maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कोस्टा कॉफीची यशोगाथा कायम – नवी दिल्लीत त्यांच्या १५०व्या स्टोअरचे उद्घाटन

राष्ट्रीय, ९ ऑक्टोबर: कोस्टा कॉफी या भारतातील कमर्शियलश्रेणीतील कोका कोलाच्या आघाडीच्या कॉफी ब्रँडने आपल्या राजोरी गार्डन, नवी दिल्ली येथील भारतातील १५०व्या स्टोअरच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. ही कामगिरी कोस्टा कॉफीच्या आपला विस्तार वाढवून संपूर्ण देशभरातील उत्साही लोकांसाठी अविस्मरणीय कॉफी अनुभव देण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.  

 

कोस्टा कॉफीने भारतीय बाजारपेठेत २००५ साली प्रवेश केला. त्यांनी आपला भारतातील प्रवास कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली येथे पहिल्या कॅफेद्वारे सुरू केला. मागील वर्षी देवयानी इंटरनॅशनलच्या सहयोगाने कोस्टा कॉफीने भारतात आपला व्यापक विस्तार उपक्रम सुरू केला असून सुमारे ६० स्टोअर्स सुरू केले. याच वेगावर स्वार होऊन कोस्टा कॉफी आपले स्थान देशभरातील विद्यमान बाजारपेठा आणि नवीन शहरांमध्येही मजबूत करण्याचे ध्येय समोर ठेवत आहे. त्यांनी ८-१० भारतीय शहरांमध्ये नवीन स्टोअर्स सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विमानतळ, महामार्ग आणि हेल्थकेअरच्या क्षेत्रात विशेष माध्यमे स्थापन करण्‍याला कायमच प्राधान्य दिले जाईल. 

भारताचा कॉफी उद्योग स्पेशालिटी कॉफी आणि प्रीमियमायझेशन यांच्यामध्ये एक बदल अनुभवतो आहे. हे विशेषतः शहरी मिलेनियल्समध्ये घडून आले आहे. त्यांनी कॉफी शॉप्सना उत्साहाने सळसळत्या सामुदायिक केंद्रांमध्ये रूपांतरित केले आहे. हा बदल प्रामुख्याने आपल्या चहा संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या देशासाठी आश्चर्यकारक आहे. कोस्टा कॉफी या उत्क्रांतीमध्ये आघाडीवर आहे आणि त्यांनी ग्राहकांच्या बदलत्या आवडींशी जुळवून घेऊन या बदलत्या कॉफी संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे.  

कोस्टा कॉफीच्या १५०व्या स्टोअरमुळे उत्तम दर्जाच्या आणि स्थानिक स्तरावरून खरेदी केलेल्या कॉफी देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब दिसते. कोस्टा कॉफीच्या कलात्मक आणि नावीन्यपूर्ण डिझाइन भाषेत तयार केलेल्या या स्टोअरचे उद्दिष्ट कॉफी प्रेमींना एक आरामदायी आणि उत्साहाने सळसळती जागा देणे आणि आपल्या आवडत्या पेयांचा आनंद घेण्यासाठी वातावरण देणे हे आहे. 

कोस्टा कॉफीचे भारत आणि उगवत्या बाजारपेठांचे महाव्यवस्थापक विनय नायर यांनी हा महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल आपला उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत ही आमच्यासाठी जागतिक स्तरावरील महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आम्हाला आमच्या १५०व्या स्टोअरच्या उद्घाटनाबाबत खूप अभिमान वाटतो. हा महत्त्वाचा टप्पा आम्हाला भारतभरातील कॉफीप्रेमींकडून मिळालेले प्रेम आणि पाठबळ यांचे प्रतिबिंब आहे. आमचे ध्येय देशातल्या कानाकोपऱ्यात आमचे अस्तित्व विस्तारित करण्याचे आहे आणि आम्ही आमच्या सातत्यपूर्ण विस्तार प्रयत्नांद्वारे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू आणि सर्वांसाठी कॉफीचा अविस्मरणीय अनुभव देऊ.

कोस्टा कॉफीच्या व्यापक मेन्‍यूमध्ये विविध प्रकारच्या खास कॉफी उत्पादनांचा समावेश आहे. जसे लोकांना प्रिय असलेल फ्लॅट व्हाइट, क्लासिक कॉर्टो, कॅफे कॅरेमेला आणि इतर अनेक. या सर्व कॉफी स्थानिक स्तरावरून प्राप्त केलेल्या कॉफी बीन्सपासून बनवलेल्या आहेत. स्थानिक शेतकरी आणि कौशल्यपूर्ण बरिस्ता यांच्यासोबतच्या भागीदारीतून कोस्टा कॉफी त्यांच्या नावाप्रमाणेच प्रत्येक कप हा त्यांचा दर्जा आणि सर्वोत्तमता यांचे प्रतीक ठरेल, याची काळजी घेते. 

