maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

क्विक हील दोन प्रतिष्ठित पुरस्‍कारांसह सन्‍मानित

मुंबई, २६ मे २०२४: क्विक हील टेक्नोलॉजीज लि. या आघाडीच्‍या जागतिक सायबरसुरक्षा सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने आज घोषणा केली की, त्‍यांचे प्रमुख उत्‍पादन क्विक हील टोटल सिक्‍युरिटीला एव्‍हीलॅब सायबरसिक्‍युरिटी फाऊंडेशनने दोन प्रतिष्ठित पुरस्‍कारांसह सन्‍मानित केले आहे. एव्‍हीलॅब सायबरसिक्‍युरिटी फाऊंडेशन ही इंटरनेटवरील गोपनीयता व सुरक्षिततेचे संरक्षण करण्‍याप्रती समर्पित स्‍वतंत्र कंपनी आहे. एव्‍हीलॅबच्‍या प्रखर अॅडवान्‍स्‍ड इन-द-वाइल्‍ड मालवेअर टेस्‍ट फॉर २०२३ मध्‍ये क्विक हील टोटल सिक्‍युरिटीने १,४७२ प्रत्‍यक्ष मालवेअर नमुन्‍यांसंदर्भात अपवादात्‍मक १०० टक्‍के निदान व उपाय दर संपादित केला.

पहिला पुरस्‍कार एव्‍हीलॅबचे ‘प्रॉडक्‍ट ऑफ द इअर २०२४’ प्रमाणन विंडोज ऑपरेटिंग सिस्‍टमसाठी क्विक हील टोटल सिक्‍युरिटीच्‍या अत्‍यंत शक्तिशाली व सर्वसमावेशक संरक्षण क्षमतांची पुष्‍टी देते. हे प्रमाणन डिफॉल्‍ट किंवा शिफारस केलेल्‍या सिक्‍युरिटी सेटिंग्‍जचा वापर करत वेबसाइट्स, स्‍पॅम व मेसेजिंग अॅप्‍स यासारख्‍या इंटरनेट स्रोतांमधील मालवेअरला प्रतिबंध करण्‍यामधील सोल्‍यूशनच्‍या कार्यक्षमतेनुसार दिले जाते.  

क्विक हील टोटल सिक्‍युरिटीला धोके ओळखण्‍यासाठी त्‍याच्‍या अत्‍यंत गतीशील प्रतिसादासाठी, तसेच सर्व मालिशियस क्रियाकलाप व आर्टिफॅक्‍ट्सना पूर्णत: दूर करत सुरूवातीपासून सिस्‍टममधील मालवेअर दूर करण्‍याच्‍या क्षमतेसाठी ‘टॉप रिमीडिशन टाइम’ पुरस्‍कार देखील मिळाला. या मान्‍यतेमधून सर्वात स्थिर व सर्वात प्रचलित मालवेअरविराधोत क्विक हीलची स्‍तरीय सुरक्षित व ऑटोमेटेड उपाय क्षमता दिसून येते. 

क्विक हीलचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी म्‍हणाले, ”एव्‍हीलॅब सायबरसिक्‍युरिटी फाऊंडेशनकडून ‘प्रॉडक्‍ट ऑफ द इअर’ आणि ‘टॉप रिमीडिशन टाइम’ पुरस्‍कार मिळणे उल्‍लेखनीय कामगिरी आहे, ज्‍यामधून सायबरसुरक्षा नाविन्‍यता प्रगत करण्‍याप्रती आमची निरंतर कटिबद्धता दिसून येते. फसवणूक करणारे त्यांच्‍या कृत्‍यांमध्‍ये बदल करत असताना क्विक हील बाजारपेठ अग्रणी संरक्षण क्षमता देण्‍याप्रती कटिबद्ध आहे, ज्‍या आमच्‍या ग्राहकांना वास्‍तविक विश्‍वातील नवीन मालवेअर धोक्‍यांपासून सुरक्षित ठेवतात.”

Related posts

टाटा मोटर्सकडून प्रिमिअम डिझाइन, दर्जात्‍मक तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये असलेली न्‍यू जनरेशन नेक्‍सॉन लाँच

Shivani Shetty

रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित करणार ‘रेनल डिनरव्हेशन’ उपचार पद्धती

Shivani Shetty

सॅमसंग टीव्‍ही प्‍लसकडून फक्‍त सॅमसंग स्‍मार्ट टीव्‍हींवर व्‍हायकॉम१८ च्‍या चार नवीन फास्‍ट चॅनेल्‍सच्‍या लाँचची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment