maharashtraprimenews
ठळक बातम्या
गुन्हेमहाराष्ट्र

मुंबई मध्ये ग्राहक चेतना ट्रस्टने पोलीस अधिकाऱ्यांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत अवैध सिगारेट जप्त करण्यात आल्या

मुंबई, २०२३: स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांसह संयुक्त कारवाईत ग्राहक चेतना ट्रस्टने दिलेली माहिती आणि गुप्तहेरामुळे अवैध कृतींना ओळखत त्‍यावर अंकुश लावण्‍यास यश मिळाले. मुंबई, हैदराबाद, गुरुग्राम व राणाघाट (पश्चिम बंगाल) येथे पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी छापे टाकले आणि मोठ्या प्रमाणात अवैध सिगारेट जप्त केल्या. पुढील तपासासाठी मुख्य संशयितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

या घटनांबाबत आपले मत व्‍यक्‍त करत ग्राहक चेतना ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री. सुरेश कौशिक म्हणाले, “आम्ही आमच्या माहितीनुसार कारवाई करत या प्रकरणांसदर्भात तपासणी करणाऱ्या कायदा सुव्‍यवस्थेचे कौतुक करतो. या कारवाईमुळे अवैध पुरवठा साखळीवर अंकुश लावण्‍यास मदत झाली आहे. आम्ही भारतातील बनावट/अवैध वस्तूंबद्दल ग्राहक जागरूकता आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. बेकायदेशीर सिगारेट व्यापार हा सार्वजनिक आरोग्य आणि समाजासाठी गंभीर व वाढता धोका आहे, ज्‍यामुळे सरकारला कर महसूलामध्‍ये तोटा होत आहे, कायदेशीर व्‍यवसायांना आव्‍हानांचा सामना करावा लागत आहे आणि ग्राहकांना अवैध उत्‍पादनांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सिगारेटच्या अवैध व्यापाराला आळा घालण्याची आणि कठोर पावले उचलून या धोक्‍याचे निर्मूलन करण्याची नितांत गरज आहे.”

पहिल्या घटनेत माथाजी जनरल स्टोअर, सायबराबादमधील धनलक्ष्मी स्टोअर आऊटलेट्स आणि इब्राहिमपट्टणम, हैदराबाद येथील बाशा पान स्टोअर यांच्‍याविरोधात कायदेशीर कारवाई करण्‍यात आली. त्यानंतर मुंबईमध्‍ये अवैध सिगारेटचा साठा असलेले दुकान क्रमांक १५४ व १५५, क्रॉफर्ड मार्केट, या ठिकाणावर कारवाई करण्यात आली.

तसेच, गुरुग्राममध्ये आर्केडिया मार्केट (सेक्टर ४९) येथे लाला पान, कुणाल पान फ्लेवर्स आणि रिफ्रेशमेंट झोन या दुकानांविरोधात यशस्‍वीपणे कायदेशीर कारवाई करण्‍यात आली. त्यानंतर डीएलएफ फेज २- अमर पान, प्रियंका पान आणि सुरेंदर पान येथे छापे टाकण्यात आले. याशिवाय, पश्चिम बंगालमधील बांग्‍लादेशच्‍या सीमेजवळ असलेल्‍या राणाघाट येथील बापी स्टोअर आणि तपन स्टोअर यांच्‍यावर यशस्‍वीपणे कारवाई करण्‍यात आली.

Related posts

प्रख्यात गायक अमेय डबली यांनी भारताच्या संरक्षण दलांबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण करण्यासाठी “वर्दी के वीर’ पहिला बॉलीवूड म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट जाहीर

Shivani Shetty

उद्धव ठाकरेंना मोठा झटका, शिवसेना जिल्हाप्रमुखाचे झेडपी सदस्यत्व रद्द

cradmin

गुलाबी’ शहरात सुरु होणार नव्या मैत्रीचा प्रवास ‘गुलाबी’चा धमाल टिझर प्रदर्शित

Shivani Shetty

Leave a Comment