maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

शार्क टँक: फ्लेक्‍झीफायमीने १ कोटी रूपयांची गुंतवणूक संपादित केली

मुंबई, १८ मार्च २०२४: फ्लेक्‍झीफायमी ही हेल्‍थ व वेलनेस इनोव्‍हेटर ‘शार्क टँक सीझन ३’मध्‍ये यशस्‍वी उपस्थिती दाखवल्‍यानंतर धुमाकूळ निर्माण करत आहे. कंपनीने आपल्‍या दृष्टिकोनासह शार्क्‍सच्‍या प्रतिष्ठित पॅनेलचे लक्ष वेधून घेतले, तसेच पॉवरहाऊस गुंतवणूकदार नमिता थापर आणि अमित जैन (संस्‍थापक, कारदेखो) यांच्‍याकडून १ कोटी रूपयांची मोठी गुंतवणूक संपादित केली आहे. या प्रभावी यशामुळे फ्लेक्‍झीफायमीचे मूल्‍य ४० कोटी रूपयांपर्यंत वाढले आहे, ज्‍यामध्‍ये ४० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. हा त्‍यांच्‍या विकास प्रवासामधील प्रमुख टप्‍पा आहे. 

१ कोटी रूपयांच्‍या गुंतवणूकीमध्‍ये अद्वितीय संरचनेचा समावेश आहे, जेथे इक्विटीसाठी ५० लाख रूपये वाटप करण्‍यात आले असून उर्वरित ५० लाख रूपये डेब्‍ट फायनान्सिंग म्‍हणून संपादित करण्‍यात आले आहे, तसेच व्‍याजाबाबत माहिती निश्चित करण्‍यात येणार आहे.

फ्लेक्‍झीफायमीचे सह-संस्‍थापक मनजीत सिंग म्‍हणाले, ”शार्क टँक सीझन ३ मध्‍ये फ्लेक्‍झीफायमीचे प्रतिनिधीत्‍व करण्‍याची संधी सन्‍माननीय आहे. आमच्‍या अनुभवांनी आम्‍हाला सोल्‍यूशन विकसित करण्‍यास प्रेरित केले आहे, जे व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकते. आम्‍हाला आमचा दृष्टिकोन दाखवण्‍याचा आणि जगभरातील ग्राहकांना फ्लेक्‍झीफायमीचा प्रभाव शेअर करण्‍याचा आनंद होत आहे.”

फ्लेक्‍झीफायमीचे सह-संस्‍थापक अमित भयानी म्‍हणाले, ”फ्लेक्‍झीफायमी वेलनेसच्‍या नवीन युगाला सादर करते, व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या आरोग्‍याकडे लक्ष देण्‍यास सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करत आहे. शार्क टँक सीझन ३ मधील आमच्‍या सहभागामधून नाविन्‍यतेप्रती आमची कटिबद्धता आणि आरोग्‍यसेवा क्षेत्रात सकारात्‍मक बदल घडवून आणण्‍याप्रती आमची समर्पितता दिसून येते.” 

फ्लेक्‍झीफायमीच्‍या नैसर्गिक सोल्‍यूशन्‍ससह पेन मॅनेजमेंटमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याच्‍या मिशनने त्‍यांना शार्क टँक इंडिया सीझन ३ मध्‍ये प्रतिष्ठित स्‍थान मिळवून दिले. या महत्त्वपूर्ण क्षणापर्यंतचा प्रवास संस्‍मरणीय राहिला आहे. कंपनीने अथक मेहनत घेतली, तसेच लक्षवेधक पिच तयार करण्‍यासाठी अंतर्गत व सर्जनशील टीमसोबत सहयोग केला, लक्षवेधक एलीव्‍हेटर पिचेससोबत स्‍पर्धा करण्‍यासोबत प्रभावी प्रात्‍यक्षिके दाखवली. यामुळे प्रतिष्ठित शार्क्‍ससमोर लक्षवेधक प्रेझेन्‍टेशन सादर करता आले. शार्क्‍सचे बहुमूल्‍य मार्गदर्शन गेम-चेंजर ठरले. फ्लेक्‍झीफायमी आपली पोहोच वाढवण्‍यासाठी या अनुभवाकडे स्प्रिंगबोर्ड म्‍हणून पाहते, तसेच वेदनेचा त्रास सहन करत असलेल्‍या अनेक व्‍यक्‍तींना सक्षम करत आहे.

थोडक्‍यात, फ्लेक्‍झीफायमीची शार्क टँक सीझन ३ मधील उपस्थिती उपलब्‍ध होण्‍याजोगे व सर्वांगीण आरोग्‍यसेवा सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याप्रती सुरू असलेल्‍या कंपनीच्‍या मिशनमधील मोठा टप्‍पा आहे. जगभरातील व्‍यक्‍तींचे आरोग्‍य सुधारण्‍याप्रती समर्पिततेसह फ्लेक्‍झीफायमी आरोग्‍य व वेलनेस क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे.

संपूर्ण एपिसोड येथे पहा – https://www.youtube.com/watch?v=1Ixbxzp3Jfw

Related posts

पुणेस्थित डिजिकोअर स्टुडिओजने घडवला इतिहास

Shivani Shetty

इझमायट्रिपचा लीप इअर ट्रॅव्‍हल सेल लाँच

Shivani Shetty

आर्या ओम्नीटॉकची मोटोरोला सोल्युशन्ससह भागीदारी

Shivani Shetty

Leave a Comment