maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू३ आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशन लाँच

मुंबई, १० मे २०२४: ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज ऑडी क्‍यू३ बोल्‍ड एडिशन आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशनच्‍या लाँचची घोषणा केली. बोल्‍ड एडिशन व्‍हर्जन्‍समध्‍ये विशिष्‍ट स्‍टायलिंगची भर करण्‍यात आली आहे आणि त्‍यांची विशिष्‍टता व अद्वितीय डिझाइन घटकांसह ऑडीप्रेमींचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. ऑडी क्‍यू३ बोल्‍ड एडिशनची एक्‍स-शोरूम किंमत ५४,६५,००० रूपये आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशनची एक्‍स-शोरूम किंमत ५५,७१,००० रूपये आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ”ऑडी क्‍यू३ आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक आमच्‍या सध्‍याच्‍या सर्वाधिक विकी होणाऱ्या मॉडेल्‍स आहेत आणि ग्राहकांमध्‍ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. लक्‍झरी, कार्यक्षमता व वैविध्‍यतेचे परिपूर्ण संयोजन असलेल्या या दोन्‍ही मॉडेल्‍स आता बोल्‍ड एडिशनसह ऑफर करण्‍यात आल्या आहेत, ज्‍यामधून विशिष्‍ट स्‍टायलिंग घटक असलेल्या अधिक विशेष व स्‍पोर्टियर व्‍हेरिएण्‍टची खात्री मिळते. बोल्‍ड एडिशन्‍स रस्‍त्‍यावर अद्वितीय स्‍टेटमेंटची इच्‍छा असलेल्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. मर्यादित युनिट्स उपलब्‍ध असण्‍यासह आम्‍हाला आशा आहे की, या मॉडेल्‍सची विक्री देखील अल्‍पावधीत समाप्‍त होईल.”

बोल्‍ड एडिशनची वैशिष्‍ट्ये: ब्‍लॅक स्‍टायलिंग पॅकेजमध्‍ये आकर्षक ब्‍लॅक डिझाइन आहे, ज्‍यामधून आकर्षकता दिसून येते. तसेच यामध्‍ये ग्‍लॉस-ब्‍लॅक ग्रिल, पुढील व मागील बाजूस ब्‍लॅक ऑडी रिंग्‍ज, ब्‍लॅक विंडो सराऊंड्स, ब्‍लॅक ओआरव्‍हीएम आणि ब्‍लॅक रूफ रेल्‍स आहेत.

ऑडी क्‍यू३ आणि क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशनची प्रमुख वैशिष्‍ट्ये:

  • दर्जात्‍मक कार्यक्षमता: २.० लीटर टीएफएसआय इंजिनसह लीजेण्‍डरी क्‍वॉट्रो ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह.
  • १९० एचपी शक्‍ती आणि ३२० एनएम टॉर्कची निर्मिती
  • ४५.७२ सेमी (आर१८) ५-आर्म स्‍टाइल अलॉई व्‍हील्‍स
  • ४५.७२ सेमी (आर१८) ५-स्‍पोक व्‍ही-स्‍टाइल (‘एस’ डिझाइन) अलॉई व्‍हील्‍स*
  • एस-लाइन एक्‍स्‍टीरिअर पॅकेज*
  • एलईडी हेडलॅम्‍प्‍ससह एलईडी रिअर कॉम्‍बीनेशन लॅम्‍प्‍स
  • पॅनोरॅमिक ग्‍लास सनरूफ
  • पॉवर अॅडजस्‍टेबल फ्रण्‍ट सीट्ससह फोर-वे लंबर सपोर्ट
  • लेदर/लेदरेट कॉम्‍बीनेशनमध्‍ये सीट अपहोल्‍स्‍टरी
  • लेदर-रॅप ३-स्‍पोक मल्‍टीफंक्‍शन प्‍लस स्‍टीअरिंग व्‍हीलसह पॅडल शिफ्टर्स
  • अॅम्बियण्‍ट लायटिंग पॅकेज प्‍लस (मल्‍टी कलर)
  • २-झोन क्‍लायमेट कंट्रोल सिस्‍टम
  • पार्किंग एड प्‍लससह रिअर व्‍ह्यू कॅमेरा
  • ऑडी स्‍मार्टफोन इंटरफेस
  • प्रोग्रेसिव्‍ह स्‍टीअरिंग*
  • सहा एअरबॅग्‍ज
  • एमएमआय नेव्हिगेशन प्‍लससह एमएमआय अच
  • ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍ट
  • ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट प्‍लस
  • कम्‍फर्ट कीसह गेस्‍चर-कंट्रोल्‍ड टेलगेट
  • ऑडी फोन बॉक्‍ससह वायरलेस चार्जिंग सिस्‍टम
  • ऑडी साऊंड सिस्‍टम (१० स्‍पीकर्स, १८० वॅट)
  • ऑडी जेन्‍यूएन अॅक्‍सेसरीज (पर्यायी)
  • ड्युअल टोन अलॉई व्‍हील पेंट (पर्यायी)  

* मार्क केलेली सर्व वैशिष्‍ट्ये (*) फक्‍त ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅकमध्‍ये उपलब्‍ध आहेत. 

Related posts

कोटक आणत आहे महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी ‘स्मार्ट चॉइस’ सुवर्णकर्ज ०.८८ टक्के इतका निश्चित मासिक व्याजदर, त्याच दिवशी वितरण, फोरक्लोजिंगच्या पर्यायांचीही ऑफर एका मल्टिमीडिया जाहिरात अभियानाद्वारे कर्ज उत्पादन बाजारात आणली जात आहे

Shivani Shetty

खाता येण्याजोग्या फोर्क्सच्या पहिल्यावहिल्या प्रयोगातून मॅगीने दिली बदलाची प्रेरणा

Shivani Shetty

इझमायट्रिपने स्‍मार्ट वॉईस रेकग्निशन टेक्‍नॉलॉजी लाँच केली

Shivani Shetty

Leave a Comment