लिंक:
https://www.bseindia.com/markets/MarketInfo/DispNewNoticesCirculars.aspx?page=20240301-39
आर के स्वामी लिमिटेडने २८८ रु. प्रति इक्विटी शेअरला (प्रति इक्विटी शेअर २८३ रु. च्या शेअर प्रीमियमसह) ६५ लाख इक्विटी शेअर्सचे वाटप करून १८७ कोटी रु. उभारले.
प्रमुख गुंतवणूकदारांना ६५ लाख इक्विटी शेअर्सच्या एकूण वाटपांपैकी २८ लाख इक्विटी शेअर्सचे (प्रमुख गुंतवणूकदार भागाच्या 43.82%) एकूण ७ योजनांद्वारे तीन म्युच्युअल फंडांना वाटप करण्यात आले.
प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये निप्पॉन लाइफ इंडिया ट्रस्टी लिमिटेड, एलआयसी म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स, पाइनब्रिज, ग्लोबल फंड, बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स, जेएम फायनान्शिअल म्युच्युअल फंड, एसबीआय जनरल लाइफ इन्शुरन्स, जीएएम मल्टीस्टॉक इमर्जिंग मार्केट्स इक्विटी, सोसायटी जनरल, विकास इंडिया EIF I फंड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स मॉरिशस प्रायव्हेट लिमिटेड – ODI, कॉपथोल मॉरीशस इन्व्हेस्टमेंट लिमिटेड-ODI, गोल्डमन Sachs सिंगापूर PTE – ODI, बीएनपी परिबास फायनान्शियल मार्केट्स – ODI यांचा समावेश आहे.
इश्यू सोमवार ४ मार्च २०२४ रोजी खुला होईल आणि बुधवार ६ मार्च २०२४ रोजी बंद होईल.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीजलिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरी लिमिटेड हे या इश्यू संदर्भात सल्ला देणारे बँकर्स आहेत.