maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ईरिक्रूटकडून उल्‍लेखनीय वाढीची नोंद

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३: ईरिक्रूट या ऑनलाइन रिक्रूटमेंट सोल्‍यूशन प्रदाता कंपनीला आपल्‍या प्रवासामधील सुवर्ण टप्‍प्‍याची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. कंपनीने ऑक्‍टोबर २०२३ मध्‍ये व्‍यासपीठावर १ दशलक्षहून अधिक नवीन वापरकर्त्‍यांची नोंद केली. ईरिक्रूटच्‍या युजरवर्गामध्‍ये ४,६५१,९५९ नोकरीसाधक, १७५९ रिक्रूटर्स व ७०८ कॅम्‍पसेस असण्‍यासह १ दशलक्षहून अधिक नवीन वापरकर्ते आहेत.

ईरिक्रूटचे नोकरीसाधक, रिक्रूटर्स व कॅम्‍पसेससाठी रिक्रूटमेंट प्रक्रिया सुलभ व सुधारित करण्‍याचे मिशन आहे. २०२० मध्‍ये लाँच झाल्‍यापासून व्‍यासपीठाने अपवादात्‍मक वाढ केली आहे, जेथे ४.६ दशलक्ष उमेदवार, १,७०० हून अधिक रिक्रूटर्स आणि ७०० हून अधिक कॅम्‍पसेस ऑनबोर्ड आहेत. तसेच मार्च २०२३ मध्‍ये कॅम्पस् कार्यक्षमता सादर केलेल्‍या सुधारित साइटने ऑगस्‍ट २०२३ मध्‍ये महसूल निर्माण करण्‍यास सुरूवात केली, जेथे २०२८ पर्यंत ईबीआयटीडीए ६१.०६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे.

ईरिक्रूटचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अजय गोयलम्‍हणाले, “दशलक्षहून अधिक नवीन वापरकर्त्‍यांचे लक्ष वेधून घेण्‍यामधून रिक्रूटमेंट क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्‍ही २०२० मध्‍ये लाँच झाल्‍यापासून लांबचा पल्‍ला गाठला आहे आणि आमचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. नाविन्‍यता, सहयोग व वापरकर्ता अनुभवावरील अधिक फोकससह आमचा नोकरीसाधक, रिक्रूटर्स व कॅम्‍पसेससाठी पसंतीचे व्‍यासपीठ बनण्‍याचा मनसुबा आहे. आमचे रिक्रूटरवर्ग व कॅम्पस् नेटवर्कमधील वाढीसह आमच्‍या भावी योजना संपन्‍न इकोसिस्‍टम निर्माण करण्‍यास स्थित आहेत, ज्‍याचा सर्व भागधारकांना फायदा होईल. आम्‍ही भावी वाटचालीबाबत उत्‍सुक आहोत, तसेच आम्‍ही रिक्रूटरमेंटला सर्वांसाठी स्‍मार्टर, सुलभ व अधिक कार्यक्षम करण्‍याचा प्रयत्‍न करतो.”

भारतातील दिल्‍ली, लखनौ, हैदराबाद, बेंगळुरू, पुणे, अहमदाबाद, मुंबई, जयपूर व पटना यांसारख्‍या प्रमुख शहरांमधील वापरकर्त्‍यांनी ईरिक्रूटच्‍या नाविन्‍यपूर्ण व्‍यासपीठाचा अवलंब केला आहे. रिक्रूटर्स जसे अॅमेझॉन, पेटीएम, झोमॅटो, एचसीएल, अॅसेंचर, ईस्‍ट इंडिया ट्रान्‍सपोर्ट एजन्‍सी, सीसीआय लॉजिस्टिक्‍स लिमिटेड, गोल्‍ड प्‍लस ग्‍लास इंडस्‍ट्री लिमिटेड, साई ग्रुप ऑफ हॉटेल्‍स, मेल रिमूव्‍हल अॅण्‍ड स्‍टोरेज इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड, बायजू’ज, टेक महिंद्रा, पीव्हीआर सिनेमाज, आयडीएफसी फर्स्‍ट बँक लिमिटेड, एसबीआय सिक्‍युरिटीज, इनेर्जायझर, टीमलीज आणि रिलायन्‍स निप्‍पॉन लाइफ इन्‍शुरन्‍स यांनी त्‍यांच्‍या टॅलेंट संपादन धोरणांमध्‍ये ईरिक्रूटच्‍या महत्त्वाला ओळखले आहे. तसेच, ईरिक्रूटने प्रतिष्ठित कॅम्‍पसेससोबत सहयोग केला आहे, जसे इंडियन स्‍कूल ऑफ हॉ‍स्पिटॅलिटी, गुरू नानक देव इंजीनिअरिंग कॉलेज बायडर, ग्राफिक ईरा (युनिव्‍हर्सिटी असल्‍याची मानली जाते), अलिगड मुस्लिम युनिव्‍हर्सिटी आणि इतर अनेक.

Related posts

MobilTM प्रथमच साजरा करत आहे MotoGP™️ भारत पॉवरिंगद्वारे रेड बुल केटीएम फॅक्टरी रेसिंग टीम

Shivani Shetty

अॅबॉटकडून भारतातील फ्रीस्‍टाइल लिब्रे® सिस्‍टमचा वापर करणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी फ्रीस्‍टाइल लिब्रेलिंक मोबाइल अॅप लाँच

Shivani Shetty

फिजिक्‍सवाला मुंबईमध्‍ये ३ ऑफलाइन विद्यापीठ केंद्र उघडणार

Shivani Shetty

Leave a Comment