा देखील लोकांना प्राप्त होणार आहे.

पत्रकार परिषदेत नवरात्रोत्सवाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गीता रबारी म्हणाल्या, “मी माझ्या कारकिर्दीमध्ये देश-विदेशातील अनेक नवरात्रोत्सवांमध्ये कार्यक्रम सादर केले आहेत, मात्र नवरात्रीमध्ये मुंबईत कार्यक्रम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मला खात्री आहे की मुंबईतील लोक या नवरात्रीचा पुरेपूर आनंद लुटतील. महाराष्ट्रातील लोकांसमोर कार्यक्रम सादर करण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. महाराष्ट्राची भूमी ही संतांची, शूरांची आणि कलेची भूमी आहे. या निमित्ताने मुंबई शहरात सर्वात भव्य नवरात्रीचे आयोजन केले आणि त्यामध्ये मला सादरीकरणाची संधी दिली याबद्दल मी भारतीय जनता पक्ष आणि श्री. मूरजीभाई पटेल यांचे आभार मानते.”

अंधेरीमध्ये विविध भाषिक राहतात आणि सण-उत्सवामध्ये त्यांची एकजुटता स्पष्ट दिसून येते. नवरात्री उत्सव हा हिंदू संस्कृतीचा महत्वाचा सण आहे. या उत्सवात विविध भाषेचे लोक एकत्र येतात, कोणताही भेद न होता सांस्कृतिक एकात्मता या उत्सवातून दिसून येते. त्यामुळे अंधेरी येथे श्री. मूरजीभाई पटेल यांनी आयोजित केलेला नवरात्रोत्सव मुंबईकरांसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी देखील औत्स्युक्याचा विषय ठरणार आहे. यंदा अंधेरीतील निवासी गीता रबारी आणि सनी जाधव यांच्या तालावर गरबा खेळत मनसोक्त थिकरणार आहेत.

छोगाला रे…नवरात्रोत्सवाचे तपशील.

प्रेरणास्रोत : उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस.
आयोजक: श्री. मूरजीभाई पटेल.
गायिका : गीता रबारी आणि सनी जाधव
नवरात्रोत्सव दिनांक: १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर
वेळ: संध्याकाळी ७:०० ते रात्री १०:०० पर्यंत.
स्थळ: होली फॅमिली हायस्कूल मैदान, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी पूर्व, मुंबई

Related posts

एबीडी ने प्रिमियमायझेशन मध्ये पुढाकार घेत मिलेनियलस साठी X&O Barrel Premium Whisky लाँच केली.

Shivani Shetty

अपग्रॅड चार शहरांमध्ये विस्तार करणार

Shivani Shetty

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड तर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

Shivani Shetty

Leave a Comment