मुंबई, १० मे २०२४ – इंडियन हॉटेल्स कंपनी (आयएचसीएल) या भारतातील सर्वात मोठ्या हॉस्पिटॅलिटी कंपनीने आज सीजी हॉस्पिटॅलिटीसह धोरणात्मक भागिदारी जाहीर केली आहे. त्याशिवाय ताज हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लिमिटेड आणि ताज सफारीज लिमिटेडसह सध्या असलेले सहकार्यही विस्तारले जाणार असून २०५० पर्यंत पोर्टफोलिओ २५ हॉटेल्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. एक्यम या प्लॅटफॉर्मद्वारे प्रामुख्याने भारतीय किनारपट्टी आणि ग्रेटर हिमालय परिसर व वन्यजीव परिसरात साहसी उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. भारतीय उपखंड आणि मध्यपूर्वेत सध्या आम्ही ताज एक्झॉटिका रिसॉर्ट अँड स्पा, ताज कोरल रीफ रिसॉर्ट अँड स्पा, मालदीव, ताज समुद्रा, कोलंबो, श्रीलंका, ताज जुमेराह लेक्स टॉवर्स, दुबई आणि ताज सफारीज, वाइल्डलाइफ लक्झरी लॉज, भारत व नेपाळ येथे कार्यरत आहेत.
श्री.पुनीत छटवाल, व्यवस्थापकीय संचालक-प्रमुख कार्यकारी अधिकारी, आयएचसीएल म्हणाले,’‘आयएचसीएल आणि प्रसिद्ध सीजी कॉर्प ग्लोबलचे सदस्य असलेल्या सीजी हॉस्पिटॅलिटी यांच्यातील भागिदारी गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे. या भागिदारीच्या पुढच्या टप्प्यात भारतीय उपखंडातील विकासाला चालना दिली जाणार आहे. एक्यम या प्लॅटफॉर्मअंतर्गत करण्यात आलेल्या सहकार्यानुसार हिमालयीन भाग तसेच भारतीय किनारपट्टी भागातील हॉटेल्सचे व्यवस्थापन तसेच वन्यजीव क्षेत्राला बळकटी दिली जाणार आहे.’’
श्री.राहुल चौधरी, व्यवस्थापकीय संचालक-सीजी हॉस्पिटॅलिटी म्हणाले,‘’हा प्लॅटफॉर्म ११ हॉटेल्ससह सध्याच्या पोर्टफोलिओचे कामकाज सुरू करणार आहे. सीजी हॉस्पिटॅलिटीने सध्या सुरू असलेल्या व लवकरच कार्यान्वित होणार असलेल्या हॉटेल्समध्ये आतापर्यंत १२५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या भागिदारीअंतर्गत लवकरच आणखी १४ हॉटेल्सचा समावेश केला जाणार आहे.’’
डॉ.बिनोद चौधरी, अध्यक्ष-सीजी कॉर्प ग्लोबल म्हणाले,’‘सीजी हॉस्पिटॅलिटी आणि टाटा समूहाच्या आयएचसीएल यांच्यातील २५ वर्ष भागिदारीचा आम्हाला अभिमान वाटतो. हा विस्तारn आयएचसीएलच्या भारतीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात मापदंड समजल्या जाणाऱ्या त्यांच्या शतकभर जुन्या वारशावर आम्हाला असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.’’