maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इटफिट (EatFit) आणि एचआरएक्‍स बाय ऋतिक रोशन (HRX by Hrithik Roshan) यांनी एचआरएक्‍स कॅफे सुरू करण्‍यासाठी केला सहयोग; आरोग्‍यदायी आहार सेवन करण्‍याच्‍या सवयीमध्‍ये बदल घडवून आणणार

मुंबई, २ डिसेंबर २०२३: क्‍युअरफूड्स अंतर्गत असलेला भारतातील सर्वात मोठा हेल्‍दी फूड प्‍लॅटफॉर्म इटफिट आणि ऋतिक रोशन व एक्‍सीड एंटरटेन्मेंटने स्‍थापना केलेला भारतातील स्‍वदेशी फिटनेस ब्रॅण्‍ड एचआरएक्‍स यांनी त्‍यांच्‍या नवीन एचआरएक्‍स कॅफेचे उद्घाटन केले आहे, जे मुंबईतील लोअर परेल येथील पॅलेडियममध्‍ये धोरणत्‍मकरित्‍या स्थित आहे. आज बहुप्रतिक्षित उद्घाटनादरम्‍यान एचआरएक्‍स कॅफेचे अनावरण पाहण्‍यासाठी मोठा जनसमुदाय जमला होता. एचआरएक्‍स कॅफे शहरातील आरोग्‍यदायी आहार सेवन करण्‍याच्‍या सवयीमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे.

या उद्घाटनानंतर एचआरएक्‍स ब्रॅण्‍डचा एचआरएक्‍स कॅफेचे फूटप्रिंट अधिकाधिक ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. मुंबईमध्‍ये उद्घाटन करण्‍यात आलेल्‍या स्‍टोअरसह या वर्षाखेरपर्यंत विविध ठिकाणी एचआरएक्‍स कॅफे स्‍थापित करण्‍याचे मिशन सुरू झाले आहे. या विस्‍तारीकरणामधून प्रत्‍येक आहारामध्‍ये उत्तम पोषण मिळण्‍याची अपेक्षा असलेल्‍या आरोग्‍याप्रती जागरूक व्‍यक्‍तींचे पालनपोषण करण्‍याप्रती ब्रॅण्‍डची समर्पितता दिसून येते.

क्‍युअरफूड्सचे संस्‍थापक अंकित नागोरी म्‍हणाले, ”मला मुंबईतील फिनिक्‍स पॅलेडियम येथे सहयोगाने एचआरएक्‍स बाय इटफिट कॅफेचे उद्घाटन करण्‍याचा आनंद होत आहे. क्‍युअरफूड्स व एचआरएक्‍स यांच्‍यामधील हा सहयोग फिटनेस, वेलनेस आणि पाककला सर्वोत्तमतेच्‍या फ्यूजनला सादर करतो, ज्‍यामधून समुदायाला सर्वांगीण अनुभव देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. एचआरएक्‍स कॅफेमध्‍ये आमचा उत्तम पाककलांसह सर्वांगीण पोषण देण्‍याचा, तसेच फिटनेससाठी ऊर्जा प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे. हे वेलनेसला नव्‍या उंचीवर नेण्‍याच्‍या दिशेने उचलण्‍यात आलेले पाऊल आहे आणि आम्‍ही सर्व मुंबईकरांसोबत हा उत्‍साहवर्धक प्रवास शेअर करण्‍यासाठी अत्‍यंत उत्‍सुक आहोत.” 

एचआरएक्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अफसर झैदी आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ”मला एचआरएक्‍स ब्रॅण्‍ड तत्त्वाचे विस्‍तारीकरण असलेल्‍या एचआरएक्‍स कॅफे लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. एचआरएक्‍स कॅफे आरोग्‍यदायी आहाराची खात्री देण्‍यासह व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या फिटनेस महत्त्वाकांक्षा व ध्‍येयांनुसार आहार पर्याय निवडण्‍यास सक्षम करतो. एचआरएक्‍स कॅफेमधून दैनंदिन अॅथलीट्सना त्‍यांचे सर्वोत्तम ध्‍येय संपादित करण्‍यास पाठिंबा देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.” 

