जागतिक मूळ उपकरण उत्पादकांना टर्न की सोल्यूशन्ससह उत्पादन विकास आणि डिजिटल सुविधा सादर करणारी आघाडीची जागतिक अभियांत्रिकी सेवा कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे दाखल केला आहे.
कंपनीची प्राथमिक समभाग विक्री ९५,७०८,९८४ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरद्वारे रोख रकमेसाठी (“इक्विटी शेअर्स”), त्याच्या पेड-अप शेअर कॅपिटलच्या (“आयपीओ”) अंदाजे २३.६०% प्रतिनिधित्व करते.
विक्रीच्या ऑफरमध्ये (अ) टाटा मोटर्स लिमिटेडचे ८१,१३३,७०६ पर्यंतचे इक्विटी शेअर्स, (ब) अल्फा टीसी होल्डिंग्ज पिटीई लिमिटेड द्वारे ९,७१६,८५३ पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि (क) टाटा कॅपिटल ग्रोथ फंड I द्वारे ४,८५८,४२५ पर्यंतचे इक्विटी शेअर्स असे प्रत्येक टाटा टेक्नॉलॉजीजच्या पेड-अप शेअर कॅपिटलचे अनुक्रमे २०%, २.४०% आणि १.२०% पर्यंत प्रतिनिधित्व करतात.
टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही जागतिक मूळ उपकरण उत्पादकांना (“ओईएम”) आणि त्यांच्या टियर १ पुरवठादारांना टर्न की सोल्यूशन्ससह उत्पादन विकास आणि डिजिटल सुविधा सादर करणारी आघाडीची जागतिक अभियांत्रिकी सेवा कंपनी आहे. कंपनीकडे ऑटोमोटिव्ह उद्योगात सखोल डोमेन कौशल्य असून एरोस्पेस आणि वाहतूक आणि बांधकाम अवजड यंत्रसामग्री यांसारख्या संबंधित उद्योगांमध्ये ग्राहकांना सेवा देण्यासाठी या कौशल्याचा लाभ घेतला जातो. Zinnov ने २०२१ पर्यंत जागतिक अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास (“ER&D”) खर्च अंदाजे १.६४ ट्रिलियन डॉलर असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि २०२५ पर्यंत तो अंदाजे २.२८-२.३३ ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस आणि विद्युतीकरण सेवा यासारख्या अनेक क्षेत्रांसाठी झिनोव्हतर्फे टाटा टेक्नॉलॉजीजला डोमेन तज्ञ आणि अग्रणी म्हणून ओळखले गेले आहे.
फर्मने डिसेंबर २०२१ ला संपलेल्या नऊ महिन्यांसाठी २,६०७.३० कोटी रुपयांच्या तुलनेत १५.५% ची वाढ दर्शवत डिसेंबर २०२२ ला संपलेल्या नऊ महिन्यांसाठी ३,०११.७९ कोटी रुपयांच्या कामकाजातून मिळालेल्या महसुलाची नोंद केली. आर्थिक वर्ष २२ च्या नऊमाहीसाठीच्या ३३१.३६ कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ च्या नऊमाहीसाठी निव्वळ नफा ४०७.४७ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २० मधील १६.५०% पासून आर्थिक वर्ष २३ च्या नऊमाहीमधील १९.२०% पर्यंत कंपनीचे समायोजित EBITDA मार्जिन गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढत आहे.
जेएम फायनान्शियल लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.