maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

आयओएसपीएलने भारतात तीन सहयोगी ब्रॅण्‍ड्स लॉन्च केले

मुंबई, १३ डिसेंबर २०२३: आयओएसपीएल (इन्‍फानाईट ऑनलाइन शॉपिंग प्रायव्‍हेट लिमिटेड) या भारतातील जागतिक ब्रॅण्‍ड्ससाठी आघाडीच्‍या ओम्‍नीचॅनेल सहयोगीने पहिल्‍यांदाच भारतात ब्‍युटी व पर्सनल केअर विभागातील त्‍यांचे तीन सहाय्यक ब्रॅण्‍ड्स नॅच्‍युरटिंट, बोल्‍डीफाय आणि एस्‍टेट कॉस्‍मेटिक्स लाँच केले आहेत. कॉस्‍मोप्रोफ मुंबई येथे लाँच करण्‍यात येणारे भारतातील हे तीन ब्रॅण्‍ड्स व्‍यासपीठासाठी, तसेच ब्रॅण्‍ड्ससाठी महत्त्वाचा टप्‍पा आहेत.

आयओएसपीएलचे संस्‍थापक श्री. बिमल ठक्‍कर म्‍हणाले, “आयओएसपीएल विकसित होत असलेल्‍या भारतीय ब्‍युटी व पर्सनल केअर बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवत असताना आम्‍हाला शाश्‍वत, दोष-मुक्‍त पर्यायांचा शोध घेत असलेल्‍या सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांसाठी नॅच्‍युरटिंट, बोल्‍डीफाय व इस्‍टेट कॉस्‍मेटिक्‍स लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. नाविन्‍यपूर्ण, पर्यावरणाप्रती जागरूक ब्रॅण्‍ड्स सादर करण्‍याप्रती आमची कटिबद्धता नैतिक व सुरक्षित ब्‍युटी सोल्‍यूशन्‍सप्रती ग्राहकांच्‍या विकसित होणाऱ्या पसंतींशी संलग्‍न आहे. आम्‍ही हे ब्रॅण्‍ड्स सादर करणाऱ्या संधींचा फायदा घेण्‍यास, तसेच व्‍यक्‍तींना तडजोड न करता जबाबदारीने ब्‍युटी आत्‍मसात करण्‍यास सक्षम करण्‍यास उत्‍सुक आहोत.”

नॅच्‍युरटिंट: आरोग्‍य व पर्यावरणावर कोणतेही परिणाम न होता आरोग्‍यदायी, उत्‍साही, चमकदार ट्रेसेस हवे असणा-यांसाठी हे योग्य उत्पादन आहे. हेअर कलर विभागातील ट्रेलब्‍लेझर नॅच्‍युरटिंट अमोनिआ, रेसोर्किनोल, पॅराबेन्‍स, कोकामाइड डीईए, सिलिकॉन्‍स, पॅरोफिन्‍स, मिनरल ऑईल्‍स, एसएलएस व आर्टिफिशियल फ्रॅग्रॅन्‍सेसासून मुक्‍त असलेल्‍या उत्‍पादनांसह हे ट्रेसेस संपादित करण्‍यास मदत करते.

बोल्‍डीफाय: मुळांपासून केसांची काळजी घेत बोल्‍डीफाय केसगळतीसाठी त्रास-मुक्‍त, सुरक्षित सोल्‍यूशन्‍सचा शोध घेणाऱ्या व्‍यक्‍तींची पूर्तता करते. उच्‍च दर्जाला प्राधान्‍य देत बोल्‍डीफाय आपल्‍या उत्‍पादनांमध्‍ये वनस्‍पती-आधारित फायबर्सचा वापर करते, ज्‍यामधून वापरकर्त्‍यांना एकसंधी, रिअल-हेअर-लाइक फिनिश मिळते.”

