maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इंटरफेस व्हेंचर्सची एमईडीसीसह हातमिळवणी

मुंबई, ३० एप्रिल २०२४: महाराष्ट्रातील व्यवसायांना चांगला फायदा होईल या दृष्टीने पाऊल उचलत इंटरफेस व्हेंचर्स आणि महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काऊंसिल (एमईडीसी) यांनी आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याचे जाहीर केले. या धोरणात्मक भागीदारीमुळे राज्यातील एमईडीसीच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) इंटरफेस व्हेंचर्सच्या नावीन्यपूर्ण निधी उभारणी मंचाचा आणि सेवांना लाभ घेता येईल.

मुंबईत ज्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याचे योजण्यात आले होते, त्या कराराचा उद्देश राज्यातील एमईडीसी सदस्यांना अनुभवास येणाऱ्या फंडिंगच्या दरीवर उपाययोजना करण्याचा आहे. इंटरफेस व्हेंचर्स आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा, व्यापक गुंतवणूकदारांच्या नेटवर्कचा आणि निधी उभारणीतील आपल्या नैपुण्याचा उपयोग या व्यवसायांना त्यांच्या विकास आणि विस्तार यात्रेत ग्रोथ कॅपिटल अधिक कार्यक्षमतेने उभारण्यात मदत करण्यासाठी करून देतील. या सेवांमध्ये इन्व्हेस्टर पिचेसमध्ये मदत, भांडवल उभारणी, आयपीओ मार्गदर्शन, आर्थिक मॉडेलिंग, मूल्यांकन अॅडव्हायझरी आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. या भागीदारीमुळे यशस्वी निधी उभारणीत लक्षणीय वाढ होईल आणि त्या अनुषंगाने एमईडीसी मधील एमएसएमईच्या एकंदर आर्थिक प्रगतीला हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.

इंटरफेस व्हेंचर्सचे संस्थापक करण देसाई म्हणाले, “आपले संचालन वाढवू पाहणाऱ्या व्यवसायांसाठी निधी उभारणी हा एक मोठा अडसर असतो. एमईडीसी सोबत काम करण्यास आणि आमच्या यूझर-फ्रेंडली मंचाच्या आणि तज्ज्ञ सल्ल्याच्या मदतीने निधी उभारणी सहज संभव करून त्यांच्या एमएसएमई सदस्यांना सक्षम बनवण्यास आम्ही आतुर आहोत. आम्ही एकत्र मिळून एक अशी ईकोसिस्टम उभी करण्याबाबत वचनबद्ध आहोत जेथे व्यवसायांची भरभराट होईल आणि राज्याच्या आर्थिक विकासात हे व्यवसाय लक्षणीय योगदान देतील.”

एमईडीसीचे अध्यक्ष श्री. अतुल शिरोडकर म्हणाले, “इंटरफेस व्हेंचर्सशी सहयोग करताना आणि आमच्या निष्ठावान सदस्यांना निधी उभारणीशी संबंधित त्यांच्या विविध ऑफर्स उपलब्ध करून देताना एमईडीसीला खूप आनंद होत आहे. उद्योजकतेची जोपासना करण्याच्या आणि राज्यात आर्थिक विकासाला रेटा देण्याच्या आमच्या मिशनमध्ये आमची ही भागीदारी म्हणजे एक लक्षणीय टप्पा आहे. इंटरफेस व्हेंचर्सच्या नैपुण्याचा आणि त्यांच्या व्यापक सोल्यूशन्सचा लाभ घेऊन आमच्या सदस्यांना विस्तार, इनोव्हेशन आणि स्थिर वृद्धीसाठी आवश्यक तो निधी प्राप्त करण्यात एक ठळक स्पर्धात्मक फायदा मिळेल. सूक्ष्म उद्योगांपासून ते मोठ्या महामंडळांपर्यंच्या सर्व व्यवसायांवर या भागीदारीचा कसा सकारात्मक प्रभाव पडतो, हे उद्योग यशाची नवी शिखरे कशी गाठतात आणि त्यायोगे महाराष्ट्राच्या एकंदर आर्थिक समृद्धीत कसे योगदान देतात हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

Related posts

टाटा मोटर्सकडून प्रवास ४.० मध्‍ये सुरक्षित, स्‍मार्ट आणि शाश्‍वत मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सचे प्रदर्शन

Shivani Shetty

क्‍लीअरट्रिपकडून स्थिर हॉटेल बुकिंग्‍ज व ग्राहक अनुभवामध्‍ये वाढ करत ‘कॅन्‍सल फॉर नो रिजन’ लाँच

Shivani Shetty

चिल अॅट होम’ स्‍प्राइटकडून मोहिम लाँच

Shivani Shetty

Leave a Comment