maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

फँटाने केली चविष्ट उपभोगाची नवीन व्याख्या; कार्तिक आर्यनसह सुरू केले नवीन ‘फ्नॅकिंग’ अभियान

राष्ट्रीय, मे २०२४: फँटा या कोकाकोला इंडियाच्या प्रसिद्ध व चविष्ट पेय ब्रॅण्डने, आवडत्या खाद्यपदार्थांना चविष्ट फँटाची जोड देऊन ‘फ्नॅकिंग’चा आनंद समजावून देणारे एक नवीन अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या जाहिरातीत (कॅम्पेन फिल्म) कार्तिक आर्यन चमकणार आहे. फँटाच्या अनेक संवेदना जागृत करणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीसोबत खाद्यपदार्थांचे नाते जोडण्यास आणि त्या क्षणाचा आनंद उपभोगण्यास ही जाहिरात ग्राहकांना उत्साह देते. खाद्यपदार्थांच्या सहसा न आढळणाऱ्या संगती करण्यापासून (कॉम्बिनेशन्स) सर्वत्र पसरलेल्या फूड हॅक्स तपासण्यापर्यंत अनेक प्रयोगांनी भारतातील स्नॅकिंगचे क्षेत्र गजबजलेले आहे. यात खाद्यपदार्थांतील प्रयोगांपासून खाद्यपदार्थांच्या परीक्षणांपर्यंत अनेक बाबींचा समावेश आहे. या चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जत वाढवणारा परिपूर्ण घटक म्हणून फँटा काम करते. तेव्हा फँटा व स्नॅक्स घ्या आणि फ्नॅकिंग सुरू करा!
फ्नॅकिंग अभियानात बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन ‘फ्नॅकिंग’ची खेळकर बाजू दाखवतो. हो, स्नॅकिंगची मजा चविष्ट फँटासोबत घेण्यासाठी फ्नॅकिंग नवीन संज्ञा तयार करण्यात आली आहे. फँटा ऑरेंज आणि स्नॅक्स यांच्यासोबत प्रयोग करण्याची संकल्पना कार्तिक जिवंत करतो, घरी किंवा मित्रमंडळींसोबत चाकोरीबाह्य आणि प्रयोगशील स्नॅकिंगमध्ये फँटा कसे उपयुक्त ठरू शकते हे दाखवून देतो.
ओगिल्वीच्या संकल्पनेतून साकार झालेले हे अभियान विविध प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास सज्ज आहे. यात टेलीव्हिजन, डिजिटल मीडिया व आऊटडोअर जाहिरातींचा समावेश आहे. या अभियानाद्वारे फँटाचे आकर्षण देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवले जाणार आहे.
कोकाकोला भारत आणि नैऋत्य आशियाच्या सीनियर कॅटेगरी डायरेक्टर सुमेली चॅटर्जी या अभियानाबद्दल म्हणाल्या, “स्नॅकिंगचा आनंद अनन्यसाधारण, चविष्ट पद्धतीने घेत आम्ही फ्नॅकिंग साजरे करत आहोत. स्नॅकिंग म्हणजे केवळ भूक भागवणे नव्हे, तर रसनेला रोमांचित करणाऱ्या चवींचा संपूर्ण अनुभव उंचावणे आहे. कार्तिक आर्यन आमच्यासोबत काम करण्यास तयार झाला याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. त्याला स्वत:ला स्नॅकिंगला फँटाची जोड देणे आणि प्रत्येक क्षण अधिक जिवंत व आनंददायी करणे खूप आवडते. फ्नॅकिंग हा केवळ एक क्षण नाही, तर एक चविष्ट संवेदी अनुभव आहे.”
फँटाशी सहयोगाबद्दल अभिनेता कार्तिक आर्यन म्हणाला, “फँटाच्या फ्नॅकिंग अभियानाचा भाग होणे अफलातून अनुभव होता! फँटाच्या साथीने आनंददायी व चविष्ट फ्नॅकिंग हे सर्व काही बदलून टाकणारे मूल्यविधान आहे. या खिळवून ठेवणाऱ्या अभियानात सहभागी होणे माझ्यासाठी खरोखर आनंददायी अनुभव होता. त्यातून अनोखे चैतन्य आणि ताजातवाना दृष्टिकोन पुढे आला.”
ओगिल्वी नॉर्थच्या चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर रितू शारदा या अभियानाबद्दल सांगतात, “आपल्याला खाद्यपदार्थांबाबत प्रयोग करायला, सातत्याने वेगवेगळ्या संगती करून बघायला आवडते. म्हणूनच समोसा भेळ, पकोडा पाव आणि अशी अनेक प्रकारची नावे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटत नाही. फँटा आणि पाककलेतील चैतन्य यांचा संयोग दाखवण्यासाठी आम्ही ‘ग्राम’द्वारे प्रेरित असलेले अप्रतिम दिसणारे विश्व निर्माण केले आहे. या विश्वात कार्तिक आर्यन अशी अफलातून स्नॅक फ्युजन्स तयार करतो. एक खेळकर वळण देऊन तो या प्रवासाची लज्जत वाढवतो. हे वळण म्हणजे चविष्ट फँटाची जोड स्नॅकिंगला देऊन तो त्याचे रूपांतर ‘फ्नॅक’मध्ये (फँटा + स्नॅक) करतो. त्यामुळे खाण्याचा प्रत्येक घास अधिक खास आणि आनंददायी होतो.”

Related posts

रॅकोल्‍डकडून नेक्स्‍ट-जनरेशन वॉटर हिटर्स लाँच

Shivani Shetty

मॅक्सहबने नवीन इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले आणि कॅमेरा सोल्युशन्स लॉन्च केली

Shivani Shetty

सॅमसंगच्‍या अल्‍ट्रा-प्रीमिअम टेलिव्हिजन्‍सवरील ‘बिग टीव्‍ही डेज’ सेलसह घरामध्‍ये स्‍टेडियमसारखा आनंद घ्‍या

Shivani Shetty

Leave a Comment