जागतिक डिजिटल इकोसिस्टम प्रदाता असलेल्या टाटा कम्युनिकेशन्सने २०२४ पर्यंत भारतातील बिहार आणि ओडिशा राज्यांमधील ५ दशलक्ष महिलांना उद्योजकता शिक्षण आणि व्यावसायिक मार्गदर्शन पुरविण्यासाठी त्यांच्या ‘स्कूल ऑफ होप अँड एम्पॉवरमेंट’ (S.H.E) प्रकल्पाचा दूसरा टप्पा आज सादर केला. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याने महिलांना शिक्षण मालिका पूर्ण करण्यासाठी आणि सर्वांसाठी दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करून स्वतंत्रपणे व्यवसाय उभारण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्यांसह सक्षम बनण्यास प्रेरित केले आहे.
टाटा कम्युनिकेशन्सचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी आदेश गोयल म्हणाले, “स्कूल ऑफ होप अँड एम्पॉवरमेंट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याने झारखंडमधील महिलांच्या कल्याणात प्रगती केली आहे आणि त्यांना त्यांचे कुटुंब आणि मोठ्या समुदायाची प्रगती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सक्षम केले आहे