maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

पेटीएमचा महसूल वार्षिक २५ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ९,९७८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला

मुंबई, २४ मे २०२४: पेटीएम या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने आर्थिक वर्ष २४ ची चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष २४ च्‍या निकालांची घोषणा केली आहे. कंपनीच्‍या मुलभूत व्‍यवसायाचा महसूल आर्थिक वर्ष २४ मध्‍ये वार्षिक २५ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ९,९७८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. या वाढीचे श्रेय गतीशील जीएमव्‍ही, मजबूत डिवाईस भर आणि कंपनीच्‍या आर्थिक सेवा वितरण व्‍यवसायाच्‍या विस्‍तारीकरणाला जाते.

आर्थिक वर्ष २४ मध्‍ये जीएमव्‍ही ३९ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह १८.३ लाख कोटी रूपयांपर्यंत पोहोचले. मार्च २०२४ पर्यंत १.०७ कोटी मर्चंट्सने डिवाईस सबस्क्रिप्‍शन्‍ससाठी देय भरल्‍यामुळे सबस्क्रिप्‍शन महसूलामध्‍ये मोठी वाढ झाली.

आर्थिक वर्ष २०२४ कंपनीसाठी उल्‍लेखनीय वर्ष ठरले आहे, जेके कंपनीने आयपीओपासून पहिल्‍यांदाच संपूर्ण वर्षात नफा संपादित केला, तसेच ईएसओपी लेव्‍हल पूर्वी ईबीआयटीडीए ५५९ कोटी रूपये होते, जे गेल्‍या आर्थिक वर्षाच्‍या तुलनेत ७३४ कोटी रूपयांनी वाढले. कंपनीचा पेमेंट सर्विसेसमधून महसूल आर्थिक वर्ष २४ मध्‍ये वार्षिक २६ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ६,२३५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आणि आर्थिक वर्ष २४ च्‍या चौथ्‍या तिमाहीमध्‍ये वार्षिक ७ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह १,५६८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. 

कंपनीला गेल्‍या आर्थिक वर्षामधील १८२ कोटी रूपयांच्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २४ साठी २८८ कोटी रूपयांचे यूपीआय इन्‍सेंटिव्‍ह्ज मिळाले (आर्थिक वर्ष २४ च्‍या चौथ्‍या तिमाहीमध्‍ये नोंदणी केलेले). आर्थिक वर्ष २४ मध्‍ये योगदान नफा ४२ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ५,५३८ कोटी रूपयांवर पोहोचला आणि एकूण कर्ज वितरण ४८ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ५२,३९० कोटी रूपयांवर पोहोचले. व्‍यासपीठावर वापरकर्त्‍यांचा सहभाग देखील वाढला, जेथे आर्थिक वर्ष २४च्‍या चौथ्‍या तिमाहीसाठी सरासरी मंथली ट्रान्‍झॅक्टिंग युजर्स (एमटीयू) वार्षिक ७ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ९.६ कोटींवर पोहोचले.

पेटीएमला आर्थिक वर्ष २५च्‍या दुसऱ्या तिमाहीपासून प्रबळ महसूल वाढ आणि सुधारित नफ्याची अपेक्षा आहे, ज्‍यासाठी बँक सहयोगांच्‍या माध्‍यमातून आर्थिक उत्‍पादन वितरण वाढवण्‍यावर लक्ष केंद्रित करत आहे, तसेच ग्राहक धारणा व सेवेमध्‍ये वाढ करत आहे.

Related posts

विद्यालंकार ग्रुपने ‘वार्षिक एचआर समिट 2024’ चे यशस्वीपणे आयोजन केले आहे, भविष्यातील नेत्यांना आकार देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Shivani Shetty

हिरो मोटोकॉर्पच्‍या करिझ्मा एक्‍सएमआरला मिळाला १३,६८८ बुकिंग्‍जचा प्रतिसाद

Shivani Shetty

एचडीएफसी लाइफने ९९.५० टक्‍के क्‍लेम सेटलमेंट रेशिओ संपादित केला आणि आर्थिक वर्ष २४ साठी क्‍लेम्‍समध्‍ये १,५८४ कोटी रूपये देय दिले

Shivani Shetty

Leave a Comment