maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

पुणेस्थित डिजिकोअर स्टुडिओजने घडवला इतिहास

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३: पुणेस्थित डिजिकोअर स्टुडिओज या जागतिक दर्जाच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) स्टुडिओने ऐतिहासिक घटनाक्रमाद्वारे अत्यंत महत्त्वपूर्ण पल्ला सर केला आहे. यशस्वीरित्या आयपीओ बाजारात आणल्यानंतर या  कंपनीने भारताच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे एसएमई आयपीओ सबस्क्रिप्शन प्राप्त केले आहे. कंपनी आता तिच्या विलक्षण प्रवासातील नवीन अध्यायाच्या उंबरठ्यावर आहे. कंपनीचे समभाग १७१ रूपयांच्‍या इश्‍यू किमतीच्‍या तुलनेत एनएसई इमर्जवर २७० रूपयांवर सूचीबद्ध झाले आहे, ज्‍यामधून ५७.८ टक्‍के प्रिमियम वाढ दिसून येते.

डिजिकोअर स्टुडिओजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मोरे म्हणाले, “हा विलक्षण टप्पा पार केल्यामुळे आम्ही थरारून गेलो आहोत. आमच्या गुंतवणूकदारांचा प्रचंड विश्वास व पाठिंबा यातून दिसून येतो. भारतातील व्हीएफएक्स व अॅनिमेशन उद्योग विलक्षण अशा रूपांतरणाचा अनुभव घेत आहे. सिनेमा, टीव्ही व जाहिरात क्षेत्रामध्ये उच्च श्रेणीच्या दृश्य अनुभवाची मागणी वाढत असल्यामुळे या उद्योगाला चालना मिळत आहे. सातत्याने उत्क्रांत होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक महत्त्वाकांक्षी व कल्पक प्रकल्प हाती घेण्याची क्षमता आम्हाला प्राप्त झाली आहे.”

सप्टेंबर २०२३ मध्ये कंपनीने आयपीओ बाजारात आणल्यानंतर गुंतवणूक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. अगदी पहिल्याच दिवशी कंपनीच्या आयपीओंचे १८.७८ पट ओव्हरसबस्क्रिप्शन झाले. रिटेल गुंतवणूकदारांनी लक्षणीय उत्साह दाखवत त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या भागाच्या तब्बल ३२.७३ पटींनी ओव्हरसबस्क्राइब केले. तर बिगरसंस्थात्मक खरेदीदारांनीही उत्सुकता दाखवत १५.०२ पट ओव्हरसबस्क्राइब केले. अर्हताप्राप्त संस्थात्मक खरेदीदारांनीही (क्यूआयबी) दृढ विश्वास दाखवत त्यांच्यासाठी राखीव भागाच्या ७.०९ पट सबस्क्राइब केले.

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस डिजिकोअरचा आयपीओ तब्बल ६५.५९ पटींनी ओव्हरसबस्क्राइब झाला होता. व्हीएफएक्स उद्योगातील भावी आघाडीची कंपनी म्हणून कंपनीने आपले स्थान भक्कम केले होते. अखेरच्या दिवशी खरोखर कळस गाठला गेला. अविश्वसनीय वाटेल अशा २४३.११ पट ओव्हरसबस्क्रिप्शनसह अर्जांचे मूल्य ५,४११ कोटी रुपयांवर गेले. गुंतवणूकदारांनी तब्बल ३१,६४,२७,२०० इक्विटी समभागांसाठी बोली लावली. हा आकडा १३,०१,६०० एवढ्या एकूण प्रस्तावित समभागांच्या तुलनेत कितीतरी अधिक होता. डिजिकोअरचा आयपीओ अलीकडील काळातील सर्वांत लोकप्रिय आयपीओंपैकी एक असल्याचे या मागणीमुळे स्पष्ट झाले.

अभिषेक मोरे पुढे म्हणाले, “भारतीय व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन क्षेत्र उज्ज्वल भविष्यकाळासाठी सज्ज आहे. हे क्षेत्र २० टक्के ते २५ टक्के एवढा दमदार सीएजीआर साध्य करणार आहे आणि २०२५ सालापर्यंत या क्षेत्राचे बाजारपेठेतील मूल्य १९० अब्ज रुपयांपर्यंत जाणे अपेक्षित आहे. डिजिकोअरमध्ये आम्ही केवळ या आश्वासक भवितव्याचे साक्षीदार न होता, त्याला सक्रियपणे आकार देत आहोत. आमच्या यशस्वी आयपीओतून मिळालेल्या संसाधनांच्या माध्यमातून व्हिज्युअल इफेक्ट्स व अॅनिमेशनच्या कक्षा विस्तारण्यासाठी, उद्योगक्षेत्रात नवीन मापदंड स्थापन करण्यासाठी आणि भारतातील व्हीएफएक्स क्षेत्राला लक्षणीय योगदान देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही पुढील काही वर्षांत व्हिज्युअल इफेक्ट्स व अॅनिमेशनच्या क्षेत्रात आणखी चाकोरीबाह्य काम करण्यास उत्सुक आहोत.”

Related posts

‘इब्‍लू फिओ एक्‍स’ इलेक्ट्रिक स्‍कूटर लवकरच होणार लॉन्च

Shivani Shetty

जनजागृतीच्या माध्यमातून गुन्हेगारी रोखण्यावर चर्चा

Shivani Shetty

“कोळी फोर्क-लॉर्स” कार्यक्रमात परंपरा आणि संस्कृतीचे एकत्रीकरण

Shivani Shetty

Leave a Comment