maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interestमहाराष्ट्र

टाटा मोटर्सकडून चंदिगडमध्‍ये अत्‍याधुनिक रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन

चंदिगड, २८ नोव्‍हेंबर २०२३: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने चंदिगड येथे त्‍यांच्‍या चौथ्‍या रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्‍हीएसएफ) च्‍या उद्घाटनासह शाश्‍वत गतीशीलतेप्रती आपली कटिबद्धता कायम राखली आहे. Re.Wi.Re – रिसायकल विथ रिस्‍पेक्‍टनाव असलेल्‍या या केंद्राचे उद्घाटन टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्‍थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या अत्‍याधुनिक केंद्रामध्‍ये पर्यावरणदृष्‍ट्या अनुकूल प्रक्रियांचा वापर केला जातो आणि या केंद्राची दरवर्षाला १२,००० एण्‍ड-ऑफ-लाइफ वेईकल्‍स सुरक्षितपणे व शाश्‍वतपणे विघटन करण्‍याची क्षमता आहे. टाटा मोटर्सची सहयोगी दादा ट्रेडिंग कंपनीने आरव्‍हीएसएफ विकसित केले असून कार्यसंचालन देखील पाहतात आणि त्‍यांचा ब्रॅण्‍ड कोणताही असो सर्व पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍स स्‍क्रॅप करण्‍यासाठी सुसज्‍ज आहे, जे कंपनीच्‍या पर्यावरणास अनुकूल उपक्रमांना प्रोत्‍साहन देण्‍याच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे. जयपूर,भुवनेश्‍वर व सुरत येथे टाटा मोटर्सच्‍या तीन आरव्‍हीएसएफना मोठे यश मिळाल्‍यानंतर लाँच करण्‍यात आलेले हे चौथे केंद्र पर्यावरणास अनुकूल उपक्रमांप्रती कंपनीची समर्पितता अधिक दृढ करते.

या महत्त्वपूर्ण लाँचबाबत आपले मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स व टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्‍हणाले, ”आजचा क्षण अत्‍यंत महत्त्वाचा आहे, जेथे आम्‍ही चंदिगडमध्‍ये स्‍क्रॅपेज सुविधेचे अनावरण केले आहे. टाटा मोटर्स ऑटोमोटिव्‍ह उद्योगाच्‍या भवितव्‍याला आकार देण्‍यासाठी नाविन्‍यता व शाश्‍वततेचा अवलंब करण्‍यामध्‍ये नेहमी अग्रस्‍थानी राहिली आहे. हे अत्‍याधुनिक केंद्र जबाबदार उत्‍पादनाप्रती आमच्‍या अविरत कटिबद्धतेवर भर देण्‍यासह हरित व शुद्ध वातावरण निर्माण करण्‍याप्रती आमच्‍या समर्पिततेला देखील सादर करते. अशा चौथ्‍या केंद्राच्‍या स्‍थापनेमधून कार्बन उत्‍सर्जन कमी करत चक्रीय अर्थव्‍यवस्‍थेला चालना देण्‍याप्रती, तसेच रिसायकलिंग संस्‍कृतीला चालना देण्‍याप्रती आमचे निरंतर प्रयत्‍न दिसून येतात. वाहनमालकांना त्‍यांच्‍या वाहनांचे, विशेषत: अधिक प्रदूषण करणाऱ्या कमर्शियल व पॅसेंजर वेईकल्‍सचे स्‍क्रॅपिंग करण्‍यास प्रेरित करण्‍याच्‍या माध्‍यमातून आम्‍ही अधिक शाश्‍वत भविष्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण झेप घेत आहोत. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आमचा शुद्ध व आरोग्‍यदायी वातावरणाच्‍या आमच्‍या दृष्टिकोनाशी बांधील राहत नवीन, सुरक्षित व अधिक इंधन-कार्यक्षम वेईकल्‍सच्‍या अवलंबतेला गती देण्‍याचा मनसुबा आहे. 

अत्‍याधुनिक केंद्र Re.Wi.Re. हे सर्व ब्रॅण्‍ड्सच्‍या एण्‍ड-ऑफ-लाइफ पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सचे विघटन करण्‍याच्‍या उद्देशाने निर्माण करण्‍यात आले आहे, जेथे पर्यावरणदृष्‍ट्या अनुकूल पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. पूर्णत: डिजिटल सुविधा कमर्शियल व पॅसेंजर वेईकल्‍ससाठी अनुक्रमे समर्पित सेल-टाइप व लाइन-टाइप डिस्‍मॅन्टलिंगसह (विघटन) सुसज्‍ज आहे आणि सर्व कार्यसंचालने एकसंधी व पेपरलेस आहेत. तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, ऑईल्‍स,लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्‍या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्‍टेशन्‍स आहेत. प्रत्‍येक वेईकल विशेषत: पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन केलेल्‍या प्रखर डॉक्‍यूमेन्‍टेशन व विघटन प्रक्रियेमधून जातात. असे करत विघटन प्रक्रियेमध्ये बारकाईने लक्ष दिल्‍याची, तसेच सर्व घटकांच्‍या सुरक्षित विघटनाची खात्री मिळते. Re.Wi.Re. केंद्र ऑटोमोटिव्ह उद्योगातील शाश्वत पद्धतींना चालना देण्याच्या दिशेने  महत्त्वपूर्ण झेप आहे.        

Related posts

बोल्ड केअरची रणवीर सिंगसह नवी मोहीम

Shivani Shetty

स्विस ब्‍युटीकडून ऑफलाइन विस्‍तारीकरणाची घोषणा

Shivani Shetty

पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांच्या ‘फील गुड, हील गुड’ पुस्तकाचे प्रकाशन

Shivani Shetty

Leave a Comment