maharashtraprimenews
ठळक बातम्या
Healthआरोग्य वार्तामहाराष्ट्र

सनराईज ऑन्कोलॉजी सेंटर’च्या वतीने मुंबईत सर्वसमावेशक कर्करोग देखभाल केंद्रासह विस्तार

मुंबई, 17 ऑगस्ट, 2023: मुंबई आणि गोवा येथे सातत्याने यशस्वी कर्करोग देखभाल केंद्रांची स्थापना केल्यानंतर सनराईज ऑन्कोलॉजी सेंटरच्या वतीने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे अत्याधुनिक सर्वसमावेशक कर्करोग केंद्राचे उदघाटन करण्यात आले. डॉ. अक्षय कर्पे, गिरीश कोरडे आणि डॉ. भारत भोसले यांच्यासारख्या द्रष्टया व्यक्तींनी 2017 साली स्थापना केलेले सनराईज ऑन्कोलॉजी सेंटर कर्करोग देखभालीत परिवर्तन आणण्यात नेहमीच अग्रेसर राहिले. 2022 हे वर्ष सनराईज ऑन्कोलॉजी सेंटरकरिता महत्त्वपूर्ण ठरले, यावर्षी बोरिवली पश्चिम येथे पहिले स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले आणि त्यानंतर हे केंद्र टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा पसंतीचा भागीदार बनले. त्याद्वारे नाना पालकर स्मृती समिती कॅन्सर केअर सेंटरचे क्लिनिकल मॅनेजमेंटचे काम चालते.
अंधेरी येथे टीम सनराईजकडून नव्याने सुरू करण्यात आलेले हे दुसरे स्वतंत्र केंद्र आहे. याठिकाणी सर्व अत्याधुनिक सुविधा असून कार्यकुशल टीमची व्यवस्था आहे. या नवीन केंद्रात गुणवत्तापूर्ण सोयी-सुविधांसह सहा बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. याठिकाणी केमोथेरपी आणि इम्यूनोथेरपीसारखे महत्त्वपूर्ण उपचार रूग्णांना देण्यात येतात. रुग्णांप्रती आपले समर्पण दाखवून, हे केंद्र त्यांच्या सर्वांगीण कल्याणाला प्राधान्य देणार्‍या सेवांची विस्तृत श्रेणी देते. या सेवांच्या विस्तृत श्रेणीत मानसशास्त्रीय समुपदेशन, पोषणपर मार्गदर्शन, फिजिओथेरपी, अनुवांशिक समुपदेशन, वेदना व्यवस्थापन आणि बरेच काही समाविष्ट आहे.

Related posts

केसांच्या समस्यांवर उपचारासाठी डॉ. बत्रा’जची उत्पादने

Shivani Shetty

*या मान्सूनमध्ये आरोग्याच्या जपणूकीसाठी उपाय: सर्वत्र आढळून येणाऱ्या या ५ स्थितींकडे लक्ष ठेवा*

Shivani Shetty

भास्कर जाधवांच्या मुलाचा पोलिसांवर गंभीर आरोप, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

cradmin

Leave a Comment