maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

जीआयएम-अपग्रॅड’ चा हेल्थ केयर मॅनेजमेंट ऑनलाईन अभ्यासक्रम

मुंबई, २३ जानेवारी २०२३: गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने (जीआयएम) अपग्रॅड या आशिया खंडातील सर्वात मोठ्या उच्च शिक्षण तंत्रज्ञान कंपनीसोबत हेल्थ केयर मॅनेजमेंटमध्ये प्रोफेशनल सर्टिफिकेट प्रोग्राम सुरु केला आहे. ११ महिन्यांच्या या कोर्समध्ये ३०० पेक्षा जास्त तास शिक्षण दिले जाते. अभ्यासक्रमामध्ये व्यावहारिक प्रशिक्षणाचा देखील समावेश असावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून उद्योगक्षेत्रातील तज्ञ व शिक्षणतज्ञांनी हा कोर्स तयार केला आहे. अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना रुची वाटावी, त्यांचे लक्ष एकाग्र व्हावे यासाठी तीन दिवसांची ऑन-कॅम्पस इमर्शन टूरचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. लेक्चर्स, माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद, संपर्क, नेटवर्किंग सेशन्स इत्यादींमुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड व एकाग्रता कायम राहते. याबरोबरीनेच विद्यार्थ्यांना हेल्थकेयर मॅनेजमेंटमध्ये अधिक चांगले करिअर उभारण्यात मदत व्हावी यासाठी ४० पेक्षा जास्त तासांची लाईव्ह सेशन्स, ८ पेक्षा जास्त केस स्टडीज आणि असाइन्मेंट्स, करिअरसाठी संपूर्ण पाठिंब्यासह एक कॅपस्टोन प्रोजेक्ट, १:१ मार्गदर्शन आणि नोकरी मिळवण्यात मदत या मूल्यवर्धित वैशिष्ट्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. उद्योगक्षेत्रातील अहवालांनुसार, आरोग्य देखभाल क्षेत्रात नोकरीची सुरक्षितता सर्वात जास्त आहे त्यामुळे या नोकऱ्यांचे रँकिंग खूप वरचे आहे. वैद्यकीय क्षेत्राचे सखोल ज्ञान आणि उत्तम संवाद कौशल्ये असलेल्या व्यक्तींसाठी हेल्थकेयर मॅनेजमेंट ही एक आदर्श करिअर निवड ठरू शकते.

प्रोफेसर अजित परुळेकर, संचालक, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांनी या भागीदारीविषयी सांगितले, “नोकरी-व्यवसाय करणाऱ्या प्रोफेशनल्सना त्यांची करिअर उद्दिष्ट्ये साध्य करता यावीत यासाठी मदत करण्याची प्रदीर्घ परंपरा गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने जपली आहे. आमचे हे उद्दिष्ट एकसमान असल्यामुळे जगातील एक सर्वात मोठा ऑनलाईन उच्च शिक्षण प्लॅटफॉर्म अपग्रॅडसोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. जगभरातील हजारो विद्यार्थ्यांना सर्वत्र मान्य असलेले आणि उच्च गुणवत्तापूर्ण सर्टिफिकेट प्रोग्राम उपलब्ध करवून देण्यासाठी आम्ही ही भागीदारी केली आहे.”

श्री.फाल्गुन कोमपल्ली, सह-संस्थापक, अपग्रॅड यांनी सांगितले, “गेल्या काही वर्षात आरोग्य देखभाल क्षेत्रात तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नॉन-मेडिकल प्रोफेशनल्सना देखील हे क्षेत्र खुणावू लागले आहे. आरोग्य देखभाल क्षेत्राच्या पारंपरिक कक्षा आता विस्तारत आहेत, हेल्थकेयर मार्केटिंग, बेंचमार्किंग इन हेल्थकेयर, हेल्थकेयरमधील एथिकल व लीगल विषय, ऑपरेशन्स आणि मटेरियल मॅनेजमेंट इत्यादी अनेक आधुनिक विषयांचा यामध्ये समावेश झाला आहे. आता हे क्षेत्र नर्सिंग नोकऱ्यांपुरते मर्यादित राहिलेले नाही. शिक्षणाचा खूप मोठा वारसा पुढे चालवत असलेल्या जीआयएमसोबत धोरणात्मक भागीदारी आम्हाला कुशल राष्ट्र निर्मितीचे आमचे मिशन पूर्ण करण्यात मदत करेल.ही भागीदारी आम्हाला भविष्यातील नेतृत्व जबाबदारी सांभाळण्यासाठी सक्षम बनवेल.”

‘जीआयएम हेल्थ केयर प्रोग्राम पॉवर्ड बाय अपग्रॅड’ अर्थात अपग्रॅडच्या सहयोगाने उपलब्ध करवून दिल्या जात असलेल्या जीआयएम हेल्थ केयर प्रोग्राममध्ये अनेक करिअर संधी उपलब्ध आहेत, मेडिसिन, नर्सिंग आणि थेरपी या क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन इतरही अनेक क्षेत्रांमधील करिअरसाठी हा कोर्स उपयोगी पडू शकतो.

Related posts

ट्रान्सफॉर्मिंग हेल्थ केअर विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ १० वी आंतरराष्ट्रीय परिषद

Shivani Shetty

यकृत दाता सचिन गोसावी – हेड कॉन्स्टेबल, नवी मुंबई पोलिस यांच्या तर्फे ध्वजारोहण

Shivani Shetty

गोल्ड मेडल इलेक्ट्रिकलस् ने मेट्रो रेल्वे मध्ये खास ब्रँडिंग चालू केले

Shivani Shetty

Leave a Comment