मुंबई, ८ फेब्रुवारी २०२३:- काळाच्या कठीण कसोटीला उतरते ते खरे प्रेम आणि खऱ्या प्रेमाप्रमाणेच कल्याण ज्वेलर्सचे अनोखे, शानदार दागिने देखील कोणत्याही काळात शोभून दिसणारे आहेत. २२ कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आलेल्या डिझाइन्सपासून हिरेजडित ज्वेलरी सेट्सपर्यंत अनेक वेगवेगळे, एकापेक्षा एक सरस पर्याय कल्याण ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहेत.
कल्याण ज्वेलर्सने सहा ‘व्हॅलेन्टाईन्स-डे’ स्पेशल दागिने प्रस्तुत केले आहेत. हे दागिने मिनिमल आणि बहुउपयोगी देखील आहेत. हा एकच दागिना घाला किंवा कलेक्शनमधील इतर दागिन्यांसोबत पेयरिंग करा, प्रत्येकवेळी तुम्हाला एक शानदार व ऍक्सेसरीजचा सुरेख मिलाप केल्याचा आनंद मिळेल हे नक्की. अतिशय विचारपूर्वक, कलात्मकतेने घडवण्यात आलेल्या दागिन्यांची माहिती करून घ्या आणि यंदा व्हॅलेन्टाईन्स डे ला सर्वात सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी सज्ज व्हा. प्रेमाचा मौसम अजून जास्त आनंददायी व्हावा यासाठी कल्याण ज्वेलर्सने या एक्सक्लुसिव्ह व्हॅलेन्टाईन्स डे कलेक्शनवर आकर्षक सूट देण्याची घोषणा केली आहे. भारतभर सर्व कल्याण ज्वेलर्स शोरूम्समध्ये १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत या विशेष डिस्काउंटचा लाभ ग्राहकांना घेता येईल.
कल्याण एक्सक्लुसिव्ह सहा ‘व्हॅलेन्टाईन्स-डे’ कलेक्शन विषयी जाणून घेऊयात.
१) कल्याण ज्वेलर्सचा इन्फिनिटी नेकलेस, हिरेजडित असून शाश्वत प्रेमाचे उत्कृष्ट प्रतीक आहे. यामधील तीन हृदये म्हणजे प्रेमाचे तीन आधारस्तंभ – रोज गोल्ड म्हणजे प्रेम, व्हाईट गोल्ड म्हणजे स्नेह अर्थात मैत्रीतील प्रेम आणि यलो गोल्ड म्हणजे भक्ती. मिनिमल आणि तरीही अतिशय नाजूकपणे, प्रत्येक बारकाव्यावर विशेष लक्ष देत घडवण्यात आलेला हा नेकलेस दैनंदिन वापरासाठी खूपच चांगला आहे आणि म्हणूनच एक शानदार, अर्थपूर्ण आणि उपयुक्त भेटवस्तू ठरू शकतो. २) हिरे आणि रोज, व्हाईट व यलो सोन्याच्या तीन हृदयांनी सजवलेली इन्फिनिटी स्टड्सची ही जोडी. जन्मजन्मांतरीच्या प्रेमापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या स्टड्सवर गहिऱ्या प्रेमाचे संपूर्ण जगभरात मान्यता पावलेले प्रतीक अर्थात इन्फिनिटी चिन्ह असल्यामुळे यंदाच्या व्हॅलेंटाइन्स-डे ला तुमच्या प्रेयसीसाठी यांच्याइतके अर्थपूर्ण गिफ्ट दुसरे असूच शकत नाही.३) ट्रेंडी ‘टोई एट मोई’ (तू व मी) रिंगशी खूप साधर्म्य असलेली ही अंगठी कल्याण ज्वेलर्सने तयार केली आहे. हिरेजडित स्टार आणि अतिशय नाजूकपणे घडवण्यात आलेले २२ कॅरेट सोन्याचे हृदय ही दोन्ही चिन्हे बोटावर एकत्र विराजमान होतात आणि त्यांचे सौंदर्य वृद्धिंगत करतात. या अंगठीचे अनोखेपण व बहुउपयोगी असण्याचा गुण यामुळे तुमची प्रेयसी ही अंगठी पुन्हा पुन्हा वापरणार हे नक्की. ४) नाजूक आणि अतिशय कलात्मक हृदयांवर अलगद विसावलेली रुबीची फुलपाखरे असे डिझाईन असलेले हे इयररिंग्स पाहताक्षणी लक्ष वेधून घेतात. सौम्य, मनमोहक, क्लासी रंगामुळे हे इयररिंग्स तुमच्या कपड्यांची शान वाढवतात. ५) रुबी हे प्रेमाचे व वचनबद्धतेचे प्रतीक मानले जाते, तर फुलपाखरू प्रगतीचे व नव्या आरंभाचे प्रतीक आहे. २२ कॅरेट सोन्याच्या हृदयावर या दोन्हींचा एकत्र मिलाप घडवून हा मिनिमल नेकपीस तयार करण्यात आला. यंदा व्हॅलेन्टाईन्स डे ला हा भेट म्हणून देऊन हा दिवस कायम आठवणीत राहील असा बनवा.६) कल्याण ज्वेलर्सचे हे व्हॅलेन्टाईन्स थीम ब्रेसलेट २२ कॅरेट सोन्यात बनवण्यात आले आहे. अतिशय रोमँटिक लुक असलेल्या या ब्रेसलेटच्या मध्यभागी मिनिमल, नाजूक गुलाब आहे, एकमेकांमध्ये गुंतलेली दोन हृदये दोन्ही बाजूला स्थिरावली आहेत. पाहताक्षणी मन काबीज करणारे असे हे ब्रेसलेट व्हॅलेन्टाईन्स डेची शोभा वाढवेल.