maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

राज्यातील ग्रामीण तरुणांच्या सक्षमीकरणासाठी सलाम किसानचा उपक्रम

मुंबई, २० डिसेंबर २०२३: यंदाच्या राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने सलाम किसान या अॅग्री-टेक मंचाने ग्रामीण युवकांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभावी कौशल्य विकास कार्यक्रमांचे अनावरण केले. सलाम किसान हा एक आद्य प्रवर्तक अॅग्री-टेक मंच आहे, ज्यांच्याकडे एक वर्षापेक्षाही कमी कालावधीत ५०,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा बेस तयार झाला आहे. तरुणांना सशक्त करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेले सलाम किसानचे हे उपक्रम देशातील ग्रामीण समुदायात लवचिकता आणि स्थिरता आणण्याबाबत त्यांची वचनबद्धता दर्शवितात.

सलाम किसान केवळ शेतीची प्रगत सोल्यूशन्स आणि नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीनेच नाही; तर तरुणांसाठी कृषी क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करून या क्षेत्रात क्रांती आणण्यास सज्ज आहे. त्यांच्या एसके कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्रामचा उद्देश प्रायोगिक कृषी कौशल्यांबरोबरच तरुणांना ड्रोन पायलटिंग सारख्या प्रगत क्षमतांद्वारे सुसज्ज करण्याचा आणि अशाप्रकारे, स्थानिक समुदायांत परिवर्तन आणण्यासाठी त्यांना तयार करण्याचा आहे.

सलाम किसानच्या संस्थापिका आणि सीईओ श्रीमती धनश्री मंधानी म्हणाल्या, “स्मार्ट अॅग्री-टेकमधील आमच्या नैपुण्याला प्रशिक्षित स्थानिक प्रतिभावंतांची जोड मिळाली, तर ग्रामीण समुदायात अर्थपूर्ण परिवर्तन घडून येऊ शकेल. आमच्या सर्वांगीण दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून आम्ही ग्रामीण तरूणांवर लक्ष केंद्रित करत आहोत. कृषी क्षेत्रातील स्थिर विकासासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आम्ही एसके कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम, महिलांसाठी विशेष ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम आणि आदिवासी समुदाय ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे नवीन शिखरे सर करतो आहोत, त्यावेळी कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठीच्या आमच्या प्रयत्नांत नव्या पिढीने देखील सामील व्हावे असे आवाहन आम्ही करत आहोत.

अन्य नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये महिलांसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण सामील आहे. यातून महाराष्ट्रातील पहिली महिला ड्रोन पायलट तयार झाली आहे. आदिवासी समुदायातील तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांचा आदिवासी समुदाय ड्रोन पायलट प्रशिक्षण प्रोग्राम आहे. हा उपक्रम म्हणजे आधुनिक कृषीचे फायदे देशातील काना-कोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचवून सर्वसमावेशक विकास साध्य करण्याच्या दिशेने उचललेले हे एक पाऊल आहे.

मार्च २०२४ पर्यंत १००+ ड्रोन तैनात करण्याच्या योजनेसह सलाम किसान महाराष्ट्रात आपले काम झपाट्याने वाढवत आहे. त्यासाठी कुशल लोकांची भरती करणे गरजेचे आहे. त्यांनी किसान दिवस २०२३ पासून पुढे २ महिन्यांचे प्रतिभा शोध आणि प्रशिक्षण अभियान सुरू केले आहे. प्रदर्शने, सोशल मीडिया संपर्क, ऑनलाइन मूल्यांकन आणि कॅम्पस भेटींच्या माध्यमातून सलाम किसान ५० लोकांची निवड करून, त्यांना प्रशिक्षण देऊन उत्तम ड्रोन पायलट तयार करेल, जे कृषी क्षेत्रात नवीन दिशा खुल्या करण्यास सज्ज असतील.

Related posts

ओटीटीवरील जगातील पहिला एंजल इन्व्हेस्टमेंट शो ‘इंडियन एंजल्स’ लॉन्च

Shivani Shetty

पुणेस्थित डिजिकोअर स्टुडिओजने घडवला इतिहास

Shivani Shetty

ऊषाची रिलायन्स डिजिटलसोबत भागीदारी, प्रीमिअम किचन अप्लायन्सेसची नवी आयशेफ रेंज सादर भारतभरातील निवडक रिलायन्स डिजिटल आऊटलेट्समध्ये पाच सर्वोत्कृष्ट उत्पादने उपलब्ध

Shivani Shetty

Leave a Comment