maharashtraprimenews
ठळक बातम्या
AviationBreaking newsPublic Interest

लुफ्थान्साद्वारे दिल्ली ते जर्मनीशी थेट संपर्काचा हीरक महोत्सव साजरा

मुंबई, ३ सप्टेंबर २०२३: जवळपास अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळाच्या संबंधांसह लुफ्थान्सा जर्मन एअरलाइन्स भारतीय राजधानीला जर्मनीशी जोडण्याचा हीरक महोत्सव साजरा करत आहे. दरम्यान लुफ्थान्सा समूहाचे ग्लोबल मार्केट्स आणि स्टेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष फ्रँक नेव्ह यांनी दिल्लीवरून फेबल्ड ए३८० आणि फर्स्ट क्लास सेवा परत आल्याची घोषणा केली.

जर्मनी आणि दिल्ली या दोन ठिकाणांना १ सप्टेंबर १९६३ पासून जोडणारी पहिली बोईंग ७२० फ्लाइट फ्रँकफर्टवरून रोम, कैरो, कुवेत आणि कराची येथे थांबून दिल्लीतल्या उबदार वातावरणात उतरली. तिने हे राजधानीचे शहर आणि जर्मनीच्या संघराज्य प्रजासत्ताकांना एकमेकांशी जोडले. भारताच्या विकासावर विश्वास ठेवणाऱ्या लुफ्थान्साने सहा दशकांपासून अगदी मजबूत नाते ठेवले आहे आणि या दोन्ही देशांच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासात मोठे योगदान दिले आहे.

मागील ६० वर्षांत जग खूप बदलले आहे. परंतु जर्मनी आणि भारत या दोन देशांमधील नाते अत्यंत सुंदर पद्धतीने बहरले आहे. सहा दशकांपूर्वी दिल्ली एक वेगळे स्थान होते आणि आज पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या, एपीएसीमध्ये सर्वाधिक वेगवान जीडीपी दर असलेल्या आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या हवाई बाजारपेठ असलेल्या देशाची ही राजधानी आहे. जागतिकीकरण, आंतरसंबंध आणि जागतिक व्यापार यांच्यामुळे आधुनिक जर्मनी व भारत आर्थिक शक्तिशाली केंद्रे ठरलेले आहेत आणि ते एकत्रितरित्या पृथ्वीवरील पाचपैकी दोन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांचे प्रतिनिधीत्व करतात.

लुफ्थान्सा ग्रुपकडे देशात सध्या १००० कर्मचारी आहेत आणि त्यांनी भारतात आठवड्यात ६४ विमान उड्डाणांची घोषणा केली आहे. भारत ही पहिली आंतरखंडीय बाजारपेठ होती, जिने बंगळुरू-म्युनिच आणि हैदराबाद-फ्रँकफर्ट या मार्गांसह जागतिक साथीच्या आधीच्या काळातील पातळ्या गाठल्या आहेत. ए३८० परत येणे आणि फर्स्ट क्लास दिल्लीसाठी पुन्हा सुरू करणे या गोष्टी भारतासोबतच्या त्यांच्या शक्तिशाली नात्यांचा नैसर्गिक विस्तार आहेत.

भारताच्या विकासावर सर्वप्रथम विश्वास ठेवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेली लुफ्थान्सा ही भारताप्रती वचनबद्ध आहे आणि आणखी ६० वर्षे नाते व वाढ सखोल होण्यासाठी वचनबद्ध आहे.

Related posts

कन्‍फर्मतिकिटचा आयसीसीसह सहयोग

Shivani Shetty

इकोफायचा मोंट्रा इलेक्ट्रिकसोबत सहयोग

Shivani Shetty

लोकमत मुंबई महा मॅरेथॉनच्या ७ व्या आवृत्तीसाठी ८००० हून अधिक नोंदणी लोकमत मीडियाचा एक उपक्रम लोकांना धावण्यासाठी मोटिव्हेट व्हावे म्हणून डिझाइन करण्यात आला आहे

Shivani Shetty

Leave a Comment