maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा ओएनडीसी नेटवर्कसोबत सहयोग

मुंबई, २४ मे २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ट्रॅव्‍हल टेक प्लॅटफॉर्मने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) सोबत सहयोग करण्‍यासाठी लेटर ऑफ इंटेण्‍ट (एलओआय) वर स्‍वाक्षरी केल्‍याची घोषणा केली आहे. हा पुढाकार इझमायट्रिपला ओएनडीसीच्‍या या परिवर्तनात्‍मक उपक्रमाप्रती कटिबद्ध करतो. २०२१ मध्‍ये भारत सरकारने लाँच केलेल्‍या ओएनडीसी उपक्रमाचा खुली, सर्वसमावेशक व स्‍पर्धात्‍मक डिजिटल कॉमर्स इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम लघु व्‍यवसायांसाठी प्रवेशासंदर्भातील अडथळ्यांना दूर करतो आणि ई-कॉमर्स क्षेत्रात समान संधीला चालना देतो.

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्‍ट्री अॅण्‍ड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी), ओएनडीसी आणि स्‍टार्टअप इंडियाने आयोजित केलेल्‍या ‘ओएनडीसी स्‍टार्टअप महोत्‍सव’मध्‍ये एलओआयवर स्‍वाक्षऱ्या करण्‍यात आल्‍या. वाणिज्‍य भवन, नवी दिल्‍ली येथे १७ मे २०२४ रोजी आयोजित करण्‍यात आलेला ओएनडीसी स्‍टार्टअप महोत्‍सव भारताच्‍या डिजिटल कॉमर्स प्रवासातील महत्त्वाचा टप्‍पा ठरला.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी म्‍हणाले, “इझमायट्रिप नाविन्‍यता आणि सर्वोत्तम सेवेच्‍या माध्‍यमातून ग्राहकांसाठी प्रवास अनुभवाला अधिक उत्‍साहित करण्‍याप्रती नेहमी कटिबद्ध आहे. ओएनडीसी नेटवर्कमध्‍ये सामील होत आम्‍ही भारतातील कॉमर्सच्‍या डिजिटल परिवर्तनाला पाठिंबा देण्‍याप्रती मोठे पाऊल उचलत आहोत. हा सहयोग नेशन-फर्स्‍ट कंपनी असण्‍याच्‍या आमच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे, जो भारताच्‍या डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेची वाढ व विकासाप्रती योगदान देत आहे.” 

ओएनडीसीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी टी. कोशी म्‍हणाले, “ओएनडीसी नेटवर्कचा डिजिटल लँडस्‍केपमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याचा, विशेषत: देशभरातील व्‍यवसायांना व उद्योजकांना ऑनलाइन कॉमर्सच्‍या व्‍यापक क्षमतांचा फायदा घेण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा होता. इझमायट्रिप सारख्‍या कंपन्‍या नेटवर्कमध्‍ये सामील होण्‍यासह ओपन नेटवर्कच्‍या क्षमतेचा फायदा घेण्‍याचा आमचा दृष्टिकोन अधिक प्रबळ झाला आहे, ज्‍यामुळे सर्वसमावेशक प्रगतीला चालना मिळेल आणि सर्वांसाठी नवीन संधी अनलॉक होतील.”

१२५ हून अधिक स्‍टार्टअप्‍स आणि २० हून अधिक युनिकॉर्न्‍ससह इझमायट्रिपने या इव्‍हेण्‍टमध्‍ये सहभाग घेतला, ज्‍यांनी भारतातील डिजिटल कॉमर्सचे लोकशाहीकरण करण्‍यासाठी ओएनडीसीने सादर केलेल्‍या संधींचा फायदा घेतला. ‘ओएनडीसी स्‍टार्टअप महोत्‍सव’मध्‍ये हायब्रिड मोडमधील जवळपास ५,००० स्‍टार्टअप्‍स एकत्र आल्‍या आणि ओएनडीसीमधील स्‍टार्टअप्‍स सक्षम करण्‍याबाबत प्रभावी पॅनेल चर्चा व मास्‍टरक्‍लासचा समावेश होता.

Related posts

आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप २०२३ ची ऑफिशियल बेव्‍हरेज सहयोगी थम्‍स अपकडून डिस्नी+ हॉटस्‍टारसोबत सहयोगाने क्रिकेट लीजेण्‍ड्सचा समावेश असलेली मोहिम ‘थम्‍स अप फॅन पल्‍स’ लाँच

Shivani Shetty

मुंबई की भावना, सर्वसमावेशिता और एकता को संरक्षित करने के लिए मुंबई फेस्टिवल 2024 में ‘हर किसी को आमंत्रित’

Shivani Shetty

इंडियास्किल स्पर्धा नोंदणीची तारीख १५ जानेवारीपर्यंतवाढवली

Shivani Shetty

Leave a Comment