maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपची ऑफिशियल बेव्‍हरेज सहयोगी थम्‍स अपकडून मोहिम ‘थम्‍स अप उठा, इंडिया इंडिया मचा’ लाँच

राष्‍ट्रीय, ४ सप्‍टेंबर: थम्‍स अप या कोका-कोला कंपनीच्‍या प्रतिष्ठित स्‍वदेशी बेव्‍हरेज ब्रॅण्‍डला मोहिम ‘थम्‍स अप उठा, इंडिया इंडिया मचा’च्‍या माध्‍यमातून आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपसोबत त्‍यांच्‍या सहयोगाच्‍या पुढील नवीन चॅप्‍टरची घोषणा करताना आनंद होत आहे. ही मोहिम अभिमानाने आगामी विश्‍वचषकासाठी आपल्‍या खेळाडूंच्या निरंतर निर्धाराला दाखवते, तसेच चाहत्‍यांमध्‍ये भारतीय क्रिकेट संघ या विश्‍वचषकामध्‍ये यशस्‍वी ठरेल, असा विश्‍वास निर्माण करते.
या उत्‍साहवर्धक मोहिमेअंतर्गत असलेल्‍या जाहिरातीमध्‍ये क्रिकेट आयकॉन्‍स – रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व डायनॅमिक कर्णधार रोहित शर्मा आहे. या जाहिरातीची थीम ‘मेकिंग इंडिया बीलीव्‍ह इन टीम इंडिया’ आहे. मोहिमेचा उद्देश अद्वितीय कथानकामध्‍ये सामावलेला आहे, तसेच या मोहिमेमध्‍ये ‘वॉईस ऑफ बीलीफ’ म्‍हणून बॉलीवुड किंग शाहरूख खान आहेत.
जाहिरातीचे कथानक भारतीय क्रिकेटप्रेमींच्‍या सध्‍याच्‍या भावनांना सादर करते, ज्‍यांचा अतूट विश्‍वास आहे की ‘भारत जिंकणार’, पण सोबत मनात विचार आहे की ‘भारत जिंकेल काॽ’. भावनांमधील हा संघर्ष थम्‍स अपच्‍या आयकॉनिक स्प्लिट कॅनवर सुरेखरित्‍या सादर करण्‍यात आला आहे, जो व्हिज्‍युअली डायनॅमिक इंटरप्‍लेचे वर्णन करतो.
आयसीसी वर्ल्‍ड कप कॅम्‍पेनच्‍या नवीन चॅप्‍टरच्‍या लाँचबाबत आपले मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया व साऊथ वेस्‍ट एशियाचे उपाध्‍यक्ष अर्णब रॉय म्‍हणाले, ”थम्‍स अपच्‍या आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपसोबतच्‍या सहयोगाचा चाहत्‍यांना सक्षम करण्‍याचा आणि त्‍यांच्‍या मतांना सादर करण्‍यास प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे. किंग खान व देशाच्‍या क्रिकेट आयकॉन्‍ससोबतचा आमचा सहयोग चाहत्‍यांचा सहभाग वाढवण्‍याप्रती आमची कटिबद्धता दृढ करतो, तसेच वर्ल्‍ड कप पुन्‍हा मायदेशात आणण्‍यासाठी टीम इंडियाप्रती आमच्‍या अविरत पाठिंब्‍याला दाखवतो. आम्‍ही तज्ञ पॅनेल्‍स व विश्‍वसनीय प्रभावकांकडून तंत्रज्ञान नेतृत्वित, रिअल टाइम प्रतिसादाच्‍या माध्‍यमातून हे ध्‍येय साध्‍य करू, ज्‍यामधून प्रत्‍येकाला आपल्‍या टीमला पाठिंबा देत राहण्‍यास प्रेरणा मिळेल.”
ओगील्‍व्‍ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर सुकेश नायक म्‍हणाले, ”प्रतिस्‍पर्धी नेहमी बाहेरचा नसतो, कधी-कधी आपल्‍या स्‍वत:च्‍या मनातील शंका आपली सर्वात मोठी प्रतिस्‍पर्धी बनते. या द्विधा मन:स्थितीवर मात करण्‍यासाठी आपण आपल्‍या अंतर्गत विश्‍वासांवर ठाम राहिले पाहिजे. यंदा वर्ल्‍ड कपसाठी थम्‍स अपने ‘भारत यंदा वर्ल्‍ड कप जिंकेल काॽ’ या अंतर्गत संघर्षावर मात करण्‍यासाठी आवाज व प्रतीक म्हणून शाहरूख खान यांची निवड केली आहे.
आयसीसी वर्ल्‍ड कप जवळ येत असताना थम्‍स अपची खेळाडूंच्‍या चिकाटीला प्रशंसित करण्‍याप्रती आणि चाहत्‍यांसाठी संस्‍मरणीय क्षणांची निर्मिती करण्‍याप्रती कटिबद्धता कायम आहे, ज्‍यामुळे अस्‍सल तूफानी वर्ल्‍ड कपसाठी मंच सज्‍ज आहे.”
एकीकृत दृष्टिकोनासह ब्रॅण्‍डचा आयसीसी वर्ल्‍ड कप २०२३ दरम्‍यान प्रत्‍येक संबंधित संवाद व महत्त्वाच्‍या क्षणामध्‍ये अव्‍वलस्‍थानी राहण्‍याचा उद्देश आहे.

वॉईस ऑफ बीलीफ’ म्‍हणून बॉलीवुड सुपरस्‍टार शाहरूख खान
टीव्‍हीसीकरिता लिंक – https://youtu.be/6QYzPiwKdUE

Related posts

भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर्सचे ५ शीर्ष पर्याय

Shivani Shetty

मुंबईतील सर्वात मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शनाचे विजय सेल्सद्वारे आयोजन

Shivani Shetty

भारतातील स्‍पोर्टस् हायड्रेशनमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत लिम्‍काकडून लिम्‍का स्‍पोर्टझ आयन४ (ION4) लाँच

Shivani Shetty

Leave a Comment