maharashtraprimenews
ठळक बातम्या
आरोग्य वार्ताठळक बातम्यामुंबईहेल्थ

डीबीएस शस्त्रक्रियेनंतर येमेनच्या तरुणीला पुनर्जन्म झाल्यासारखे वाटू लागले*

ही कहानी आहे. 33 वर्षांची येमेनी तरुणी, ‘सना’ची. पार्किन्सन्सने त्रासलेल्या या तरुणीवर मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार करण्यात आले. या उपचारांनंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. सनावर डीप ब्रेन स्टिम्युलेटरसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर सना पुन्हा पूर्वीप्रमाणे जीवन जगू लागली आहे. या शस्त्रक्रियेनंतर सनाच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला असून, सोबतच स्वप्न पूर्ण करण्याची जिद्दही तिच्या मनात निर्माण झाली आहेत.

2015 हे साल सनासाठी आयुष्यातील सगळ्यात वाईट वर्ष ठरलं. याचवर्षी तिला पार्किन्सन्सने ग्रासलं होतं. येमेनची रहिवासी असलेल्या सनावर जवळपास वर्षभर कोणताही इलाज करण्यात आला नव्हता. त्रास वाढत गेल्यानं तिच्या हालचालींवर मर्यादा येत गेल्या. रोज सहजपणे करू शकत असलेल्या गोष्टीही ती नीटपणे करू शकत नव्हती. हाताने जेवणं, कपडे घालणं यासारख्या गोष्टी करताना तिला इतरांची मदत घ्यावी लागत होती. असं परावलंबी जगणं सनासाठी वेदनादायी होतं.

एक दिवस असा आला ज्या दिवशी सनाचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल याची तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला खात्री पटली. सनाच्या भावाला भारतामधल्या मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात एका अत्यंत गुणकारी उपचारपद्धतीबद्दल माहिती मिळाली. सनाच्या कुटुंबियांनी सनावर वोक्हार्ट रुग्णालयात उपचार करण्याचा तत्काळ निर्णय घेतला. मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट रुग्णालयात आल्यानंतर सना आणि तिच्या कुटुंबियांची नामवंत डॉक्टर प्रशांत माखिजा आणि डॉक्टर मनीष बाल्दिया यांच्याशी भेट झाली. हे दोघेही न्यूरोसर्जन असून ते अत्यंत कुशल डीबीएस शल्यचिकीत्सक आहेत.

सना हिच्यावर विविध चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्या, तपासण्यांनंतर डॉ. माखिजा आणि डॉ. बाल्दिया यांनी सना हिला प्रगत पार्किन्सन्सने ग्रासले असून त्यावर उपाय म्हणून डीप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. सना हिने तत्काळ त्याला होकार दिला ज्यामुळे तिच्यावर 7 सप्टेंबर, 2023 रोजी शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले.

डीबीएस शस्त्रक्रिया ही सनासाठी एखाद्या चमत्काराप्रमाणे ठरली. शस्त्रक्रियेनंतर लगेच सना हिला ताठरपणा, हालचालीत आलेला मंदपणा आणि थरथर कमी झाल्याचे जाणवले. जवळपास 8 वर्ष ज्या यातना, त्रास सना सहन करत होती तो कमी झालेला पाहून सना खूप खूश झाली होती. तिचा आनंद पाहून तिच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. शस्त्रक्रियेनंतर सनाला पूर्वीप्रमाणे सगळी कामे कोणाच्याही मदतीशिवाय करता येऊ लागली. आश्चर्याची बाब ही आहे की वोक्हार्ट रुग्णालयातील तज्ञांच्या मार्गदर्शनानंतर सनाला घ्यावी लागत असलेली पार्किन्सन्सची औषधेही बंद करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर सनाला आपला पुनर्जन्म झाल्यासारखे वाटू लागले.

डीप ब्रेन स्टिम्युलेशनसाठी जास्त चीरफाड करावी लागत नाही. डीप ब्रेन स्टिम्युलेटर शस्त्रक्रियेमध्ये मेंदूच्या नेमक्या भागात इलेक्ट्रोड्स ठेवले जातात. डीबीएस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावशाली उपचारपद्धती मानली जाते. पार्किन्सन्समुळे येणारा ताठरपणा, कंप, चालताना किंवा इतर क्रिया करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ही उपचार पद्धती प्रभावशाली आहे. या उपचारपद्धतीमुळे रुग्णाला इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही आणि त्याचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. सना हिच्या अदाहरणावरून डीबीएस उपचारपद्धतीची उपयोगिता कळण्यास मदत होऊ शकते.

अचूक नियोजनासह डीबीएस शस्त्रक्रिया लवकर केल्यास त्याचा काय फायदा होतो हे सना हिच्या उदाहरणावरून आपल्याला कळू शकते. यामुळे रुग्ण पुन्हा एकदा स्वावलंबीपणे हालचाल करू शकतो आणि त्याची औषधेही एका टप्प्यानंतर बंद होतात. पार्किन्सन्स रोगामुळे उद्भवलेल्या आव्हानांपासून आराम मिळवणाऱ्या रुग्णांसाठी लवकर डीबीएस शस्त्रक्रिया हा एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय असू शकतो हे सना हिच्या उदाहरणामुळे आपल्याला ठळकपणे लक्षात येते.

Related posts

सचिन तेंडुलकर आणि आयुषमान खुराना प्रतिकात्मक फुटसल सामन्यासाठी एकत्र येणार, युनिसेफसाठी बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी खेळणार सामना

Shivani Shetty

पुनर्निर्मित सामग्री वापरुन लहान मुलांच्या खेळायच्या जागा बनविण्यासाठी FedEx आणि यूनायटेड वे, मुंबई एकत्र ६५०० मुलांना याचा फायदा मिळणार ‘प्लेस्केपस् प्रकल्पा’चे मुंबई, बंगळूर, दिल्ली आणि एनसीआर भागामध्ये पुनर्निर्मित सामग्रीचा वापर करून मुलांच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासास चालना देण्याचे लक्ष्य

Shivani Shetty

एबीडी ने भारत विरुद्ध न्यूझीलंड होणाऱ्या टी२० आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी स्टर्लिंग रिझर्व्ह कपची घोषणा केली

Shivani Shetty

Leave a Comment