एस्‍टेट कॉस्‍मेटिक्‍स: नैतिक सौंदर्याला नव्‍या उंचीवर घेऊन जाणारे कॅनेडियन सेन्‍सेशन एस्‍टेट कॉस्‍मेटिक्‍स उच्‍च-दर्जाचे, पिग्‍मेण्‍टेड, किफायतशीर, वेजन व दोष-मुक्‍त कॉस्‍मेटिक्‍सची श्रेणी देते. प्रेमळ व शुद्ध विश्‍व निर्माण करण्‍याप्रती अविरत कटिबद्धतेसह एस्‍टेट कॉस्‍मेटिक्‍स किफायतशीर किमतीमधील लक्‍झरीअस उत्‍पादने तयार करते, ज्‍यामुळे सर्वांसाठी सौंदर्य प्रसाधने किफायतशीर व उपलब्‍धहोण्‍याजोगे होतात.

नॅच्‍युरटिंटच्‍या ग्‍लोबल मार्केटिंग हेड करिष्‍मा जेस्‍वानी म्‍हणाल्‍या, “नॅच्‍युरटिंटमध्‍ये आम्‍हाला भारतातील सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांसाठी आमचे अग्रणी, अमोनिआ-मुक्‍त परमनण्‍ट हेअर कलर फॉर्म्‍युलेशन्‍स सादर करण्‍यास आनंद होत आहे. शाश्‍वत, दोष-मुक्‍त सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दर्जा किंवा पर्यावरणाबाबत तडजोड न करता आकर्षक, आरोग्‍यदायी केस असण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांशी संलग्‍न आहे. आम्‍ही भारतातील बाजारपेठेत प्रवेश करत असताना नाविन्‍यता आणि नैसर्गिक सौंदर्याचा समावेश असलेल्‍या विविध शेड्स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

बोल्‍डीफायचे भारतातील विपणन प्रमुख हिमाद्री यांनी सांगितले की, “बोल्‍डीफायला भारतात क्रांतिकारी अॅनिमल टेस्‍ट फ्री व वेजन हेअर सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍याचा, तसेच दाट, कोमल केस असण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांसाठी एकसंधी, नॅच्‍युरल फिनिश प्रदान करण्‍याचा अभिमान वाटत आहे. दर्जा, सोयीसुविधा व सुरक्षिततेप्रती आमची कटिबद्धता आपल्‍या अद्वितीय सौंदर्याला महत्त्व देणाऱ्या व्‍यक्‍तींशी संलग्‍न आहे.”

एस्‍टेट कॉस्‍मेटिक्‍सचे अध्‍यक्ष गुरमीत टागोर यांनी मत व्‍यक्‍त केले, “आम्‍हाला हा अविश्‍वसनीय प्रवास सुरू करण्‍याचा आनंद होत आहे, जेथे इस्‍टेट कॉस्‍मेटिक्‍स भारतात पदार्पण करत आहे. हा आमच्‍या ब्रॅण्‍डसाठी महत्त्वाचा टप्‍पा आहे. कॉस्‍मोप्रोफ, मुंबई येथे आमच्‍या लाँचसाठी आयओएसपीएलसोबतचा सहयोग अर्थपूर्ण आहे, जो नैतिक सौंदर्याला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याच्‍या आमच्‍या तत्त्वाशी संलग्‍न आहे. इस्‍टेट कॉस्‍मेटिक्‍समध्‍ये आमचे मेकअपला नव्‍या स्‍तरावर घेऊन जाण्‍याचे मिशन आहे, तसेच सकारात्‍मक परिवर्तन आणि विविधतेला आत्‍मसात करण्‍याप्रती मार्गदर्शन केले जाते.”

Related posts

मुंबईत रंगणार ‘मिस वर्ल्‍डची’ ग्रॅण्‍ड फिनाले

Shivani Shetty

इझमायट्रिपचा कव्‍हर जिनियससोबत सहयोग

Shivani Shetty

मधुमेह असताना आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना

Shivani Shetty

Leave a Comment