maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

शहानी ग्रुपच्‍या स्‍मार्ट इन्स्टिट्यूटचे यश

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३: बीएफएसआय कंपन्‍या एण्‍ट्री-लेव्‍हल पदांसाठी त्‍यांच्‍या नोकरभरती प्रयत्‍नांमध्‍ये वाढ करत असलेल्‍या डायनॅमिक क्षेत्रात शहानी ग्रुपला कुशल व रोजगार-सक्षम कर्मचारीवर्ग पुरवण्‍यामध्‍ये उद्योगामधील एकमेव अग्रणी असण्‍याचा अभिमान वाटतो. शहानी ग्रुपची स्‍मार्ट इन्स्टिट्यूट प्रगती करण्‍यासह बीएफएसआय सेक्‍टरमधील कुशल टॅलेंटसाठी वाढत्‍या गरजेची पूर्तता करते. बीएफएसआय सेक्‍टरमध्‍ये कुशल व्‍यावसायिकांसाठी मागणी वाढत आहे. स्‍मार्ट इन्स्टिट्यूट बीएफएसआय व्‍यावसायिकांच्‍या भावी पिढीला नाविन्‍यपूर्ण व सर्वसमावेशक मार्गदर्शन करत उद्योगाला नव्‍या उंचीवर नेण्‍यास स्थित आहे.

शहानी ग्रुपद्वारे संचालित स्‍मार्ट इन्स्टिट्यूटने बीएफएसआय सेक्‍टरच्‍या हायरिंग गरजांची पूर्तता करण्‍यासाठी पुढाकार घेतला आहे. स्‍मार्ट इन्स्टिट्यूट हे एड-टेक उद्योगाच्‍या अपस्किलिंग विभागामधील एकमेव व्‍यासपीठ आहे, जे अस्‍सल प्‍लेसमेंट्स प्रदान करते आणि अत्‍यंत किफायतशीर आहे, ज्‍यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्‍यांसाठी उपलब्‍ध आहे. स्‍मार्ट इन्स्टिट्यूट विद्यार्थ्‍यांना व्‍हाइट-कॉलर रिक्रूटर्सकडून मागणी केल्‍या जाणाऱ्या क्षमता विकसित करण्‍यास सक्षम करते.

शहानी ग्रुपचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. अखिल शहानी म्‍हणाले, “आमचे २०२८ पर्यंत १ दशलक्ष ब्‍लू-कॉलर विद्यार्थ्‍यांना कुशल करण्‍यासह व्‍हाइट-कॉलर रोजगार मिळवून देण्‍याचे मिशन आहे, ज्‍यामुळे भारताच्‍या विकास प्रवासाप्रती योगदान देता येईल. जवळपास १९० दशलक्ष भारतीय अजूनही बँकिंग सुविधांपासून वंचित असल्‍याचे पाहता बीएफएसआय सेक्‍टर २०२५ पर्यंत जवळपास ७१५ बिलियन डॉलर्सच्‍या अंदाजित खर्चासह विकास करत राहिल. आम्‍ही विद्यार्थ्‍यांना उद्योगामध्‍ये यशस्‍वी होण्‍यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍ये व ज्ञानासह सुसज्‍ज करत क्षेत्राच्‍या या विकासाला गती देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. स्‍मार्ट इन्स्टिट्यूटसह आम्‍ही व्‍यासपीठ तयार केले आहे, जे तरूणांना सक्षम करण्‍यासह बीएफएसआय नियोक्‍त्‍यांना कुशल कर्मचारीवर्ग देखील प्रदान करते.आमचा विश्‍वास आहे की, बेरोजगारी कमी करण्‍याप्रती आणि बीएफएसआय कर्मचारीवर्गाचा दर्जा सुधारण्‍याप्रती हे मोठे पाऊल आहे.”

स्‍मार्ट इन्स्टिट्यूट अत्‍याधुनिक दृष्टीकोनाच्‍या माध्‍यमातून हे यश संपादित करते, ज्‍यामध्‍ये डेटा अॅनालिटिक्‍स, बीहेवीअरल सायन्‍स व एआय-संचालित सोल्‍यूशन्‍सचा समावेश आहे. ही संस्‍था बीएफएसआय सेक्‍टरमधील विशिष्‍ट रोजगारासाठी आवश्‍यक असलेली सॉफ्ट व हार्ड स्किल्‍स, तसेच उद्योग माहिती प्रदान करण्‍यासाठी डेटा अॅनालिटिक्‍सचा वापर करते. याव्‍यतिरिक्‍त विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षित व मार्गदर्शन करण्‍यासाठी बीहेवीरल सायन्‍सचा वापर केला जातो, ज्‍यामधून ते आवश्‍यक असलेल्‍या मानकांची पूर्तता करण्‍याची, परिणामत: कर्मचारीवर्गासाठी सुसज्‍ज असण्‍याची खात्री मिळते. एआयचे उपयोजन देखील स्‍मार्टच्‍या यशामध्‍ये साह्यभूत आहे, जेथे ते प्रत्‍येक विद्यार्थ्‍याच्‍या क्षमतांचे विश्‍लेषण करते, वैयक्तिक प्रशिक्षण पाथवेज प्रदान करते आणि योग्‍य रोजगार व योग्‍य विद्यार्थी यांच्‍यामधील अचूक जुळणीची खात्री देते. या एकीकृत दृष्टीकोनामधून बीएफएसआय सेक्‍टरसाठी कुशल व रोजगार-सक्षम कर्मचारीवर्ग निर्माण करण्‍याप्रती स्‍मार्टची क्षमता दिसून येते.

Related posts

इंटरफेस व्हेंचर्सची एमईडीसीसह हातमिळवणी

Shivani Shetty

सर्वांगीण ईव्‍ही इकोसिस्‍टमच्‍या विकासाला ‘ऑडी इंडिया’चे प्राधान्‍य

Shivani Shetty

कोस्टा कॉफीची यशोगाथा कायम – नवी दिल्लीत त्यांच्या १५०व्या स्टोअरचे उद्घाटन

Shivani Shetty

Leave a Comment