maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsPublic InterestTravel

देशात पर्यटनाला चालना देण्‍यासाठी इझमायट्रिपचा झेक टुरिझमसह सहयोग

मुंबई, ४ सप्टेंबर २०२३: इझमायट्रिपडॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक व्‍यासपीठाला झेक टुरिझमसोबत सहयोगाने परिवर्तनशील सहयोगी मोहिमेचा शुभारंभ करण्‍याचा आनंद होत आहे. या डायनॅमिक सहयोगाचा लक्‍झरी प्रवास अनुभवांमधील मर्यादांना दूर करण्‍याचा, तसेच झेकियाच्या लक्षवेधक लँडस्केप्‍स व सांस्कृतिक खजिन्याला प्रकाशझोतात आणण्‍याचा मनसुबा आहे.

इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक श्री. निशांत पिट्टी म्‍हणाले. “आम्‍ही झेक टुरिझमसोबत सहयोगाने उत्‍साहात हा प्रवास सुरू करत आहोत. झेकियाचा पारंपारिक वारसा दाखवण्‍यासाठी आमचा समान दृष्टीकोन पर्यटकांना देशाचा संपन्‍न वारसा अनुभवण्‍याची संधी देतो. ही मोहिम ग्राहकांना असाधारण अनुभव देण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेशी संलग्‍न आहे.

मार्केटिंग व फॉरेन ऑफिसेसचे संचालक श्री. फ्रॅन्टिसेक रेसम्युलर म्‍हणाले, “झेक टुरिझम काही विरामानंतर भारतातील आपल्‍या कार्यसंचालनांना पुन्‍हा सुरू करत आहे. झेक टुरिझमचा भारतीय ग्राहकांमध्‍ये गंतव्‍याबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍याचा उद्देश आहे. भारतापासून प्रागपर्यंत प्रत्‍यक्ष विमानसेवा सुरू करण्‍याला प्रमुख प्राधान्‍य देण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे जलद विमान प्रवास सेवा उपलब्‍ध होऊ शकेल. झेकिया आकर्षक स्‍थळ आहे, ज्‍यामुळे भारतीय पर्यटक मोठ्या संख्‍येने युरोपमध्‍ये पर्यटनाचा आनंद घेण्‍यास येतील अशी अपेक्षा आहे.”

या सहयोगाचा पर्यटनामध्‍ये नवीन अध्‍यायाची सुरूवात करण्‍याचा मुख्‍य उद्देश आहे, जो झेकियाच्‍या संपन्‍न परंपरा, लक्षवेधक लँडस्‍केप्‍स व ऐतिहासिक आश्‍चर्यांना प्रशंसित करेल. या सहयोग पर्यटकांना झेकियाच्‍या लक्षवेधक सांस्‍कृतिक वारसाचा अनुभव देण्‍यासह त्‍यांच्‍यामध्‍ये उत्‍सुकता व साहसाची भावना जागृत करेल तसेच त्‍यांना संस्‍मरणीय पर्यटनाचा आनंद घेण्‍यास प्रेरित करेल.

ही उल्‍लेखनीय मोहिम सहयोगाचे प्रतीक आहे, तसेच इझमायट्रिपच्‍या उत्तम कौशल्‍याला झेक टुरिझमच्‍या संपन्‍न वारसासह एकत्र करते. या दोन्‍ही कंपन्‍या गंतव्‍याबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यासाठी अथक मेहनत घेतील, तसेच पर्यटकांना झेकियामधील विविध ऑफरिंग्‍जबाबत माहिती देतील.

Related posts

बीएलएस इंटरनॅशनल स्‍लोवाकियासाठी व्हिसा सेवा देणार

Shivani Shetty

इझमायट्रिपची इको हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक

Shivani Shetty

भारतभरातील अॅप्रेन्टिसशीप संधींमध्‍ये ७५ टक्‍क्‍यांची वाढ: टीमलीज

Shivani Shetty

Leave a Comment