मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३: रॅडो या कालातीत डिझाइन्स निर्मितीकरिता नाविन्यपूर्ण साहित्याचा उपयोग करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित स्विस वॉचमेकर कंपनीला त्यांची ग्लोबल ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून बॉलिवुड सुपरस्टार कतरिना कैफ यांच्या नियुक्तीची घोषणा करताना आनंद होत आहे. हा उत्साहवर्धक सहयोग आजीवन टिकणाऱ्या आठवणी निर्माण करण्याप्रती रॅडोच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.
कतरिना कैफ यांची मोहक सुंदरता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्याती त्यांना रॅडोची अचूकता, नाविन्यता व कलाकृतीप्रती अविरत कटिबद्धता सादर करण्यासाठी परिपूर्ण निवड बनवतात. वैविध्यपूर्ण टॅलेंट व करिष्मासाठी ओळखल्या जाणाऱ्या कतरिना कैफ यांच्यामध्ये रॅडोकरिता लोकप्रिय असलेली मूल्ये सामावलेली आहेत.
रॅडोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड्रियन बोशार्ड म्हणाले, “आम्हाला रॅडो कुटुंबामध्ये कतरिना कैफ यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. त्यांची मोहक सुंदरता व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धी रॅडोच्या मुलभूत तत्त्वांशी संलग्न आहेत. आम्ही सहयोगाने लक्झरीला नव्या उंचीवर नेण्याच्या या प्रवासाप्रती उत्सुक आहोत.”
कतरिना कैफ या सहयोगाबाबत आपला आनंद व्यक्त करत म्हणाल्या, “मला वॉचमेकिंगमधील सर्वोत्तमतेसाठी ओळखला जाणारा ब्रॅण्ड रॅडोसोबत सहयोग करण्याचा सन्मान वाटण्यासोबत आनंद होत आहे. रॅडो वॉचेसनी त्यांची नाविन्यपूर्ण डिझाइन्स व दर्जाप्रती कटिबद्धतेमुळे माझे लक्ष वेधून घेतले आहे. मी या प्रतिष्ठित स्विस ब्रॅण्डचे जागतिक व्यासपीठावर प्रतिनिधीत्व करण्यास उत्सुक आहे.”
रॅडोसाठी ग्लोबल ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलेल्या कतरिना कैफ ब्रॅण्डच्या नवीन मोहिमांमध्ये दिसल्या आहेत. रॅडोसोबतच्या त्यांच्या पहिल्या मोहिमेमधून अपवादात्मक टाइमपीसेस निर्माण करण्याप्रती ब्रॅण्डची कटिबद्धता दिसून येते, ज्यामध्ये दीर्घकालीन स्टाइलसह कालातीत साहित्याचा वापर करण्यात आला आहे.