maharashtraprimenews
ठळक बातम्या
महाराष्ट्र

आयुष्मान खुरानाची वाय वाय इंडियाच्या ब्रँड अम्बॅसॅडरपदी नियुक्ती

मुंबई, ४ सप्टेंबर २०२३: सीजी कॉर्प ग्लोबलचा एफएमसीजी विभाग सीजी फूड्सच्या मालकीचा, अतिशय लोकप्रिय नूडल्स ब्रँड वाय वायने (WAI WAI) आपल्या ब्रँड अम्बॅसॅडर पदी बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाची नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. तब्बल २५ वर्षांची समृद्ध परंपरा आणि युवकांमधील प्रचंड लोकप्रियता यांचे बळ असलेला वाय वाय हा ब्रँड आता युवापिढीचे प्रतिनिधित्व करणारे अस्सल व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आयुष्मान खुराना यांच्याशी सहयोग करून आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. ‘वाय वाय वाला टेस्ट’ या संकल्पना आणि टॅगलाईनसह, वाय वायचा अनोखा स्वाद आणि सीझनिंग यांचा आनंद साजरा करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांनी सांगितले,”वाय वाय सारख्या युवकांच्या अतिशय पसंतीच्या ब्रँडसोबत सहयोग करताना मला अतिशय आनंद होत आहे. अतिशय प्रभावी आणि वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणी हे या ब्रँडचे अनोखे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यक्तीचा आवडीचा स्वाद, निरनिराळी क्षेत्रे आणि प्राथमिकता यांना अनुरूप अशा या नूडल्स सादर करून हा ब्रँड आपल्या लोकप्रियतेला साजेशी कामगिरी बजावत आहे.”

सीजी फूड्स आणि सीजी कॉर्प ग्लोबल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री वरुण चौधरी यांनी सांगितले, ‘आयुष्मान खुराना यांच्यासोबत सहयोग करणे याला मी सर्वाधिक प्राधान्य दिले आणि मला आनंद आहे आम्ही इतक्या कमी वेळात एकमेकांसोबत हातमिळवणी केली. आज ब्रँडविषयीच्या माझ्या व्हिजनमध्ये विक्रीमध्ये लक्षणीय वाढ घडवून आणली जाण्याबरोबरीनेच देशभरातील वाय वाय चाहत्यांसोबत दृढ संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला जात आहे आणि अशा महत्त्वाच्या वेळी ही भागीदारी करण्यात येत आहे ही खूपच चांगली बाब आहे. भारत आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि वाय वाय ब्रँड भारतात आपली पाळेमुळे खोलवर रुजवून नेतृत्व स्थान सुनिश्चित करेल यावर मी माझे लक्ष केंद्रित केले आहे.”

युवक, किशोरवयीन आणि वर्किंग प्रोफेशनल्स यांचा समावेश असलेल्या सध्याच्या नव्या पिढीसोबत अधिक दृढ संबंध प्रस्थापित करण्याचे धोरण वाय वायने आखले आहे. प्री-सीझन्ड नूडल्सचे उत्पादन करणारा एकमेव स्टॅन्डअलोन ब्रँड, अनौपचारिक भाषेत ‘ब्राऊन नूडल्स’ म्हणून ओळखला जाणारा वाय वाय बाजारपेठेत एक आकर्षक, रोचक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.

Related posts

जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने आयपीआरएस ची “वर्ल्ड बिहाइंड द म्युझिक” मोहिम

Shivani Shetty

मला फक्त अ‍ॅक्शन हिरो बनायचं होतं – शाहरुख खान

Shivani Shetty

अजित पवारांची फडणवीसांसोबत चर्चा; तर निरोपासाठी आलेल्या नार्वेकरांना शरद पवारांनी गाडीत बसवलं!

cradmin

Leave a Comment