मुंबई, १३ मे २०२४: भारतातील सर्वात मोठ्या अन्न आणि एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आणि अग्रणी प्रमुख खाद्यतेल कंपनी अदानी विल्मर लिमिटेड (AWL) ने फॉर्च्यून पहली धार फर्स्ट-प्रेस्ड मस्टर्ड ऑइल सादर करण्याची घोषणा केली आहे. या सादरीकरणामुळे मोहरीच्या तेलाची श्रेणी उंचावत एक प्रीमियम उत्पादन मिळेल आणि ते अतुलनीय चव, शुद्धता आणि परंपरेची पारख करणाऱ्या ग्राहकांची अपेक्षापूर्ती करेल.
ब्रँडचे फर्स्ट-प्रेस्ड मोहरीच्या तेलाचे सादरीकरण ग्राहकांना उत्पादनाच्या मूळ स्वादाकडे नेते. ते पारंपरिक लाकडी कोल्हू तंत्राचा वापर करून राजस्थानमधून उत्कृष्ठ मोहरीच्या दाण्यांमधून काढले गेले आहे. हळुवार दाब देण्याची प्रक्रिया तेलाच्या नैसर्गिक गरजा टिकवून ठेवते आणि जतन करते, परिणामी प्रत्येक थेंबात अतुलनीय सकसता येते आणि ग्राहकांना मोहरीच्या तेलाचा सुवास, एक खोल,नैसर्गिक रंग, आणि स्वयंपाकाला नवीन उंचीवर नेणारी चव अनुभवता येते.
श्री.विनीत विश्वंभरन,असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट, मार्केटिंग-सेल्स विभाग, अदानी विल्मर म्हणाले,“भारतीय ग्राहकांना मोहरीच्या तेलाची पुर्नव्याख्या करणारे उत्पादन फॉर्च्यून पहली धार फर्स्ट-प्रेस्ड मस्टर्ड ऑइल सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आजच्या वेगवान आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या युगात आमचे उत्पादन मात्र विरुद्ध पद्धत अवलंबते. उत्कृष्ट चव, समृद्ध सुगंध टिकवून ठेवणाऱ्या शांत आणि पारंपरिक प्रक्रियेचा वापर करून बनवलेले असे हे स्वयंपाकाचे तेल आहे.”
फॉर्च्युन पहली धार फर्स्ट-प्रेस्ड ऑइल हे परंपरांचे पोषण करण्याच्या आणि भारताच्या आकांक्षेला मूर्त रूप देण्याच्या फॉर्च्यून च्या मूळ ब्रँड मूल्यांशी सखोलपणे सुसंगत आहे. जुन्या पारंपरिक प्रक्रियेचा वापर करून तयार केलेल्या या उत्पादनाद्वारे कंपनी शुद्धता आणि विश्वासार्हता यांचे महत्त्व सांगू इच्छित आहे. त्यायोगे त्यांच्या ग्राहकांचा स्वयंपाक अनुभव उंचावत आहे.