maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सर्वांगीण ईव्‍ही इकोसिस्‍टमच्‍या विकासाला ‘ऑडी इंडिया’चे प्राधान्‍य

मुंबई, २६ डिसेंबर २०२३: ऑडी स्थिर गतीने, पण निश्चितपणे शाश्‍वत गतीशीलतेच्‍या दिशेने वाटचाल करत आहे आणि नुकतेच या परिवर्तनाला गती देण्‍यासाठी अनेक निर्णय घेण्‍यात आले आहेत. ऑडी इंडियाने २०२१ मध्‍ये भारतात पाच इलेक्ट्रिक कार्स लाँच केल्‍या आणि सध्‍या विभागातील सर्वात मोठे लक्‍झरी ईव्‍ही पोर्टफोलिओ आहे. ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी या सहा कार्सना उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि ग्राहकांकडून सतत पसंती मिळत आहे. ऑडी इंडिया ग्राहकांसाठी सर्वसमावेशक ईव्‍ही इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे आणि त्यांनी नुकतेच मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स (बीकेसी) येथे भारतातील पहिल्या अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग ई-ट्रॉन हबचे उद्घाटन केले.

चार्जझोनसोबत सहयोगाने संकल्‍पना मांडण्‍यासह विकसित करण्‍यात आलेल्‍या या अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जरची इलेक्ट्रिक वेईकलला ३६० केडब्‍ल्‍यू शक्‍ती वितरित करण्‍यासाठी एकूण ४५० केडब्‍ल्‍यूची प्रभावी क्षमता आहे आणि उच्‍च परफॉर्मन्‍स व कार्यक्षमतेच्‍या खात्रीसाठी ५०० amps लिक्विड- कूल्‍ड गनसह सक्षम आहे. ऑडीच्‍या शाश्‍वततेवरील फोकसशी बांधील राहत अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग ‘ई-ट्रॉन हब’ला पूर्णत: ग्रीन एनर्जीची शक्‍ती आहे आणि सोलार रूफ आहे, जे ‘ई-ट्रॉन हब’ला प्रकाशमय करण्‍यासह पेरिफेरल इलेक्ट्रिकल आवश्‍यकतांच्‍या कार्यसंचालनांना साह्य करते.

या वर्षाच्‍या सुरूवातीला ऑडी इंडियाने मायऑडी कनेक्‍ट अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’ सादर केले. हे वन-स्‍टॉप सोल्‍यूशन ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच अॅपमध्‍ये अनेक इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग सहयोगींची माहिती उपलब्‍ध करून देते. ‘चार्ज माय ऑडी’ हा इंडस्‍ट्री-फर्स्‍ट उपक्रम आहे, जो ग्राहकांसाठी सोयीसुविधेमध्‍ये वाढ करतो. न्‍यूमोसिटी टेक्‍नॉलॉजीज ईएमएसपी रोमिंग सोल्‍यूशनद्वारे समर्थित अॅप्‍लीकेशनमध्‍ये सध्‍या पाच चार्जिंग सहयोगींचा समावेश आहे – आर्गो ईव्‍ही स्‍मार्ट, चार्ज झोन, रिलक्‍स इलेक्ट्रिक, लायनचार्ज आणि झिऑन चार्जिंग. ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना मार्च २०२४ पर्यंत नेटवर्कमधील (झिओन चार्जिंग वगळून) कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी चार्जिंगचा फायदा मिळेल. सध्‍या, ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी १,००० हून अधिक चार्ज पॉइण्‍ट्स उपलब्‍ध आहेत आणि पुढील काही महिन्‍यांमध्‍ये अधिक चार्ज पॉइण्‍ट्सची भर करण्‍यात येईल.

ऑडी इंडियाने भारतातील ७३ शहरांमध्‍ये १४० हून अधिक चार्जर्स यशस्‍वीरित्‍या स्‍थापित केले आहेत. यामध्‍ये सर्व ऑडी इंडिया डिलरशिप्‍स, वर्कशॉप सुविधा आणि देशातील धोरणात्‍मक महामार्गांवर असलेले निवडक एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल ग्रुप ब्रॅण्‍ड डिलरशिप्‍सचा समावेश आहे, जे मालकीहक्‍क सुलभ करतात.

२०२१ मध्‍ये जागतिक व्‍यवस्‍थापन मंडळाने कॉर्पोरेट धोरण ‘वोर्सप्रंग २०३०’ची घोषणा केली. या धोरणाचा अर्थ असा की, २०३० च्‍या दिशेने वाटचाल. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे या नवीन धोरणासह ऑडीने ब्रॅण्‍ड म्‍हणून इलेक्ट्रिक गतीशीलतेच्‍या दिशेने परिवर्तनासाठी विशिष्‍ट टाइमलाइनची घोषणा केली आहे, ज्‍यामध्‍ये २०२६ पासून फक्‍त ईव्‍हींचे लाँच आणि सॉफ्टवेअर व ऑटोनॉमस तंत्रज्ञानावर अधिक फोकस यांचा समावेश आहे. भारतात ईव्‍ही बाजारपेठेकडे अधिक लक्ष वेधले जात आहे आणि ब्रॅण्‍डला विश्‍वास आहे की आगामी महिन्‍यांमध्‍ये/वर्षांमध्‍ये ईव्‍ही बाजारपेठ अधिक विकसित होईल.

Related posts

कर्करोगाचे रुग्ण यांच्याबाबत सामाजिक पूर्वग्रह हाताळ्यासाठी मोहीम

Shivani Shetty

‘युरोफ्रॅगन्स’ ने मुंबईत नवीन क्रिएटिव्ह सेंटर स्थापित केले

Shivani Shetty

ABB ने यंत्रीकरण के लिए डिजिटल संपत्ति प्रदर्शन प्रबंधन प्लेटफॉर्म लॉन्च किया

Shivani Shetty

Leave a Comment