मुंबई, ८ जानेवारी २०२४: महामारीनंतर विद्यार्थ्यांचा ऑनलाइन शिक्षणावरील विश्वास वाढत असल्याचे फिजिक्स वाला (पीडब्ल्यू) या भारतातील आघाडीच्या टेस्ट-प्रीपरेशन प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत डेटा विश्लेषनातून निदर्शनास आले आहे. पीडब्ल्यूने जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी पीडब्ल्यू अॅपमधील २७ लाख विद्यार्थी, तसेच जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरील ४ कोटी सबस्क्रायबर्सच्या नमुना आकारावर अंतर्गत डेटा विश्लेषण केले आणि माहिती शेअर केली आहे. हे इनसाइट्स गेल्या वर्षभरात (२०२२-२३) भारतातील ऑनलाइन शिक्षण क्षेत्रामधील ट्रेण्डस व पॅटर्न्सचे पुनरावलोकन आहेत.
हिंदी माध्यम बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये देखील ३०० टक्क्यांची वाढ दिसण्यात आली. यामधून हिंदीमध्ये ऑनलाइन कन्टेन्ट वितरित करण्याप्रती मागणीमधील वाढ दिसून येते. मातृभाषांसाठी विद्यार्थीवर्गामध्ये ५ पट वाढ दिसण्यात आली आहे, जेथे मराठी, बांगला, गुजराती, कन्नड व तेलुगू या भारतातील सर्वाधिक मागणी असलेल्या मातृभाषा आहेत.
२०२२ मध्ये ८.५ लाख सशुल्क ऑर्डर्सवरून २०२३ मध्ये २४ लाख ऑर्डर्सपर्यंत पीडब्ल्यूने सशुल्क कोर्सेसमध्ये नोंदणीच्या आकडेवारीत १८२ टक्क्यांची वाढ केली, ज्यामधून महामारीनंतरच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमधील ऑनलाइन कोर्सेसमध्ये गुंतवणूक करण्याप्रती प्रबळ इच्छा दिसून येते. तसेच २०२२ मध्ये ६८ लााख डाऊनलोड्सवरून २०२३ मध्ये ९४ लाख डाऊनलोड्ससह अॅप डाऊनलोड्समध्ये ३८ टक्क्यांची वाढ झाली, जेथे ३१ डिसेंबर २०२३ रोजी एकूण १.६२ कोटी डाऊनलोड्सची नोंद झाली. यामधून निदर्शनास येते की, नवीन विद्यार्थी सक्रियपणे डिजिटल शिक्षण संधींचा शोध घेत आहेत. किफायतशीर कोर्सेस, मल्टी-क्वॉलिटी स्ट्रीमिंग आणि अधिक इंटरनेट अॅक्सेस अशा विविध ऑनलाइन शिक्षण ऑफरिंग्जच्या नवीन श्रेणीसह विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षणाप्रती रूची व लॉयल्टी वाढली आहे. पीडब्ल्यू भारतभरातील ९८ टक्के भागांपर्यंत पोहोचली आहे आणि शैक्षणिक संसाधनांची कमतरता असलेल्या दुर्गम भागांमधील विद्यार्थ्यांना सक्षम करत आहे.
फिजिक्स वालाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलख पांडे म्हणाले, ”महामारीनंतरच्या विश्वामध्ये ऑनलाइन शिक्षणाच्या प्रमाणात घट होत समस्यांचा सामना करावा लागला असताना देखील उद्योगाने आपली प्रगती सुरू ठेवली आहे, हे पाहून खूप आनंद होत आहे. विद्यार्थी आरामदायी, स्वत:च्या गतीने शिकता येणाऱ्या व वैयक्तिकृत अनुभवांचा शोध घेत आहेत, जे ऑनलाइन शिक्षण देते. फिजिक्स वालाचा भारतीयांच्या शिक्षण घेण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे असलेले भावी व वैयक्तिकृत अध्ययन म्हणून हायब्रिड मॉडेलवर विश्वास आहे. आमच्या प्रयत्नांमधून देशाच्या दुर्गम भागामधील विद्यार्थ्यांना ही संसाधने उपलब्ध होण्याची, तसेच यशस्वी होण्यास योग्य संधी प्रदान करण्याची खात्री मिळते.”
समुदाय निर्मिती हा सतत विश्वास आणि विद्यार्थीवर्ग वाढवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत यूट्यूबवर समुदाय विकासाच्या माध्यमातून पीडब्ल्यूचे आता त्यांच्या ८१ यूट्यूब चॅनेल्सवर ४ कोटी सबस्क्रायबर्स व २७५ कोटी व्ह्यूज, अपलोड केलेले १ लाखाहून अधिक कन्टेन्ट, वर्षभरात २० कोटी तास पाहण्यात आलेले कन्टेन्ट आहेत. यामुळे पीडब्ल्यू अॅपवर सशुल्क विद्यार्थीवर्गामध्ये वाढ होण्यास मदत होते आणि कोर्सेस लाँच केल्यास शिक्षण सुलभपणे उपलब्ध होते. पीडब्ल्यू अॅपने २०२३ मध्ये ३२.७१ कोटी तासांचे वॉच टाइम, १२० कोटी एकूण व्ह्यूज आणि ५३ लाख अद्वितीय युजर्सचा टप्पा गाठला आहे. यामधून निदर्शनास येते की, विद्यमान विद्यार्थ्यांची ऑनलाइन कोर्सेसप्रती रूची कायम राहिली आहे.
