भुवनेश्वर, सप्टेंबर २०२३: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज ओडिशा सरकारला १८१ विंगर वेटेनरी व्हॅन्सच्या वितरणाची घोषणा केली. ओडिशाचे माननीय मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यासह ओडिशा सरकार व टाटा मोटर्सचे प्रतिनिधी यांनी या वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. खास सानुकूलित टाटा विंगरचा उपयोग पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालनालय, ओडिशा सरकारद्वारे मोबाइल वेटेरिनरी व्हॅन्स म्हणून करण्यात येणार आहे. सरकारी संस्थेच्या अटी व शर्तींनुसार टाटा मोटर्स ही सर्वोच्च बोलीदार म्हणून उदयास आली आणि त्यांनी अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज पूर्णतः तयार केलेल्या विंगर वेटेनरी व्हॅन्सचा ताफा दिला. ई-बिडिंग प्रक्रिया सरकारी ई-मार्केटप्लेसच्या माध्यमातून पार पडली.
याप्रसंगी आपले मत व्यक्त करत टाटा मोटर्सच्या सीव्ही पॅसेंजर्सचे व्यवसाय प्रमुख श्री. रोहित श्रीवास्तव म्हणाले, ”टाटा मोटर्सला ओडिशा सरकारला १८१ वेटेनरी व्हॅन्स वितरित करण्याचा आनंद होत आहे, ज्यामुळे प्राण्यांसाठी सुलभपणे आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे. परपज-बिल्ट विंगर वेटेनरी व्हॅन्सच्या वितरणाच्या माध्यमातून आम्ही राज्याच्या पशुवैद्यकीय सेवांचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनाला चालना देण्याप्रती कटिबद्ध आहोत. या नाविन्यपूर्ण व्हॅन्स ओडिशामध्ये सुरळीत कामकाजासाठी बारकाईने डिझाइन करण्यात आल्या आहेत.’’
टाटा विंगरमध्ये २.२ लीटर डीआयसीओआर इंजिनच्या शक्तीसह सुधारित टॉर्क व सर्वोत्तम फ्यूएल इकोनॉमी आहे. या वेईकलमध्ये इको स्विच व गिअर शिफ्ट अॅडवायजर आहे, जे इंधन कार्यक्षमता वाढवण्यामध्ये मदत करते. विंगरची २५.८ टक्के सर्वोत्तम ग्रेड-एबिलिटी तीव्र चढण असलेल्या रस्त्यांवर व उड्डाणपूलांवर सहजपणे ड्राइव्ह करण्यास मदत करते. तसेच विंगरच्या स्वतंत्र फ्रण्ट सस्पेंशनसह अॅण्टी-रोल बार्स आणि हायड्रॉलिक शॉक अॅब्जॉर्बर्स त्याच्या मोनोकॉक बॉडी डिझाइनप्रमाणे सुलभ राइडची खात्री देतात, ज्यामधून कार-सारख्या ड्रायव्हिंग गतीशीलता आणि नॉईज, व्हायब्रेशन अॅण्ड हार्शनेस (एनव्हीएच)च्या कमी पातळ्यांची खात्री मिळते.