maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

मुंबई, पुण्याला बसला सायबरधोक्‍यांचा सर्वाधिक फटका: क्विक हील

मुंबई, २४ सप्टेंबर २०२३: मुंबई, पुण्यासह कोलकाता आणि दिल्ली या भारतातील प्रमुख शहरांमध्ये सायबरगुन्‍ह्यांच्‍या प्रमाणात व्‍यापक वाढझाल्‍याचे क्विक हीलच्‍या सेक्‍यूराइट लॅब्‍सच्‍या अहवालामधून निदर्शनास आले आहे. २०२३च्‍या दुसऱ्या तिमाहीमध्‍ये प्रभावित अव्‍वल १० शहरांपैकी, निदर्शनास आलेल्‍या सायबरधोक्‍यांच्‍या आकडेवारीनुसार कोलकाता ७.०८ दशलक्ष सायबरधोक्‍यांसह यादीमध्‍ये अव्‍वलस्‍थानीहोते, ज्‍यानंतर ७.०० दशलक्ष सायबरधोक्‍यांसह मुंबईचा क्रमांक होता.

यादीमध्‍ये समाविष्‍ट इतर शहरे होती बेंगळुरू (४.८६ दशलक्ष सायबरधोके), सुरत (४.१६ दशलक्ष सायबरधोके), हैदराबाद (३.५० दशलक्ष सायबर धोके), अहमदाबाद (३.४५ दशलक्ष सायबरधोके), चेन्‍नई (२.३६ दशलक्ष सायबरधोके) आणि गुरगाव (२.०१ दशलक्ष सायबरधोके). एप्रिल ते जून २०२३ कालावधीसाठी भारतातील सायबरधोक्‍यांबाबत क्विक हीलच्‍या सर्वसमावेशक अहवालामधून निदर्शनास आले की, लॅपटॉप व पीसींवर प्रत्‍येक दिवशी शोधण्‍यातआलेल्‍या १ दशलक्षहून अधिक सायबरधोक्‍यांचे व्‍यापक संशोधन व विश्‍लेषणामधून या निष्‍पत्ती समोर आल्‍या आहेत. तसेच अहवालामधून निदर्शनास आले की, देशभरातील सेक्‍यूराइट लॅब्‍स तज्ञांनी १०२.८ दशलक्षहून अधिक सायबरधोके शोधले.

सायबरसिक्‍युरिटी क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे, त्‍याचप्रमाणेसायबरगुन्‍हेगार देखील गुन्‍हे करण्‍याच्‍या अत्‍याधुनिक पद्धतींचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. २०२३ च्‍या दुसऱ्या ति‍माहीत सेक्‍यूराइट लॅब्‍स संशोधकांना या सायबरगुन्‍हेगारांनी विविध व्‍यासपीठांवर अॅप्‍लीकेशन्‍सवर वापरलेल्‍या नाविन्‍यपूर्ण टेक्निक्‍समध्‍ये मोठी वाढ दिसून आली. निदर्शनास आलेले सर्वात मोठे ट्रेण्‍ड म्‍हणजे हिडन अॅड्स, ज्‍यांचागुगल प्‍लेवरील अँड्रॉईड गेमिंग अॅप्‍सच्‍या माध्‍यमातून प्रसार होत आहे. ओळख समजू नये म्‍हणून हुशारीने आयकॉन्‍सचा समावेश करण्‍यात आलेल्‍या या जाहिराती अॅप्‍समध्‍ये प्रवेश करतात आणि अज्ञात डोमेन्‍समधून यादृच्छिक जाहिराती दाखवत युजर अनुभवावर परिणाम करतात.

क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लि. वापरकर्त्यांना कायदेशीर वाटणाऱ्या अशा बनावट अॅप्सपासून सावध राहण्याची चेतावणी देत आहे. हे फसवे अॅप्लिकेशन फेसबुक किंवा गुगल क्रेडेन्शियल्स, जीपीएस लोकेशन्स ट्रॅक करणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि हिडन सर्व्हरवर डेटा ट्रान्समिट करणे यांसारखी संवेदनशील माहिती चोरू शकतात.

 

Related posts

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचा मुंबईत विस्तार

Shivani Shetty

उन्‍हाळ्याकरिता द बॉडी शॉपचे व्हिटॅमिन सी कलेक्‍शन

Shivani Shetty

गुवाहाटीने १०० टाटा मोटर्स इलेक्ट्रिक बसेससह स्‍वीकारला हरित मार्ग

Shivani Shetty

Leave a Comment