maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

वारी एनर्जीज लिमिटेडचा इकोफायसोबत सहयोग

मुंबई, ९ मे २०२४: वारी एनर्जीज लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या सोलार पीव्‍ही मॉड्यूल्‍स उत्‍पादक कंपनीने एव्‍हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ असण्‍यासोबत क्‍लायमेट-पॉझिटिव्‍ह उपक्रमांसाठी ग्रीन फायनान्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध असलेली एनबीएफसी इकोफायसोबत सहयोग केला आहे. इकोफाय या सहयोगामध्‍ये १०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, ज्‍यामधून वारीची क्षमता आणि नवीकरणीय ऊर्जाक्षेत्राच्‍या विकासक्षमतेमध्‍ये असलेला विश्‍वास दिसून येते.   

सरकारच्‍या पीएम सूर्या घर योजना २०२४ शी बांधील राहत आणि अनुकूल बाजारपेठ स्थितींचा फायदा घेत हा सहयोग भारतातील नवीकरणीय ऊर्जा परिवर्तनाप्रती योगदान देण्‍याची अपेक्षा आहे. वारी एनर्जी लिमिटेडचे सोलार कौशल्‍य आणि इकोफायचे डिजिटल फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स एकत्र करत या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आमचा घरातील व एमएसएमईंमधील १०,००० हून अधिक रूफटॉप्‍सचे सोलारायझेशन करण्‍याला गती देण्‍याचा मनसुबा आहे, जो पीएम सूर्या घर योजना २०२४ चा दृष्टीकोन आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमचा गृहमालकांसाठी शुद्ध ऊर्जा अधिक उपलब्‍ध होण्‍याजोगी आणि किफायतशीर करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे देशभरातील घरे व एमएसएमईंचे सोलारायझेशन करण्‍याचे उद्दीष्‍ट संपादित करण्‍यामध्‍ये मदत होईल. 

इकोफाय येथील पार्टनरशीप्‍स अँड को-लेण्डिंगचे प्रमुख कैलाश राठी म्‍हणाले, ”वारीसोबतचा आमचा सहयोग उद्योग महत्त्वाच्‍या टप्‍प्‍यावर असताना सोलार अवलंबतेप्रती अत्‍यंत महत्त्वपूर्ण आहे. गेल्‍या १५ महिन्‍यांमध्‍ये इकोफायने ५००० हून अधिक रूफटॉप सोलार ग्राहकांना सक्षम केले आहे. आम्‍ही या विभागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ज्‍यामुळे उत्‍पादन नाविन्‍यता व त्‍वरित मान्‍यतांच्‍या माध्‍यमातून प्रवेश सुलभ झाला आहे. देश सोलार सीझनसाठी सज्‍ज असताना इकोफाय आणि वारी यांच्‍यामधील सहयोग उत्‍प्रेरक म्‍हणून कार्य करण्‍याची आणि समाजाच्‍या विविध विभागांमध्‍ये सोलार अवलंबन व प्रवेशाला गती देण्‍यास साह्य करण्‍याची अपेक्षा आहे.” 

वारी एनर्जीज लिमिटेड येथील विक्रीचे अध्‍यक्ष पंकज वसालम्हणाले, ”इकोफायसोबतचा आमचा सहयोग सौर ऊर्जा उपलब्‍ध करून देण्‍याचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती प्रगतीला सादर करतो. आमच्‍या सोलार सोल्‍यूशन्‍सना इकोफायच्‍या फायनान्सिंग प्‍लॅटफॉर्मसोबत एकत्र करत आम्‍ही अडथळ्यांना दूर करण्‍याप्रती काम करत आहोत, तसेच घरे व व्यवसायांमध्‍ये सौर ऊर्जेच्‍या अवलंबतेला गती देण्‍यामध्‍ये साह्य करत आहोत. यामुळे अधिकाधिक व्‍यक्‍ती शुद्ध ऊर्जेच्‍या फायद्यांचा लाभ घेण्‍यास सक्षम होतील, तसेच एकत्रित हरित, अधिक पर्यावरणदृष्‍ट्या जागरूक भारत निर्माण करतील.”

Related posts

आयोटेकवर्ल्ड आणि इफको भागीदारीमुळे कृषी उत्पादनात वाढ

Shivani Shetty

आर्या ओम्नीटॉकची मोटोरोला सोल्युशन्ससह भागीदारी

Shivani Shetty

इन्शुरन्सदेखोचा संयुक्त परवान्यासह रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश

Shivani Shetty

Leave a Comment