मुंबई, १५ एप्रिल २०२४: भारतातील प्रतिष्ठित मेन्स ब्रँड डेन्वरने त्यांच्या ‘सक्सेस’ मोहिमेच्या प्रेरणादायी विस्तारीकरणाला लाँच केले आहे, ज्यामध्ये मेगास्टार व ब्रँड अॅम्बेसेडर शाहरूख खान आहेत. यशस्वी झाल्याने सद्गुणांकडे दुर्लक्ष केले जाणाऱ्या युगामध्ये ही मोहिम आमूलाग्र परिवर्तनाला प्रेरित करत दुर्मिळ उपलब्धींमधील यशाला नव्या उंचीवर घेऊन जाते. ब्रँड जाहिरात साध्या, पण प्रबळ कथानकाच्या माध्यमातून मार्मिक संदेश देते.
बॉलिवुडचा बादशाह शाहरूख खान ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स आणि यशाचे खरे आयकॉन म्हणून ओळखले जातात. सरळसाध्या पार्श्वभूमीमधून आलेल्या या स्वावलंबी माणसाने यशाच्या व्याख्येला नव्या उंचीवर नेले आहे. मानवता व सहानुभूतीचे प्रतीक असलेल्या त्यांच्याभोवती केंद्रित ही जाहिरात सामाजिक स्थितीकडे न पाहता सर्वांशी आदराने वागण्याच्या महत्त्वावर भर देते. ‘इन्सान छोटा या बडा अपनी सोच से होता है (व्यक्तीची विचारसरणी समाजातील त्याचे स्थान ठरवते), सक्सेस शुड नॉट गो टू युअर हेड’ या आपल्या संवादाच्या माध्यमातून शाहरूख खान प्रेक्षकांना इतरांच्या तुलनेत स्वत:च्या वृत्तींकडे पाहण्यास आणि समानता व दयाळूपणा अंगिकारण्यास प्रेरित करतात. एकूण, ब्रँड जाहिरात यशस्वी व्यक्ती विनम्र राहत आपल्या उपलब्धींबाबत सांगतात, हे निदर्शनास आणते.
हॅमिल्टन सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ गुप्ता म्हणाले, ”फ्रॅग्रन्सच्या माध्यमातून जीवन संपन्न करण्याप्रती कटिबद्ध ब्रँड म्हणून आमचा मानवतेमध्ये सामावलेल्या यशाच्या क्षमतेवर विश्वास आहे. या मोहिमेसह आमचा संवादांना चालना देण्याचा मनसुबा आहे, जे व्यक्तींना आठवण करून देतात की खरे यश दयाळूपणा व सहानुभूतीने वागण्यामध्ये आहे. यश व विनम्रतेचे प्रतीक शाहरूख खान आमचा ब्रँड संदेश देण्यासाठी अगदी योग्य आहेत. आमच्या फ्रॅग्रन्सेसप्रमाणे यश फक्त दाखवण्यापुरते मर्यादित नसून सर्वांशी आदराने वागण्यामधून मिळालेले यश महत्त्वाचे असते.”
शाहरूख खान सात वर्षांपासून ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून डिओडरण्ट ब्रँड डेन्वरशी संलग्न आहेत. वर्षानुवर्षे ब्रँड देशातील सर्वात पसंतीचा फ्रॅग्रन्स ठरला आहे. ब्रँडचा पुढील काही वर्षांमध्ये पुरूषांसाठी पसंतीचा ग्रूमिंग ब्रँड बनण्याचा मनसुबा आहे.