maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा लीप इअर ट्रॅव्‍हल सेल लाँच

मुंबई, १ मार्च २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने लीप इअर ट्रॅव्‍हल सेलची घोषणा केली आहे. हा स्‍पेशल स्प्रिंग सेल ट्रॅव्‍हल सेवांच्‍या श्रेणीवर व्‍यापक सूट मिळण्‍याची खात्री देतो. ५ मार्च २०२४ पर्यंत आयोजित करण्‍यात आलेला हा सेल पर्यटकांना फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बस तिकिटे, कॅब रेण्‍टल्‍स व हॉलिडे पॅकेजेसवर आकर्षक सूटसह साहसी धमाल व अतिरिक्‍त आनंद देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.  

लीप इअर ट्रॅव्‍हल सेलदरम्‍यान ग्राहकांना फ्लाइट्स, होटल्स, बसेस, कॅब्सच्या बुकिंगवर अनुक्रमे २५ टक्‍के ५० टक्‍के १५ टक्‍के, १२ टक्‍के सूट मिळणार आहे. तर हॉलिडे पॅकेजेस् ११,२९९ रूपयांपासून सुरू होतील.

या अद्भुत सूटचा आनंद घेण्‍यासाठी ग्राहक इझमायट्रिप अॅप किंवा वेबसाइटच्‍या माध्‍यमातून बुकिंग करताना प्रोमो कोड ‘ईएमटीलीप’चा वापर करू शकतात. तसेच आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड (अॅमेझॉन पे क्रेडिट कार्डसह) अशा निवडक बँक सहयोगींसोबत बुकिंग करत वापरकर्ते अतिरिक्‍त सवलतीचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रवास अनुभवामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर पडेल. या सेलला अधिक उत्‍साहवर्धक करण्‍यासाठी सेल कालावधीदरम्‍यान केलेल्‍या प्रत्‍येक व्‍यवहारावर तुम्‍हाला बाटा, फर्न्‍स एन पेटल्‍स, झेप्‍टो, वारी व वॉगलस अशा निवडक ब्रॅण्‍ड सहयोगींकडून गिफ्ट वाऊचर्स जिंकण्‍याची संधी आहे.  

इझमायट्रिपने या सेलसाठी विविध प्रतिष्ठित एअरलाइन सहयोगींसोबत सहयोग केला आहे, ज्‍यामध्‍ये प्रतिष्ठित एअरलाइन्‍स समावेश आहे, जसे अमेरिकन एअरलाइन्‍स, एअर मॉरिशस, एअर फ्रान्‍स, केएलएम रॉयल डच एअरलाइन, एअर आस्‍ताना, आकासा, एअर इंडिया, डेल्‍टा एअरलाइन्‍स, ब्रिटीश एअरवेज, इजिप्‍त एअर, एथिओपियन एअरलाइन्‍स, गल्‍फ एअर, आयटीए एअरवेज, इंडिगो, केनिया एअरवेज, लुफ्थान्‍सा, स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्‍स, लोट पॉलिश, मान्‍यमार एअरलाइन्‍स, ओमण एअर, क्‍वॉन्‍टास एअरवेज, कतार एअरवेज, रवांडएअर, स्‍टार एअर, सिंगापूर, सौंदी एअरलाइन्‍स, तुर्किश एअरलाइन्‍स, विस्‍तारा, व्‍हर्जिन अॅटलांटिक आणि व्हिएतनाम एअरलाइन्‍स.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी म्‍हणाले. ”फ्लाइट्स, हॉटेल्‍स, हॉलिडे पॅकेजेस् यांवर आकर्षक डिल्‍ससह आम्‍ही तुम्‍हाला प्रवास व गंतव्‍याचा आनंद घेण्‍यास आमंत्रित करत आहोत. या लीप वर्षामध्‍ये तुमची स्‍वप्‍ने साकारा, संस्‍मरणीय आठवणींचा संग्रह करा. तुमचा मार्गदर्शक म्‍हणून इझमायट्रिपसह धमाल प्रवास व साहसांचा आनंद घ्‍या.” 

Related posts

झेल एज्‍युकेशनचा यूपीईएससोबत सहयोग

Shivani Shetty

सचिन तेंडुलकरने लिव्‍हप्‍युअरचे प्‍लॅटिनो कॉपर वॉटर प्‍युरिफायर लाँच केले

Shivani Shetty

क्विक हील फाउंडेशनचा सीएसआर उपक्रम

Shivani Shetty

Leave a Comment