मुंबई, मार्च 07, २०२४– जागतिक आरोग्यसेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अॅबॉटने (Abbott) निदानकेंद्रांकडे चाचण्यांसाठी येणाऱ्या नमुन्यांची मोठी संख्या हाताळण्यास मदत करणाऱ्याGLP सिस्टीम ट्रॅक या अभिनव स्वयंचलित उपाययोजनेचा शुभारंभ केल्याची घोषणा आज केली. भारत हा आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे, आणि या लोकसंख्येवर वाढत्या दुर्धर आजारांचा मोठा भार आहे. परिणामी २०२१ आणि २०२६ दरम्यानच्या काळात भारतीय निदानसेवा क्षेत्राची ११ टक्के ते १२ टक्के वार्षिक विकासदराने वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. अॅबॉटचे प्रयोगसिद्ध सरस तंत्रज्ञान अधिक लवचिकता देऊ करते व निदानसेवेची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी निदानकेंद्रांना जास्तीत-जास्त चांगली कामगिरी करण्यास व आपली कार्यक्षमता वाढविण्यास मदत करते.
गेल्या अनेक वर्षांपासून निदानसेवा पुरविणाऱ्या प्रयोगशाळांची गरज वाढली आहे. आजघडीला वैद्यकीय निर्णयांपैकी ७० टक्के निर्णय हे चाचण्यांच्या परिणामांवर अवलंबून असतात अॅबॉटच्या GLP सिस्टीम ट्रॅकमुळे निदानकेंद्रांच्या प्रयोगशाळेतील काम स्वयंचलित पद्धतीने पार पाडले जाईल व त्यामुळे वैद्यकीय देखभालीची उपलब्धता आणि दर्जा या दोहोंतही वाढ होण्यास मदत होईल. ही ऑटोमेशन उपाययोजना अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि श्रीनगर येथे बसविण्यात आली आहे.
“आज, आरोग्येसेवाक्षेत्राची स्थिती सातत्याने बदलत आहे. अशा काळात कार्यक्षम राहण्यासाठी आणि स्पर्धात्मकता टिकविण्यासाठी निदानकेंद्रांनी आपल्या क्षमता वाढवणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांना बदलती परिस्थिती प्रभावीपणे हाताळता यावी. इत्यंभूत उपाययोजना पुरविण्याची आमची पद्धत आरोग्यसेवेच्या गुंतागूंतीच्या समीकरणातील प्रत्येक बाजूची काळजी घेते व ऑटोमेशन या सेवेच्या केंद्रस्थानी आहे.”अॅबॉट इंडियाच्या डायग्नोस्टिक्स विभागाचे जनरल मॅनेजर आणि कंट्री हेड जमशेद पत्रावाला म्हणाले. “यामुळे चाचणी क्षमता वाढण्यास मदत होईल व त्यायोगे देशाच्या आरोग्यव्यवस्थेसमोरील खडतर आव्हाने दूर होऊन अधिक शाश्वत पद्धतीची कामकाजाची पद्धत निर्माण होऊ शकेल.”
ही सेवा सुरू करत आरोग्यसेवेचा दर्जा आणि संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर यात संतुलन साधण्याचे अॅबॉटचे उद्दीष्ट आहे. देखभालीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्थांमध्ये, प्रयोगशाळेचा आकार आणि तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या यांनुसार ही स्वयंचतिल यंत्रणा प्रतिदिनी भरपूर टेस्ट ट्यूब्ज हाताळू शकते. GLP सिस्टीम्समुळे माणसांकडून केली जाणारी किमान ८० टक्के कामे स्वयंचलित पद्धतीने होत असल्याने मानवी चुकांचे प्रमाणही कमीत-कमी राहते. ऑटोमेशन उपाययोजनांमुळे प्रयोगशाळेत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेमध्येही वाढ होते. कारण त्यांचा रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांशी कमीत-कमी संपर्क येतो व जैववैद्यकीय कचऱ्याशी येणारा संपर्कही टाळला जातो.
“अॅबॉटचे GLP सिस्टीम्स ट्रॅक आम्हाला कार्यक्षम कार्यप्रवाहांना पाठिंबा देण्यासाठी विश्वासार्ह उपाययोजना देऊ करते. लॅबोरेटरी लेआऊट्सच्या व्यापक श्रेणीला पाठिंबा देण्यासाठी आणि चाचण्यांच्या मागणीत बदल झाल्यास सेवेमध्ये लवचिकपणे बदल करण्यासाठी गरजेनुसार त्वरित ट्रॅक डिझाइन व असे अनेक फायदे या सेवेबरोबर मिळतात. त्याचा अत्यंत साधा यूजर इंटरफेस आणि स्मार्ट सॉफ्टवेअर रचना यामुळे कामकाजाच्या कार्यक्षमतेला पाठबळ मिळते. यामुळे कार्यान्वयन आणि उत्पादकतेमध्ये सुधारणा होते व महत्त्वाच्या चाचण्यांचे निकाल योग्यवेळीफिजिशियन्सच्या हाती पोहोचण्यास मदत होते. हे निकाल त्यांना निकाल घेण्यासाठी व रुग्णांना अधिक चांगली सेवा पुरविण्यास मदत करतात,” असे न्यूबर्गचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप शाह म्हणाले.
ऊर्जास्नेही तंत्रज्ञानासह ही विस्तारक्षम स्वयंचलित उपाययोजना कार्यान्वयनामध्ये शिस्त आणून आणि नमुने हाताळण्याच्या प्रक्रियेचे सुलभीकरण करून प्रयोगशाळांच्या प्रत्येक कामाची कार्यक्षमता वाढविते. परिणामी या यंत्रणेमुळे सेवा दर्जा वाढतो आणि कमीत-कमी संसाधनांचा वापर करत शाश्वत भविष्य घडविण्याच्या कामीही तिचे योगदान मिळते.
next post