व्यासपीठावरील सरासरी वॉच टाइम प्रतिदिन ५० मिनिटांवरून ६५ मिनिटांपर्यंत वाढला आहे, ज्यामधून निदर्शनास येते की, वाढत्या इंटरअॅक्टिव्हीटीमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यास मदत होते. क्लास सुरू असताना शंका विचारण्याची क्षमता, पोल्समध्ये सहभाग आणि लाइव्ह चॅट्समध्ये सहभाग अशा सादर करण्यात आलेल्या परस्परसंवादी वैशिष्ट्यांमुळे व्यासपीठावर सहभाग वाढवण्यास मदत झाली आहे. रोचक बाब म्हणजे, अॅपला भेट देणारे ३३ टक्के विद्यार्थी सशुल्क कोर्सेस खरेदी करतात, यामधून परस्परसंवादी वैशिष्ट्ये, वैयक्तिकृत शिक्षण व प्रगतीवर देखरेख ठेवणाऱ्या ऑफरिंग्जसाठी मागणी दिसून येते. उच्च इंटरअॅक्टिव्हीटी आणि सुलभ युजर इंटरफेस विद्यार्थ्यांना एकसंधी ऑनलाइन अध्ययन अनुभव देण्यासाठी महत्त्वाचे आहेत. या ऑफरिंग्जना मान्यता म्हणून पीडब्ल्यूला इन्क४२ एडटेक युजर्स इन इंडिया सर्व्हे २०२३ कडून इंडियाज टॉप एड-टेक प्लॅटफॉर्म इन लर्निंग एक्स्पेरिअन्स अॅण्ड युजर अॅप एक्स्पेरिअन्स मान्यता मिळाली.
२०२३ मधील आणखी एक रोच ट्रेण्ड म्हणजे, शंका निरसनामध्ये ३६ लाखांवरून १.१० कोटींपर्यंत २०० टक्क्यांची वाढ झाली आणि सोडवलेल्या प्रश्नांमध्ये ९२.५ कोटी प्रश्नांवरून १८१ कोटीपर्यंत ९६ टक्क्यांची वाढ झाली. यामधून निदर्शनास येते की, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शंका विचारण्याबाबत आणि त्यांचे निरसन करण्याबाबत अधिक सोयीस्कर वाटत आहे, तुलनेत पांरपारिक वर्गांमध्ये विद्यार्थी क्लासदरम्यान प्रश्न विचारण्यास संकोच करतात. यामधून सक्रिय अध्ययन व सहभागासाठी अनुकूल वातावरणाला चालना देण्याप्रती ऑनलाइन व्यासपीठांची परिणामकारकता दिसून येते.
पीडब्ल्यू भारतातील ७६६ जिल्ह्यांपैकी ६०५ जिल्ह्यांमधील मुलींना ऑनलाइन शिक्षणासह सक्षम करते, ज्यामुळे शिक्षणासाठी भौगोलिक, आर्थिक व संधीसंदर्भातील अडथळ्यांचा सामना करत असलेल्या विद्यार्थीनींना त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत होत आहे.
विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाचा अवलंब करणे आणि अध्ययन निष्पत्तींना प्राधान्य देणे हे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या खात्रीसाठी महत्त्वाचे आहेत. पीडब्ल्यू वि़द्यार्थ्यांसोबत सक्रिय संवाद आणि नियमित अभियाप्रायाच्या माध्यमातून आपला स्टुडण्ट नेट प्रमोटर स्कोअर (एनपीएस) वाढवते. उल्लेखनीय बाब म्हणजे पीडब्ल्यू अॅपचा एनपीएस २०२२ मधील ५० वरून २०२३ मध्ये ५४ पर्यंत वाढला आहे, तसेच कन्टेन्ट एनपीएस ४ वरून ४.५ पर्यंत, फॅकल्टी एनपीएस ४.२ वरून ४.६ पर्यंत आणि टेस्ट अॅण्ड डीपीपी (डेअली प्रॅक्टिस पेपर्स) ३.९ वरून ४.४ पर्यंत वाढला आहे. या सुधारणेमधून ऑनलाइन अध्यापनाची वाढती परिणामकारकता दिसून येते, जी ऑनलाइन कोर्सेसच्या माध्यमातून तयारी करत स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालांमधून प्रकर्षाने निदर्शनास येते.