एचआरएक्‍स कॅफे सर्वांगीण अनुभव देते, ज्‍यामध्‍ये स्‍वाद व पोषणाचे उत्तम संयोजन आहे. स्‍वादिष्‍ट मेन्‍यूमध्‍ये उच्‍च प्रोटीनयुक्‍त ब्रेकफास्‍ट, सानुकूल सॅलड्स, सुपर बाऊल्‍स व सर्वांगीण ग्रॅब-अॅण्‍ड-गो स्‍नॅक्‍स आहेत. कॅफे आरोग्‍याप्रती जागरूक व्‍यक्‍ती व दैनंदिन अॅथलीट्सच्‍या गरजांची पूर्तता करतो. प्रोटीनयुक्‍त ऑफरिंग्‍जवर भर देत कॅफे व्‍यक्‍तींना संतुलित व सक्रिय जीवनशैली राखण्‍यास प्रेरित करण्‍यासह पाठिंबा देते. 

एचआरएक्‍स कॅफेचे अद्वितीय पैलू पाककलांमध्‍ये विविध मिलेट्सचा समावेश करण्‍याप्रती त्‍यांच्‍या कटिबद्धतेमध्‍ये सामावलेले आहे. क्विनोआ मिलेट व ब्‍लॅक राइसचा अधिक वापर करत कॅफे ग्राहकांना आहारविषयक बारकाईने निवड करण्‍यास प्रेरित करते, जे त्‍यांच्‍या फिटनेस ध्‍येयांशी संलग्‍न असेल. एचआरएक्‍स कॅफे या प्रवासाच्‍या दिशेने वाटचाल करत असताना दैनंदिन आहारामध्‍ये आरोग्‍यदायी व सर्वांगीण पोषणाचा शोध घेत असलेल्‍यांसाठी पाककला गंतव्‍य बनण्‍याची ब्रॅण्‍डची महत्त्वाकांक्षा आहे. 

इटफिट बाबत 

इटफिट हा भारतामधील आघाडीची क्‍लाऊड किचन कंपनी क्‍युअरफूड्स अंतर्गत भारतातील सर्वात मोठा हेल्‍दी फूड प्‍लॅटफॉर्म आहे. कंपनी स्‍वादिष्‍ट व आरोग्‍यदायी आहाराची व्‍यापक श्रेणी देते,तसेच प्रामाणिकपणा, शुद्धता व आरोग्‍यदायी पैलू कायम ठेवते,ज्‍यासाठी इटफिट २०१७ पसून ओळखली जाते. इटफिट सध्‍या १०० क्‍लाऊड किचन्‍सचे कार्यसंचालन पाहते. क्‍युअरफिटचे सह-सह-संस्‍थापक अंकित नागोरी यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत इटफिटचा देशभरात आरोग्‍यदायी आहाराचे पोहोच व स्‍वीकार्यता वाढवण्‍याचा मनसुबा आहे. कंपनी आरोग्‍यदायी आहार धमाल, स्‍वादिष्‍ट व प्रामाणिकपणे भारतीय करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. २०२० मध्‍ये क्‍युअरफिटपासून स्‍वतंत्र ब्रॅण्‍ड म्‍हणून इटफिटची स्‍थापना करण्‍यात आली. तेव्‍हापासून ब्रॅण्‍ड भारतातील वाढत्‍या क्‍लाऊड किचन विभागाचा फायदा घेण्‍यासाठी क्‍युअरफूड्सच्‍या आश्रयांतर्गत कार्यरत आहे. 

अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: 

वेबसाइट: https://www.eatfit.in/ 

इन्‍स्‍टाग्राम: https://www.instagram.com/the_eatfit/ 

यूट्यूब: https://www.youtube.com/channel/UC164NxwbAyEkwFDfAcurzAA 

लिंक्‍डइन: https://www.linkedin.com/company/curefoods/?originalSubdomain=in 

Related posts

टाटा मोटर्सने प्रगत गतीशीलता सोल्‍यूशन्‍स दाखवण्‍यासाठी लाँच केला अद्वितीय ग्राहक सहभाग उपक्रम – ‘ट्रक उत्‍सव’

Shivani Shetty

भारतीयांसाठी आजही रिअल इस्‍टेट गुंतवणूकीसाठी पसंतीचा मालमत्तावर्ग: हाऊसिंगडॉटकॉम

Shivani Shetty

झिप इलेक्ट्रिकने तिप्‍पट महसूल वाढीची नोंद केली

Shivani Shetty

Leave a Comment