maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ठाण्यातील सर्वात मोठे क्लबहाऊस रेमंड रियल्टीने रहिवाशांसाठी खुले केले

ठाणे, २० डिसेंबर २०२३: रेमंड समूहाचा रिअल इस्टेट उपक्रम, रेमंड रियल्टीसाठी आज एक महत्त्वाचा दिवस आहे. ठाण्यातील टेन एक्स हॅबिटॅटच्या पहिल्याच प्रकल्पाच्या सर्वात मोठ्या क्लबहाऊसचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे, संपूर्ण टेन एक्स हॅबिटॅट प्रकल्प पूर्ण होण्याआधीच या क्लबहाऊसचे उद्घाटन झाले आहे. क्लबहाऊस आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या प्रकल्पातील दहा पैकी तीन टॉवर डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाले आणि ते रेराच्या टाइमलाईनपूर्वी २४ महिने आधीच राहण्यासाठी उपलब्ध केले गेले.

गौतम हरी सिंघानिया, अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक, रेमंड समूह म्हणाले,”आजचा दिवस रेमंड रियल्टीसाठी अभिमानाचा क्षण आहे कारण केवळ घरेच नव्हे तर उत्साही समुदाय निर्माण करण्याच्या आमच्या वचनाला आम्ही जागतो. हे भव्य क्लबहाऊस लोकांना एक स्पेस देईल. येथे लोकांसाठी नवनवीन आठवणी निर्माण होतील तसेच त्यांची जीवनशैली निरोगी राहण्यासाठी हे मदत करेल.”

५१००० चौरस फुटांवर पसरलेले, हे नव्याने उद्घाटन केलेले क्लबहाऊस ठाण्यातील सर्वात मोठे आणि हिरवेगार आहे. रहिवाशांच्या वैविध्यपूर्ण आवडी आणि प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेल्या अनेक सुविधा येथे आहेत. भव्य क्लबहाऊसमध्ये एक बहुउद्देशीय हॉल, क्रीडाप्रेमींसाठी स्क्वॅश आणि बॅडमिंटन कोर्ट, चित्रपट प्रेमींसाठी थिएटर, अत्याधुनिक फिटनेस उपकरणांनी सुसज्ज आधुनिक व्यायामशाळा आणि विश्रांतीसाठी एक स्विमिंग पूल आहे. अशा प्रकारच्या काही पहिल्या सुविधांमध्ये कॅटरिंग किचनचा समावेश होतो जे सामुदायिक स्वयंपाकघर म्हणून काम करते. रहिवाशांना त्यांच्या पाहुण्यांसाठी मोठ्या जागेत जेवण बनवण्याची सोय यामुळे उपलब्ध होते. क्लबहाऊस टेन एक्स हॅबिटॅटमधील सामाजिक आणि मनोरंजक क्रियाकलापांचे केंद्रबिंदू म्हणूनच कार्य करेल. या पहिल्याच अनोख्या उपक्रमात, ज्या ग्राहकांना त्यांच्या फ्लॅटचा ताबा मिळू शकला नाही ते देखील क्लबहाऊस सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे टेन एक्स हॅबिटॅट समुदायातील प्रत्येक सदस्याला सुविधांचा लाभ घेता येईल आणि सर्वांगीण जीवनाचा अनुभव घेता येईल.

Related posts

मुंबई, पुण्याला बसला सायबरधोक्‍यांचा सर्वाधिक फटका: क्विक हील

Shivani Shetty

स्वयंचलित निदानप्रक्रियेला वेग देत अॅबॉटने भारतातील प्रयोगशाळांसाठी आणली आहे GLP सिस्टीम्स ट्रॅक यंत्रणा

Shivani Shetty

कतरिना कैफ बनली ‘रॅडो’ची ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर

Shivani Shetty

Leave a Comment