कोका-कोला कंपनी बाबत

 

भारतात कोका-कोला देशातील अग्रगण्‍य पेय कंपनी आहे, जी ग्राहकांना उच्‍च दर्जाच्‍या व रिफ्रेशिंग पेय पर्यायांची श्रेणी देते. कंपनी बेव्‍हरेजेस् फॉर लाइफया आपल्‍या दृष्टकोनाशी बांधील राहत उत्‍पादनांचा व्‍यापक पोर्टफोलिओ देते, ज्‍यामध्‍ये हायड्रेशन, स्‍पोर्टस्, स्‍पार्कलिंग, कॉफी, चहा, पोषण, ज्‍यूस व डेअरी आधारित उत्‍पादनांचा समावेश आहे. भारतातील कंपनीच्‍या पेय श्रेणीमध्‍ये कोका-कोला, कोला-कोला झीरो शुगर, डाट कोक, थम्‍स अप, चार्ज्‍ड बाय थम्‍स अप, फॅन्‍टा, लिम्‍का, स्‍प्राइट, माझा आणि ज्‍यूसेसची मिनट मेड रेंज यांचा समोवश आहे. कंपनी हायड्रेशन पेय देखील देते जसे लिम्‍का स्‍पोर्टस्, स्‍मार्टवॉटर, किन्‍ले, दसानी आणि बोनाक्‍वा पॅकेज ड्रिंकिंग वॉटर व किन्‍ले क्‍लब सोडा. प्रिमिअम उत्‍पादनांमध्‍ये श्‍वेप्‍स व स्‍मार्टवॉटर यांचा समावेश आहे. याव्‍यतिरिक्‍त कंपनी चहा व कॉफीची कोस्‍टा कॉफी श्रेणी देते. कंपनी आपल्‍या पेयांमध्‍ये साखरेचे प्रमाण कमी करण्‍यापासून बाजारपेठेत नाविन्‍यपूर्ण नवीन उत्‍पादने सादर करण्‍यापर्यंत आपल्‍या पोर्टफोलिओमध्‍ये सातत्‍याने परिवर्तन करत आहे.

 

आपल्‍या स्‍वत:च्‍या मालकीच बॉटलिंग कार्यसंचालने व फ्रँचायझी बॉटलिंग सहयोगींसह कंपनीचे जवळपास ४ दशलक्ष रिटेल आऊटलेट्सचे प्रबळ नेटवर्क आहे. या नेटवर्कच्‍या माध्‍यमातून कंपनी देशभरातील लाखो ग्राहकांना रिफ्रेश करते. कंपनी वॉटर रिप्‍लेनिशमेंट, पॅकेजिंग रिसायकलिंग, शाश्‍वत कृषी उपक्रम आणि आपल्‍या मूल्‍य साखळीमध्‍ये कार्बन उत्‍सर्जन कमी करण्‍याच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍तींचे जीवन, समुदाय व पर्यावरणावर सकारात्‍मक परिणाम घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न करते.

 

जागतिक स्‍तरावर आपल्‍या बॉटलिंग सहयोगींसोबत सहयोगाने कोका-कोला कंपनीचे ७००,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहे, ज्‍यामधून जगभरातील स्‍थानिक समुदायांना आर्थिक संधी मिळण्‍यास मदत केली जात आहे. अधिक माहितीसाठी www.cocacolacompany.comयेथे भेट द्या आणि आम्‍हाला ट्विटर, इन्‍स्‍टाग्राम, फेसबुक व लिंक्‍डइनवर फॉलो करा.

Related posts

मानसिक आरोग्‍य सुधारण्‍यासाठी ‘ईव्‍हॉल्‍व्‍ह२८’ लाँच

Shivani Shetty

सॅमसंगकडून २०२४ क्रिस्‍टल ४के विविड, क्रिस्‍टल ४के व्हिजन प्रो आणि क्रिस्‍टल ४के विविड प्रो टीव्‍ही सिरीज लाँच, किंमत ३२९९० रूपयांपासून

Shivani Shetty

कर्करोगाचे रुग्ण यांच्याबाबत सामाजिक पूर्वग्रह हाताळ्यासाठी मोहीम

Shivani Shetty

Leave a Comment